।बालकविता। *रानफुल*
हिरव्यागार शिवारात
गर्द झाडांची दाटी
ठरलेल्या असतात
इथेच रोज गाठीभेटी
अवखळ निरागस
उनाड ते बालपण
आठवांच्या शिदोरीचे
विसरत नाहीत क्षण
कधी सुरपारंब्या
कधी माकड उड्या
बालपणीच करता येतात
अवखळपणाच्या खोड्या
बालपणी काय कळावी
जगण्याची रितभात
स्वप्न मात्र पाहतो
काय व्हावे आयुष्यात
आनंदी आनंद वाटे
फांदीवर झुलताना
हर्षित ही रानपाखरे
स्वच्छंद बागडताना
संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
९९२३४४५३०६
No comments:
Post a Comment