आठवणीत द्यावी
अश्रुना मोकळी वाट
डोळ्यात जपावा
दिलेल्या शब्दांचा पाट
🖊संगीता भांडवले🖊
वाशी,उस्मानाबाद
©
आठवणीत द्यावी
अश्रुना मोकळी वाट
डोळ्यात जपावा
दिलेल्या शब्दांचा पाट
🖊संगीता भांडवले🖊
वाशी,उस्मानाबाद
©
।।प्रभातपुष्प।।5
सूंदर दिवसाची सूंदर सुरुवात
दिनकरा तुझ्या आगमनाने
सप्तरंगी नवकिरणात न्हाती
प्रभाती सर्व सृष्टी उत्साहाने
✍🏻संगीता भांडवले
©वाशी,उस्मानाबाद
दि.23-5-2018
।।प्रभातपुष्प।।-2
सकाळचा मंद वारा
धुंदित वाहतो
मोगऱ्याचा सुगंध
चहुदिशास पसरतो
©संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
20-5-2018
रविराज्याच्या आगमनाने
सोनेरी पहाट जाली
स्वागताने धरती
लाजुन आज न्हाली
@
संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
19-5-2018
....🌹'र'प्रत्ययाचे शब्द🌹....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अग्र,आग्रा,आक्रमण,आक्रमक,अग्रगण्य,
आग्रह,उग्र,उपक्रम,एकाग्रता,क्रमांक,क्रम,
क्रमाने,क्रमवार,क्रमशः,खग्रास,गोग्रास,ग्रीस,
ग्रिक,ग्रहण,ग्राह्य,ग्राहक,ग्रह,ग्राम,ग्रामगीता,
ग्रंथ,आग्रीम,त्रास,त्राण,छिद्र,नत्र,सत्र,अत्री,छत्री,
पत्र,पत्री,पत्रिका,मित्र,मैत्री,मैत्रिण,क्षत्रिय,क्षात्र,
प्रकाश,प्रखर,प्रगत,प्रगती,प्रघात,प्रचार,प्रजा,प्रकट,
प्रगट,प्रौढ,प्राण,प्रांत,प्रतिक,प्रचित,प्रतिक्षा,प्रित,प्रिती
,प्रदत्त,प्रथम,प्रथा,प्रथिने,प्राचिन,प्रधान,प्रबळ,प्रभा,प्रभात,
प्रमाण,प्रामाणिक,प्रलय,प्रतवारी,प्रयाण,प्रणव,प्रणाली,
प्रांजली,प्रांजळ,प्राथमिक,प्रार्थना,प्रसंग,प्रासंगिक,प्रसाधन,
प्रमाणक,प्रखर,भ्रम,भ्रमर,भ्रमण,भ्रामक,आभ्र,आभ्रक,शुभ्र,
शुभ्रा,प्रसन्न,प्रज्ञा,प्रज्वल,प्रज्वला,प्रारंभ,प्रारंभिक,इंग्रजी,इंग्रज,
इंद्र,इंद्रा,इंद्रायणी,इंद्राणी,इंद्रधनुष्य,इंम्राण,इभ्रत,प्राकृतिक,प्रकृती,
प्रद्युम्न,प्रशाला,प्रक्षालन,प्रगल्भ,प्रवचन,प्रवर्तक,प्राक्तन,प्राजक्ता,
प्राणायम,प्रभारी,प्रक्षोभ,प्रसारण,प्रतिनिधी,प्रातिनिधिक,नम्रता,नम्र,
नत्र,वक्र,व्यग्र,व्याघ्र,चक्र,चक्रीय,भ्रमंती,भ्रष्ट,भ्रष्टाचार,चंद्र,सुग्रास,सुग्रीव,
साग्रसंगित,संग्रह,संभ्रम,सहस्र,श्रावण,श्रावण,श्राव्य,श्रम,श्रमिक,एकाग्रता,
एकाग्र,संत्री,मंत्री,व्रत,व्रण,व्रात्य,वज्र,वज्रासन,वज्रटिक....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संगीता भांडवले
जि प प्रा शा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद
*रफाराचे शब्द*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~:~
*आर्या,अर्चना, आर्य, आर्वी, अर्ध, कर्क ,कर्म, कर्ज, कर्ण, कार्य,
खर्च, गर्क, गर्ग, गर्क, गर्द, गर्दी,दर्दी, दर्प, पूर्व, मर्फी, मूर्छा, मूर्ती,
