अंत:करणास भेदून जाईल
आर्त हाक त्या वीर पत्नीची
कोण जाणावे दु:ख तिचे
कशी समजूत काढेल लेकरांची
अंत:करणास भेदून जाईल
टाहो त्या वीर मातेचा
कोण जाणावे दु:ख तिचे
झाला शहीद पुत्र पोटचा
अंत:करणास भेदून जाईल
रिती कुस त्या वीर मातेची
कोण जाणावे दु:ख तिचे
गाथा पराक्रमाच्या शौर्याची
अंत:करणास भेदून जाईल
वेडी माया बहिणीची
कोण जाणावे दु:ख तिचे
हिंमत तिच्या धैर्याची
अंत:करणास भेदून जाईल
आक्रोश त्या वीर पित्याचा
मातृभूमीच्या रक्षणासाठी
अभिमान मुलाच्या बलिदानाचा
संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद