।। कोरोना व्हायरस।।
कोरोनाची नको भिती
कोरोनाचा नको धसका
रुमालाचा वापर करुन
मगच शिंका किंवा ठसका ।। १।।
कोव्हिड-19 ने घातलाय
धुमाकूळ अनेक देशांत
वैयक्तिक व सार्वजनिक
स्वच्छता करा परिसरात ।। २।।
ताप, थकवा,डोकेदुखी
खोकला, स्नायुचं दुखणं
लक्षणे दिसताच प्रथम कर्तव्य
जवळच्या रुग्णालयात जाणं ।। ३।।
आजारी माणसाला नका करु स्पर्श
नाक, तोंड, डोक्याला हात लावणं टाळा
मास्कचा करा वापर गर्दीत नका जाऊ
त्यानेच संसर्गाला बसेल संपूर्णतः आळा ।।४।।
सध्या, अफवांचे फुटलेय पेव
ब्रेकिंग न्यूजने केलाय कहर
कोरोनाच्या भितीनेच अनेकांनी
वर्ज्य केलाय मांसाहार ।। ५।।
विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी
आरोग्य यंत्रणा सज्ज आहे
डॉक्टरांच्या कार्यतत्परतेला
त्रिवार वंदन आहे, त्रिवार वंदन आहे ।। ६।।
संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
©®
९९२३४४५३०६
myshikshankatta.blogspot.in