Thursday, January 5, 2017

नव वर्षाचे नव संकल्प

       *नव वर्षाचे नव संकल्प*

नवे दिवस,नवी प्रेरणा,नवे स्वप्न आणि नवी कल्पना घेऊन नवीन वर्ष येत असते.आनंदी वातावरणात नव वर्षाची सुरुवात झाली तर आपण ध्येयाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहचु शकतो.इंग्रजी कँलेंडरप्रमाणे १ जानेवारीपासुन आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत.नवीन वर्षात नवीन संकल्प करायचे आहेत.३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आपण जुन्या वर्षास निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत जोमाने,जल्लोषात करणार आहोत.काही कडु-गोड आठवणी विसरुन नव वर्षाचे स्वागत, नवीन वर्षात काहीतरी संकल्प करायचे आपण ठरवले असणार!मग तो संकल्प कोणताही असो,उदा.वजन वाढविणे,वजन कमी करणे,व्यसनमुक्त होणे,सद् सद् विवेक बुद्धीने वागणे किंवा पाहिलेली स्वप्ने पुर्ण करण्याचा संकल्प.असे संकल्प आपण दरवर्षी करत असतो पण त्यातील किती पुर्णत्वास जातात हा संशोधनाचा विषय आहे.हे संकल्प पुर्ण करायचे आपल्या मनाने ठरविले तर ते साध्यही होतात पण यासाठी वेळेचे उत्तम नियोजन व ते पुर्णत्वास नेण्याची जिद्द आपणात असावी लागे.'मी हे करु शकतो' असा वि्श्वास आपणाकडे असला पाहिजे.आपण केलेला संकल्प आपल्या मित्रास किंवा कुटुंबियांना माहीत असला पाहिजे. त्यामुळे तो पुर्णत्वास नेताना यांची मोलाची मदत होऊ शकते.सध्याचे युग हे धावपळीचे युग आहे.या विज्ञान युगामध्ये ,तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन,विशेषत:,वॉट्सअॅप व फेसबुक,ट्विटर इ.सोशल मिडीयाच्या अति वापराने माणुस सर्वच नाती विसरत चालला आहे.त्यामुळे असा एखादा संकल्प आपण  केला पाहिजे की,काही ठराविक दिवसानंतर किंवा सुख दु:खात मी यांच्या सोबत राहु शकेन.परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन केले तर यश हमखास मिळेल.महिला व मुलींनी आपले आरोग्य जपतच कुटुंबाचेही आरोग्य जपण जरुरीचे असते.महिलांनी दिवसभरातील १०-१५मिनिटे वेळ स्वत:साठी राखुन ठेवला पाहिजे. याच १०-१५ मिनिटांत आपण एखादा छंद जोपासु शकता किंवा व्यायाम करुन फिट राहु शकता.सर्व चांगल्या कामाचा शत्रु म्हणजे 'आळस'.तो झटकुन आपण सर्व कामे जबाबदारीने पार पाडली पाहिजेत.नियोजन व शिस्तीमुळे सर्व कार्ये पुर्णत्वास जातात.असे नव वर्षाचे नव संकल्प करुन आपण ते पुर्णत्वास नेऊ या!!!
        *माझ्या नजरेत २०१६हे वर्ष*:
काही ठळक बाबींचा आढावा.....
   * या वर्षी वरुन राजाने चांगली कृपा केली.मागील सात आठ वर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाले.
   *उरीच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले.
   *नागराज मंजुळे निर्मित 'सैराट' या मराठी चित्रपटास सैराट म्हणजे १०८ कोटींचा नफा झाला.देश पातळीवर विविध पुरस्कार मिळविणारा चित्रपट ठरला.या चित्रपटातील सर्वच गाणी सैराट गाजली.
   *चायना ओपन बँडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधुने यश मिळविले.
  *हॉकी ज्युनिअर वल्ड कप भारताने जिंकला.
*आरक्षण,अॅट्रासिटी कायदा दुरुस्ती आणि कोपर्डी घटनेत न्याय मिळावा यासाठीचे शिस्तबद्ध मराठा क्रांती मुक मोर्चाने २०१६ हे वर्ष गाजले.
  *८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता ५००/१००० च्या नोटाबंदीचा ऐतिहासीक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला.
*ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे पुण्यात निधन झाले.
*ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे वयाच्या ७८व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
  *तामिळनाडुच्या मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतात 'आम्मा 'या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या जयललिता यांचे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात निधन झाले.
  *नविन वर्षाच्या आगमनाप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.२४ डिसेंबर २०१६ ला अरबी समुद्रात  शिवस्मारकाचे भुमीपुजन मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.
       'सोळावं  वरिस धोक्याचं' असं म्हणतंच २०१६ हे साल सरले.खुप तणावग्रस्त व धावपळीत गेलं हे साल.कौटुंबिक प्रगतीबरोबरच या वर्षात कार्यालयीन प्रगतीही झाली.माझी शाळा-उपक्रमशील शाळा वरुन ,माझी शाळा-प्रगत शाळा होऊन नावारुपास आली.याचे सर्व श्रेय माझे विद्यार्थी,पालक,सहकारी शिक्षक,अधिकारी यांना जाते.
   एकंदरीत या २०१६ सालात मी मनोमन खुश आहे. निसटलेत काही क्षण हातातुन पण त्याचा बाऊ न करता मिळालेल्या संधीचे सोने केले यातच खुप समाधानी आहे.Welcome 2017 & Good bye 2016 म्हणत येणा-या नवीन वर्षाच्या स्वागतास मी  खंबीरमनाने तयार आहे. येणा-या नवीन वर्षात माझ्या हितचिंतकाची,मित्रपरिवार व नातेवाइकांची सर्व मनोरथ पुर्ण होवो!हाती घेतलेल्या कामात सुयश येवो!अशी मनोकामना!!

संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
९९२३४४५३०६

    

बालकविता, रानफुल

।बालकविता।   *रानफुल*

हिरव्यागार शिवारात
गर्द झाडांची दाटी
ठरलेल्या असतात
इथेच रोज गाठीभेटी

अवखळ निरागस
उनाड ते बालपण
आठवांच्या शिदोरीचे
विसरत नाहीत क्षण

कधी सुरपारंब्या
कधी माकड उड्या
बालपणीच करता येतात
अवखळपणाच्या खोड्या

बालपणी काय कळावी
जगण्याची रितभात
स्वप्न मात्र पाहतो
काय व्हावे आयुष्यात

आनंदी आनंद वाटे
फांदीवर झुलताना
हर्षित ही रानपाखरे
स्वच्छंद बागडताना

संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
९९२३४४५३०६

कविता, शौचालय

कविता

🌹शौचालय🌹

अबब!किती मोठा
हा बांधला बंगला
पती-पत्नीच्या,वाटे
स्वप्नांचाच ईमला

महागडे फर्ऩिचर
जसे वाटे प्रसादालय
'बडा घर पोकळ वासा'
त्यात नाही शौचालय

गावात प्रवेशताच
स्वागत होते भाऱी
घरात नाही संडास
याचे दर्शन घडते दारी

आयाबाया,पोरंटोरं
उघड्यावर जाती शौचास
रोगाला आमंत्रण द्यायला
डासांची करतात पैदास

मलेरिया,चिकणगुनिया होतो
डास चावताच माणसाला
शौचालय बांधुन घरोघरी
पळवा त्या रोगराईला

लेकीसुनाचा तरी
विचार करा निदान
शौचालय बांधायला
सरकार देतयं अनुदान

घेवुन लाभ योजनेचा
घरोघरी बांधा शौचालय
निरोगी  भावी पिढीसाठी
वाटावे बांधले मी देवालय

संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद
९९२३४४५३०६
myshikshankatta.blogspot.com