Wednesday, December 28, 2016

शब्दविद्या विजेत्या कविता भाग- २६/१२/२०१६

[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *सर्वोत्कृष्ट*

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

.....(अष्टाक्षरीत ).......

चिवचिवाट पक्ष्यांचीे
थांबले अाता हे झरे
निसर्ग आमचा बाप
हळव्या जखमा भरे ।।
पकडू विचित्र मासे
जी देती नेहमी धोका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेवू अलगद झोका ।।

झाडं म्हणते मजला
चढ जरा हळूवार
खेळ तू माझ्यावरती
फांदीचा देतो आधार ।।
मग कशास सोडू मी
उडी मारण्याचा मौका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेवू अलगद झोका ।।

बोलका आमचा खेळ
दिसले खरे दर्पण
जगण्यात आहे मजा
शिकवते बालपण ।।
विसरा कालचा हेवा
कटू आठवण रोका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेवू अलगद झोका ।।

गुंतली माणसे सारी
अनं स्वार्थी झाल्या जाती
गड्या फक्त समजली
अन्न देणारी ही माती ।।
जगतांना खेळू हासू
धडके ह्रद्याचा ठोका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेऊ अलगद झोका ।।

नाजूक कळ्या ह्या आम्ही
उमलून घेऊ थोडे
आयुष्याचे एेसे क्षण
उजळून घेऊ थोडे ।।
बघून आम्हा हसतोे
चिऊचा रिकामा खोका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेऊ अलगद झोका ।।
         एजाज बी. शेख
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*प्रथम*

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

*दंगामस्ती*

आकाशाच्या अंगणात,
खुशाल मोकळे फिरू.
झाडे वेली रानपाखरे
दंगा मस्ती करू.॥

नकोच शाळा आणि पुस्तक
दफ्तर पाटी खडू
खुशाल सरसर खारू सारखे
झाडावरती चढू.॥

हवी कशाल मोटरगाडी
तकलादू बाहुला
फांदीवरती खुशाल बांधू
झाडावरती झुरला.॥

कशास कृत्रीम पाऊसपाणी
भिर्रभिर्रणारे झरे.
माशासारखी डुबकी मारू
सखे साजणी गडे.॥

        *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
             पोई ; कल्याण ; ठाणे
                     *अध्यक्ष*
         महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
              (कल्याण ग्रामीण)
         djbutere@blogspot.com

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *द्वितीय*

चित्रकाव्य स्पर्धेसाठी,,,,

🌹  *स्वच्छंदी बालपण*  🌹

रानीवनी अोढ्यावरी,
विहरावे पक्ष्यांपरी,
हुंदडून आनंदाने,
झुलावे त्या फांदीवरी।

       नसे तमा ही दुःखाची,
       ना काळजी भविष्याची,
       भावनांना सल नसे,
       पुढयातल्या संकटांची।

स्वच्छंदी बालपण हे,
निरागस झऱ्यासम,
खळखळ ओसंडते,
धुंद धबधब्यासम।

        फुलारून बालपणी,
        व्हावे परिपक्व असे,
        ताकदीने संकटांस,
        शह देण्या सज्ज जसे।

मस्त फुलावे मस्तीने,
गाणे गावे धुंद व्हावे,
छेडून फुलपाखरां,
अाकाशी झेप घ्यावे।

       *अर्चना वासेकर*
            *यवतमाळ*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *द्वितीय*

*शब्द विद्या समूह...*
चिञकाव्य लेखन स्पर्धेसाठी

-------------------------
       *स्वातंत्र्याचा अर्थ*

स्वातंत्र्याचा कसलाही अर्थ
न कळलेल्या आदिवासी पाड्यात
मुक्त खेळतात रे मुली...
अन् इथल्या स्वातंत्र्यात रोज
अन्याय अत्याचारानं
किती विझून गेल्यात रे चूली...
तिथे निरागस कोवळ्या
मनावर संस्कार निसर्गच गोंदतो...
अन् सिंमेटच्या जंगलात आम्ही
मुले संस्कार वर्गात न्हेऊन कोंडतो...
जंगलातल्या वाघानांही नाहीत
घाबरत तिथल्या रे मुली...
अन् माणसांच्या फौजफाटेत
बळी पडतात लांडग्यांना रे मुली...
घनदाट जंगलात त्या
स्वातंत्र्य उपभोगतात तिथल्या मुली...
अन् बंदिस्त भिंतीत शोधती
हवा स्वातंत्र्याची खुली...
अन् इथल्या स्वातंत्र्यात रोज
अन्याय अत्याचारानं
किती विझून गेल्यात रे चूली...

