Wednesday, August 2, 2017

कविता ।।निरोप।।

।।निरोप।।
रम्य आभासी प्रेम दुनिया,सोडुन जात आहे
साश्रुपुर्ण नयनांनी ,अखेरचा निरोप घेत आहे

अनमोल आठवणी सोबतीच्या,ह्वदयात साठवत आहे
जे जे होईल शक्य ते,नयनात जपणार आहे

असहय मुक्या वेदेनचं,मनी थैमान नाचते आहे
विरहाचे जहर माझे,काळीज चिरत आहे

तुझ्या हृदय पटलावर नाव, माझे कोरुन जात आहे
अखेरचा निरोप घेताना,मनी विचारांचे काहुर आहे

भेटशील कधी पुन्हा, या आशेवर जगणार आहे
तुला दिलेेल्या शब्दांना,सत्यात उतरवणार आहे

आलीच कधी आठवण तर,पु्न्हा तिचे स्वागतच आहे
मनाचे दार माझे तुझ्यासाठी ,सतत खुले राहणार आहे

✍🏻संगीता भांडवले✍🏻
       वाशी,उस्मानाबाद

No comments:

Post a Comment