Thursday, June 1, 2017

कविता *शेतकरी आणि संप*

कविता

शेतकरी आणि संप
""""""""""""""""""""""""""
कृषीप्रधान भारत देशात
शेतक-यावर अन्याय होतोय
सर्वांचा अन्नदाता बळीराजा
मात्र स्वत: हाल सोसतोय

शेतक-यांच्या आत्महत्या
ही दुर्दैवाची बाब आहे
अाज देशातील शेतकरी
प्रथमच संपावर जात आहे

कष्टाचा अन् धान्याचाही माझ्या
केलात मातीमोल भाव
व्यापा-यांनी अन् सरकारने लुबाडुन
घातला माणुसकीवर घाव

नको मला सवलत
नको मला आरक्षण
पिकाला हमीभाव देऊन
करावे आमचे संरक्षण

कर्जाच्या ओझ्याखाली
डुंबलंय सारं घरदार
मुलाचं शिक्षण,पोरीचं लग्न
होईल, मी आत्महत्या केल्यावर??

शेतक-यांचा संप ही
देशाची शोकांतिका आहे
भ्रष्टाचार अन् राजकारण
यात कोटिंचा घोटाळा आहे

कृषीप्रधान भारत देशाचा
मी आहे शिल्पकार
शेतक-यांच्या न्यायासाठी
केला संपाचा एल्गार !!

संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद
९९२३४४५३०६

No comments:

Post a Comment