Wednesday, December 21, 2016

कविता ।।गणिताचा तास।।

।।कविता।।

गणिताचा तास येताच
पोटात येतो गोळा
बेरीज नको,वजा नको
दुश्मन वाटतो फळा

गुरुजींच्या हाती खडू
गणित फळ्यावर देण्याला
मला मात्र आले रडु
गणित येईना सोडवायला

गुरुजी,बाई जवळ आले
मला समजावण्याला
काड्याकुड्या, मणी मोजले
अंक लागलो मोजायला

फरशीवरील आकृतीवर
गणित सोपे वाटले
पटापट सोडवु लागलो
बाईंनी शाब्बास म्हंटले

गुरुजींनी दिली
सोडवाया गणित कोडी
कितीही विचार केला तरी
सुटतच नाही अढी

बुध्दीला चालना मिळाली
विचार लागलो करायला
गणिताचा तास आता
कोड्यातुनही उलगडला

कृतीयुक्त शिक्षण आंम्हा
उपक्रमातुन मिळु लागले
गणिताची भिती गेली
गणित आवडु लागले.

संगीता भांडवले(मु.अ)
जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद
९९२३४४५३०६
myshikshankatta.blogspot.com

No comments:

Post a Comment