Monday, June 26, 2023

My school My Activity. बुक मार्क तयार करणे.

Today's Activity...
दिनांक:२६/०६/२०२३
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
My school  My Activity

Z.P.P.S.KAWADEWADI V.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 
 उपक्रमाचे नाव:
*बुक मार्क तयार करणे*.
(टाकाऊतून टिकाऊ वस्तूचा वापर करून)
*कृती:*
लग्न पत्रिकेतील कोऱ्या भागाचा वापर करून आज बुक मार्क बनविला. सन 2022- 23 पासून इयत्ता पहिली ते आठवी ची पाठ्यपुस्तके तीन/ चार भागात विभागण्यात आलेली आहेत.एकाच पुस्तकांमध्ये सर्व विषयांचा समावेश केलेला आहे. वर्गाध्यापण करत असताना असे लक्षात आले की ,एक विषय संपला की दुसरा विषय काढत असताना विद्यार्थ्यांना तो भाग लवकर सापडत नाही किंवा काढता येत नाही. मग अशावेळी बुकमार्क जर आपण बनवले तर निश्चितच विद्यार्थ्यांना लवकर तो विषय  पण काढता येईल म्हणून, तसेच इयत्ता चौथी इंग्रजी युनिट वन मध्ये Book Mark तयार करणे. ही Activity   घ्यायची आहे म्हणून आजची  कृती घेण्यात आली. व्हिडिओच्या माध्यमातून आपण याची माहिती सविस्तर पाहू शकता.

मार्गदर्शक शिक्षिका:
*श्रीमती भांडवले संगीता*

सहभागी विद्यार्थी:
 *इ. ४थी व इ.५वी*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