Wednesday, July 20, 2016

मुल समजुन घेताना

सध्या पालकांचे दोन वर्ग दिसुन येतात.शिक्षा करुन मुलांवर योग्य संस्कार घडविता येतात असे मानणारे व संयमाने त्यांच्या भावना जाणुनघेणारे पालक.प्रत्येकच लहान मोठ्या चुकांना शिक्षा करणे योग्य नव्हे.काही पालक तर एवढी कठोर शिक्षा करतात की,अंगावर आगदी काटाच उभा राहतो.सध्या RTE act 2009 मधील कलम १७ नुसार बालकांना शारीरिक शिक्षाव मानसिक त्रास यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मी सध्या ज्या शाळेत आहे तेथे घडलेला किस्सा मी सांगते.ऋतुजा ही इ.२रीतील विद्यार्थिनी,अगदी हुशार व चुणचुणीत.स्वच्छता व टापटीप,वक्तशीरपणा,आज्ञाधारकपणा इ.गुणसंपन्न मुलगी.परंतु एके दिवशी परिपाठ चालु असतानाच तिची आई तिला घेऊन आली व ओक्साबोक्सी रडु लागली.काय करावे कळेचना!एवढ्यात त्यांनीच स्वत:ला सावरत सांगण्यास सुरुवात केली.माझ्यासह सर्व विद्यार्थ्यांनाही अश्रु आवरता आले नाहीत.ऋुतुजाच्या पाठीवर काळेनिळे वळ उमटले होते.याचे कारण म्हणजे तिने घरातील १०००रु ची नोट १०रु समजुन खाऊ खाण्यास आणली पण खेड्यात सकाळी १०वा दुकाने बंद व रात्री पुन्हा चालु .तो पर्यंत तिने ती नोट मैत्रिणीच्या आईकडे ठेवण्यास दिली.त्यांनी लगेच ओळखले की हिने न सांगताच घरातील पैसे आणलेत.संध्याकाळी तिची आई वआजीला ती नोट देउन त्या घरी गेल्या .झाला प्रकार ऋुतुजाच्या वडिलांस समजला.त्यांनी तिला बेल्टने एवढे मारले की काळेनिळे वळच ऊमटले.किती ही अघोरी शिक्षा.खुप गंभीर बाब ही.तिच्या आईशी बोलताना समजले की,आम्ही तिला कोणतीही गोष्ट मागण्यापुर्वीच हजर करतो.तिला कशाचीच कमतरता नाही.तरीही तिने घरातच चोरी करावी ही खुप काळजी करण्याची बाब आहे असं त्या म्हणाल्या.मी श्रुतुजाला जवळ घेऊन समजावले.तर तिने सांगीतले की ,मला ही कधीकधी मैत्रिणींबरोबर खाऊ खावा वाटतो.घरी पैसे मागितले तर देत नाहीत म्हणुन मी चोरी केली.तिनेअगदी प्रमाणिकपणे कबुल केले.पुढे सलग काही दिवस परिपाठातच चोरी करणे किती चुक आहेहे कथेद्वारे समजुन सांगीतले.तेंव्हापासुन ऋुतुजाच काय पण शाळेतील एकाही विद्यार्थ्याची चोरीविषयक घरी अथवा शाळेत तक्रार नाही.याचे मला खुपखुप समाधान आहे.सध्या ऋतुजा इ.४थीत आहे.मला एवढेच सांगावेसे वाटते की,खुप अघोरी शिक्षा करुन मुलांवर संस्कार होतात हा चुकीचा समज आहे.संस्कार हे करायचे नसतात तर ते रुजवायचे असतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
   .......संगीता भांडवले
      वाशी, उस्मानाबाद