*✍कवी प्रमोद जगताप*
         *२६/१२/२०१६*
------------------------
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *तृतीय*

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

      ॥मोकळा श्वास ॥

अलगद ,अवखळ ,उनाड वारा
शुभ्र पांढऱ्या बर्फाच्या गारा
नेहमीच काय एसी चा मारा
अंगावर झेलू शीतल जलधारा ॥

पाण्यांतल्या माशांशी मारूनी  गप्पा
अलगद गाठूनी झाडांवरचा टप्पा
टी व्ही मोबाईलला देवूनी धप्पा
हिरव्या दोस्तांसाठी खोलू मनाचा कप्पा ॥

सरसर सरसर झाडांवर चढू
मस्त लोंबकळत हिंदोळ्या घेऊ
कशास त्या आरशात पाहू
कधीतरी पाण्यातही प्रतिबिंब शोधू ॥

शाळा ते घर अन् दररोज चा अभ्यास
धावपळीत जगण्याचा आपलाच ध्यास
मातीतल्या नात्याला जगण्याची आस
निसर्गाच्या कुशीची धरुनी कास ॥

घेऊ चला थोडा मोकळा श्वास
घेऊ चला थोडा मोकळा श्वास ॥

पल्लवी कोल्हापुरे पाटील -
ता - शिरोळ जि - कोल्हापूर
9921775927
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *तृतीय*

🎯भव्य चित्र काव्य स्पर्धा🎯
दि.२६/१२/२०१६

🏵।।बालकविता।।🏵

⚽स्पर्धेसाठी⚽

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हिरव्यागार शिवारात
गर्द झाडांची दाटी
ठरलेल्या असतात
इथेच रोज गाठीभेटी

अवखळ निरागस
उनाड ते बालपण
आठवांच्या शिदोरीचे
विसरत नाहीत क्षण

कधी सुरपारंब्या
कधी माकड उड्या
बालपणीच करता येतात
अवखळपणाच्या खोड्या

बालपणी काय कळावी
जगण्याची रितभात
स्वप्न मात्र पाहतो
काय व्हावे आयुष्यात

आनंदी आनंद वाटे
फांदीवर झुलताना
हर्षित ही रानपाखरे
स्वच्छंद बागडताना

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी ,उस्मानाबाद

Wednesday, December 21, 2016

कविता ।।गणिताचा तास।।

।।कविता।।

गणिताचा तास येताच
पोटात येतो गोळा
बेरीज नको,वजा नको
दुश्मन वाटतो फळा

गुरुजींच्या हाती खडू
गणित फळ्यावर देण्याला
मला मात्र आले रडु
गणित येईना सोडवायला

गुरुजी,बाई जवळ आले
मला समजावण्याला
काड्याकुड्या, मणी मोजले
अंक लागलो मोजायला

फरशीवरील आकृतीवर
गणित सोपे वाटले
पटापट सोडवु लागलो
बाईंनी शाब्बास म्हंटले

गुरुजींनी दिली
सोडवाया गणित कोडी
कितीही विचार केला तरी
सुटतच नाही अढी

बुध्दीला चालना मिळाली
विचार लागलो करायला
गणिताचा तास आता
कोड्यातुनही उलगडला

कृतीयुक्त शिक्षण आंम्हा
उपक्रमातुन मिळु लागले
गणिताची भिती गेली
गणित आवडु लागले.

संगीता भांडवले(मु.अ)
जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद
९९२३४४५३०६
myshikshankatta.blogspot.com

