My school -My Activity-2018-19
🌷*रेशीम प्रकल्पास क्षेत्र भेट*🌷
(वनभोजन ट्रिप, निसर्ग 🌿🍃,शाळा🏫, दप्तराविना 🎒शाळा)
जि प प्रा शाळा कवडेवाडी व ता वाशी जि उस्मानाबाद
दि. ११/०२/२०१९
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज रोजी श्री संघपाल सुकाळे व बाळासाहेब सुकाळे यांच्या शेतात 'रेशीम प्रकल्पास क्षेत्र भेट'दिली.श्री व सौ सुकाळे यांनी विद्यार्थ्यांचे शाब्दिक सुमनाने स्वागत केले. श्री सुकाळे सर यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी लक्ष पुर्वक माहिती ऐकली. काही प्रश्न विचारले. तुतीची झाडे व लागवड, अळी च्याअवस्था, कोश कसा तयार होतो याची जिज्ञासू पणे माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपडत होता. अळी ला हात लावत होता. काहींनी तर कोश हातात घेऊन पाहिले. या सर्व प्रात्यक्षिकानंतर मुलांना जाम भुक लागली होती. येताना सुकाळे सर यांनी जिलेबी व फरसाण अल्पोपहारासाठी आणले होते. मुलांनी यावर यथेच्छ ताव मारला. श्री व सौ आशा दशरथ काळे ही आमच्या मदतीला होतीच. थोडे झाडांच्या सावलीत विश्रांती घेऊन, गाणी गोष्टी करत आमचा मोर्चा श्री निशिकांत विधाते यांच्या शेतात वळला. जवळ च यांचे घर. दोन दिवसापुर्वी आम्ही तुमच्याकडे वन भोजनासाठी येणार आहोत, डबे आम्ही आणतोय तुम्ही फक्त पिण्याच्या पाण्याची सोय करा. एवढाच निरोप आम्ही दिला. पण यांनी ही आमच्या चिमुकल्या साठी पिण्याचे स्वच्छ पाणी, पोहे व गुलाब जामुन असा बेत केला. मुलांचे डबे, शा. पो. आहार व मुख्याध्यापक श्रीमती भांडवले संगीता यांनी ही जिलेबी आणलेली. मुलांच्या आनंदाला उधाण आले होते. झाडांच्या सावलीत कविता, गाणी ,खेळ असे विविध प्रकारचे उपक्रम घेऊन आज.. वनभोजन, निसर्ग शाळा, दप्तराविना शाळा असे विविध उपक्रम राबवल्याचे समाधान वाटले. या सर्व कामी श्रीमती सूर्यवंशी मॅडम(सहसिक्षिका),सौ शालनताई(स्वयंपाकी), सौ विधाते ताई व त्यांचा परिवार, सौ सुंदरबाई विधाते(आशा) यांचे मोलाचे योगदान लाभले.
शब्दांकन
श्रीमती संगीता भांडवले
मुख्याध्यापिका
जि प प्रा शाळा कवडेवाडी व
ता वाशी जि उस्मानाबाद