Tuesday, August 15, 2017

My school-My Activity 2017-18

My School-My Activity 2017-18

जि प प्रा शा शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद
***********************************
🇮🇳 * 71 वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमाने साजरा*🇮🇳

🇮🇳शालेय प्रांगणात सकाळी ठीक 7.30 वा. ध्वजा२ोहण करण्यात आले.
🇮🇳यावेळी  सर्व समितीचे सदस्य,ग्रामस्थ,पालक,अंगणवाडीताई,मदतनीस,आशा कार्यकर्ती,सैनिक,मातापालक व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
🇮🇳प्रभातफेरी दरम्यान घोषणा दे०यात आल्या.यात शौचालय व आरोग्य बाबत जागृती करण्यात आली.
🇮🇳ग्रा .पं. कार्यालय शेंडी येथे सरपंच साै कबई वीर यांच्या हस्ते ध्वजारोहण क२ण्यात ओले.
🇮🇳 शिक्षक श्री चौधरी अनिल  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
🇮🇳मुख्याध्यापिका श्रीमती भांडवले संगीता यांनी संकल्प अहवालाचे वाचन केले.
🇮🇳श्री योगेश मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वाटप केले.
🇮🇳समीक्षा वीर,सुप्रिया गुंजाळ,ऐश्वर्या वरकड,सहदेव वीर या विद्यार्थ्यांची प्रेरणादायक भाषणे झाली.
🇮🇳अरुण गुंजाळ,महादेव वीर,सखाराम मोरे,ग्रां पं कार्यालय व अनिल मोरे यांनी विद्यार्थांना खाऊचे वाटप केले.

🇮🇳✍🏻श्रीम. संगीता भांडवले🇮🇳✍🏻
            मु अ.प्रा शा शेंडी ता वाशी..

Wednesday, August 2, 2017

कविता ।।निरोप।।

।।निरोप।।
रम्य आभासी प्रेम दुनिया,सोडुन जात आहे
साश्रुपुर्ण नयनांनी ,अखेरचा निरोप घेत आहे

अनमोल आठवणी सोबतीच्या,ह्वदयात साठवत आहे
जे जे होईल शक्य ते,नयनात जपणार आहे

असहय मुक्या वेदेनचं,मनी थैमान नाचते आहे
विरहाचे जहर माझे,काळीज चिरत आहे

तुझ्या हृदय पटलावर नाव, माझे कोरुन जात आहे
अखेरचा निरोप घेताना,मनी विचारांचे काहुर आहे

भेटशील कधी पुन्हा, या आशेवर जगणार आहे
तुला दिलेेल्या शब्दांना,सत्यात उतरवणार आहे

आलीच कधी आठवण तर,पु्न्हा तिचे स्वागतच आहे
मनाचे दार माझे तुझ्यासाठी ,सतत खुले राहणार आहे

✍🏻संगीता भांडवले✍🏻
       वाशी,उस्मानाबाद