Sunday, December 11, 2016

आजची बचत: उद्याचे भविष्य

:                      *आजची बचत :उद्याचे भविष्य*

       बचत म्हणजे भविष्यातील उपयोगासाठी काही भाग बाजुला काढुन ठेवणे.*बचत*हा एवढासा लहान शब्द पण खुप ताकद आहे या शब्दात .बचतीची ताकद आपण प्रत्यक्ष अनुभवायलाच हवी,मग ती बचत पैशाची असो की,वेळेची,पाण्याची असो की विजेची,सध्या तर कागदाची ही बचत करणे आवश्यक झाले आहे.कारण आपण आज केलेली बचत,काटकसर यावरच उद्याचे आपले भविष्य अवलंबुन आहे म्हणुन प्रत्येकाने याचा मर्यादित वापर करणे गरजचेे झाले आहे.
      पैशाची बचत करणे वाटते तितके सोपे नाही यासाठी वचनबध्दच व्हावं लागतं.डोक्यात खर्चाच्या अगोदर बचतीचे प्लॅनिंग तयार असावे लागते.आधी बचत मग खर्च  या सुत्राचा वापर जर आपण दैनंदिन जिवनात पाळला तर बचतीचे आपले स्वप्न लवकर सत्यात उतरते.खरंतर बचत हिच आपल्या आर्थिक नियोजनाची पहिली पायरी असते.आपण बचत का करावी?
कारण-१.बचतीमुळे आपल्या इच्छा आकांक्षा पुर्ण होण्यास मदत होते.२.बचतीमुळे मालमत्ता निर्माण करण्यास मदत होते.
३.बचतीमुळे आर्थिक सुरक्षितता व स्थैर्य निर्माण होते.
४.भविष्यातील उद्भवणा-या समस्या निराकरणासाठी बचतीचाउपयोग होतो.५.मुलांच्या शिक्षणासाठी,उज्वल भविष्यासाठी.६.लग्न समारंभ यासारख्या आनंदी क्षणासाठी.
या सर्व कारणामुळे बचत करणे आवश्यक झाले आहे. दर महिन्याच्या उत्पन्नातील काही भाग म्हणजे किमान १०%तरी बचत म्हणुन राखुन ठेवला पाहिजे.घरातील प्रत्येकाने बचतीची सवय लावुन घ्यायला हवी.बचत आणि वेळोवेळी संपत्तीची निर्मिती हा आपले आयुष्य घडविण्याचा चांगला मार्ग घडु शकतो.स्वत:तं बॅंकेत खाते असावे.त्यात महिन्याला काही ठराविक भाग भविष्यातील उपयोगासाठी नियमितपणे बाजुला काढुन ठेवावा.आपत्कालिन परिस्थितीसाठी आपणास ही बचत कामी येऊ शकते.
         वेळेची बचत ही मानवी जिवनातील अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वेळ कोणासाठीही थांबत नसते.एकदा निघुन गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नसते.म्हणतात ना *Time is Money* म्हणुन आपण मिळालेल्या वेळेचा पुरेपुर वापर करुन आपली प्रगती करायला हवी.कामे वेळेत पुर्ण झाली नाहीत तर खुप मोठे नुकसान होते.यासाठी आपण दैनंदिन कामाची यादी बनवायला हवी. वेळेचे उत्तम नियोजन केले पाहिजे.यामुळे कामे वेळेत पुर्ण होवुन वेळेची बचत होते व या उरलेल्या वेळेचा आपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी आपण वापर करु शकतो.दिवसभरातील २४ तासांचे  नियोजन आपण करायला हवे.यात झोप,मनोरंजन,नौकरीव व्यवसाय,मित्रपरिवार-नातेवाइक,दुरदर्शन,गाणी ऐकणे,व्यायाम इ.प्रकारचे नियोजन तंतोतंत केले तर दैनंदिन कामाबरोबरच आपला बराचसा वेळ वाचेल व तो आपण आपल्या आरोग्यासाठी ,आवड व छंद जोपासण्यासाठी,प्रेक्षणिय स्थळे पाहण्यात,आवडते खेळ खेळण्यावर केला तर आपल्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.परंतु काही लोक पैशापेक्षा वेळेला जास्त महत्व देतात.कारण आपण पैसा कधीही कमवु शकतो पण गेलेली वेळ परत कधीच येत नाही.म्हणुन प्रत्येकाने वेळेची बचत करुन जीवनाचा आनंद घ्यावा.
           पाणी हेच जीवन.सर्व सजीव सृष्टीला पाण्याची आवश्यकता आहे. मानवी जिवनात पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी हा अात्यंत महत्वाचा घटक आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. म्हणुन प्रत्येकाने पाण्याची बचत करायला हवी.पाणी वापराचे योग्य नियोजन केले तर भविष्यातील पाणी प्रश्न मिटेल.पाण्याची बचत करणे हे सर्वांचेच आद्य कर्तव्य झाले आहे.