वर्म, वर्मी, वर्ण, वर्षा, शौर्य, सर्दी, स्वार्थी, सार्क, अर्थ, अर्ज, गर्मी,
गर्भ, गर्व, चर्म, चर्या, चार्ट, चार्ज, चर्च, चर्चा, ज़र्द, जर्शी,तर्क, दर्द,
धर्मं, पर्ण, मर्ज़ी, मूर्त, वर्क,वर्ग, वर्दी, वर्ष, शार्क, सर्द, सर्च, स्वर्ग,
सर्व, सर्प, अथर्व, अपूर्व,अमूर्त,अर्णव,आर्जव, अर्भक, अर्हता, अर्बन,
कर्कश, कर्मणि, घर्षण, चर्वण, तर्पण, दर्शन, दर्पण,वर्चस्व, वर्णन,
वार्षिक, शर्करा, शीर्षक, शर्वरी, सहर्ष, सुवर्ण, सुपर्णा, तर्प,नर्स,पर्स,
पर्ल,पर्व,फर्म, फार्म, फर्ज़, फार्स,बर्फ, भार्या, मर्द, मार्च, मार्ग, आर्यन,
जर्जर, जर्मन, धार्मिक,नर्तन,नर्तिका,पर्याय, पर्वत,बर्गर, भार्गवी, भार्गव,
मार्मिक, मार्शल, मार्फ़त,आर्मी,अर्थ,अर्क
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌼कविता🌼
🌸माझा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जिल्ह्यात माझ्या तालुके आठ
काय सांगावा एकेकाचा थाट
पहिल्या अंगी उस्मानाबाद.......
भोगावती नदीने दिला छेद
जवळच जैनांची 'धाराशिव'लेणी
पापनाश तिर्थी सितेची न्हाणी ॥१॥
केवढ्याचा सुगंध इथे दरवळतो
याचा उल्लेख रामायणातही आढळतो
गुलाबजामुनात असतो भरपुर खवा
उस्मानाबादी शेळीचे मटनही खावा ॥२॥
हातलाई,येडाईचा डोंगरमळा
भक्ताच्या गळयात कवड्यांच्या माळा
उदोउदोच्या गजराने परिसर दणालला
चैत्री,नवरात्रीला देवीचा जागर केला ॥३॥
दुसरा नंबर तुळजापुराचा.......
महाराष्ट्राच्या भवानी मातेचा
कुलस्वामिनी आई शक्तीपीठ मातेचे
पायी वारी करतात भक्त भवानीचे ॥४॥
नवरात्रींचा नवउत्सव भक्तांनी गजबजतो
घाटशीळ घाटात भक्तीचा महापुर येतो
कुंकाचे कारखाने अन् कवड्यांच्या माळा
नेहमीच भरतो येथे आराध्यांचा मेळा ॥५॥
दिमाखात उभा नळदुर्गचा किल्ला
महाराष्ट्रातील मोठा भुईकोट किल्ला
एकशे चौदा बुरुजावरुन होतसे टेहळणी
नरमादी धबधब्यातुन आजही वाहते पाणी ॥६॥
तिस-या नंबरवर आहे वाशी.....
म्हणतात तिला ज्ञानाची काशी
वासकर घराण्याचा वारसा लाभलेला
वंदुया कर्मवीर मामांच्या शिक्षण कार्याला ॥७॥
चौथ्या नंबरवर भुम तालुका.......
अलंमप्रभुच्या येथे पवित्र पादुका
जैनांचे तिर्थक्षेत्र प्रसिद्ध कुंथलगिरी
खवा अन् पेढ्याची ख्याती दुरवरी ॥८॥
पाचवा नंबर परंडा तालुक्याचा.........
कालभैरवनाथ सोनारी कुलदैवतेचा
माकडांनी सजली सोनारी-कंडारी
परंडा किल्ल्यात तोफा लई भारी ॥९॥
सहावा नंबर उमरगा तालुक्याचा.........
जनावरांचा बाजार प्रसिद्ध 'कसगीचा'
सातवा नंबर कळंब तालुक्याचा......
येडाई डोंगरावर वावर येडेश्वरीचा। ॥१०॥
सर्वात लहान म्हणुन मिरवतो तोरा
आठव्या नंबरचा तालुका लोहारा.....
विकासाचा ध्यास अन् पाऊल प्रगतीचे
लेखणीतुन मांडले महत्व जिल्ह्याचे .... ॥११॥
✍🏻संगीता भांडवले✍🏻
वाशी,उस्मानाबाद
Shared with https://goo.gl/9IgP7