अशी करता येईल पाण्याची बचत-----
*भाजी धुतलेले पाणी झाडांना द्यावे.
*कपडे धुतलेले पाणी अंगणात शिंपडावे.
*वाहने धुताना पाणी कमी वापरा.
*झाडांजवळ पाणी भरलेली मातीची भांडी ठेवा.
*पाण्याची टाकी धुताना पाण्याऐवजी हवेच्या प्रेशरचा वापर करावा.
*पाणी कधीच शिळे होत नाही,ते फेकुन न देता झाडांना द्या,फरशा,अंघोळ,कपडे धुणे यासाठी वापरा.
*पावसाचे पाणी वाचवा,साठवा.
अशा प्रकारे पाण्याची बचत करणे आवश्यक झाले आहे. तरच भविष्यातील पाणी प्रश्न मिटेल व दुष्काळी परिस्थिती आपणावर पुन्हा येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.
      आजच्या तंत्रज्ञानाच्या  आधुनिक युगात  विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दैनंदिन  सर्व कामे विजेवरच चालतात.लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे आपण आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तिच्या मागे किती वीज वापर लागतो याचा अंदाज आपण आजपर्यंत काढु शकलो नाहीत.तसेच वीजनिर्मितीचे स्त्रोत आपण पाहिजे त्या प्रमाणात वापर करु शकलो नाहीत. कारण विजेची स्त्रोत ही काही प्रमाणात मोफत मिळतात.जसे-सुर्यप्रकाश,पाणी, वारा व समुद्रीलाटा .यापैकी सुर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत ऊर्जेत रुपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रीक अडचणी निर्माण होतात.तर वारा व समुद्रीलाटा यांचे रुपांतर करताना भौगोलिक अडचणी निर्माण होतात. पाण्याचा विचार करताना आपण फक्त काही प्रमाणात याचा वापर करत नाही.तर ज्या ऊर्जा आपणाला मोफत मिळतात त्याचा उपयोग विद्युत ऊर्जेत रुपांतर करण्यासाठी आजपर्यंत फक्त ३ते ५%उपयोग करुन घेतला आहे.कृत्रिमरित्या वीजनिर्मितीसाठी आपण कोळसा व रासायनिक स्त्रोतापासुन तयार करतो.परंतु या सर्व घटकांना मर्यादा येतात.म्हणुन आजपासुन विजेची बचत करणे आवश्यक आहे.
यासाठी आपण हे करायला हवे----
*ट्युबलाईट ऐवजी सी.एफ.एल व एल ई.डी.लाईटचा वापर करावा.
*सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा यात-सौरदिवे,सौरकुकर,सौरबंब,इ.चा वापर करावा.
*विजेची उपकरणे फॅन,लाईट वापर झाला की लगेच बंद करावीत.
*नैसर्गिक सुर्यप्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन घरगुती व कार्यालयामध्ये करुन घेतल्यास वीज बचत होते.या सर्वामुळे वीजवितरणावरील भार कमी झाल्यामुळे वीज हानी आपण कमी करुन वाचवलेली वीज आपल्या पुढील भविष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.
       'कागद मोठा कामाचा'याप्रमाणे कागद हे लिहिण्यास वापरले जाणारे ,छपाईस वा वेष्टनासाठी एक पातळ साहित्य/सामग्री आहे. लाकुड,बांबु,चिंध्या,गवत इ.चे ओले सेल्सुलोजच्या लगद्याचे तंतु विशिष्टरित्या दाबुन व मग वाळवुन कागदाची उत्पत्ती होते.कागद तयार करण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागते.म्हणुन कागदाची बचत व पुर्नवापर करणे आवश्यक आहे. स्वच्छतेसाठीच्या अनेक उत्पादनात तसेच औद्योगिक व बांधकाम क्रियांमध्येही कागदाचा वापर होतो.क्वचितच खाद्य कागद म्हणुनही याचा वापर केला जातो.संगणकाच्या युगातही कागदाचे महत्व आजही टिकुन आहे.*पेपरलेस*कार्यालये करण्यासाठी आजपर्यंत फक्त बोलले जातेय पण प्रत्यक्षात कागदाचाच वापर करत आहेत.म्हणुन कागदाची बचत करावी लागणार आहे.
      या सर्व बाबींचा काटकसरीने वापर करावा व बचतीची सवय अंगी बाणावी.तरच ख-या अर्थाने आजच्या  बचतीतुन  उद्याचे आपले उज्जवल  भविष्य साकारण्यास मदत होणार आहे.

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
मोबा.नं.९९२३४४५३०६