🌼कविता🌼
🌸माझा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा🌸
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जिल्ह्यात माझ्या तालुके आठ
काय सांगावा एकेकाचा थाट
पहिल्या अंगी उस्मानाबाद.......
भोगावती नदीने दिला छेद
जवळच जैनांची 'धाराशिव'लेणी
पापनाश तिर्थी सितेची न्हाणी ॥१॥
केवढ्याचा सुगंध इथे दरवळतो
याचा उल्लेख रामायणातही आढळतो
गुलाबजामुनात असतो भरपुर खवा
उस्मानाबादी शेळीचे मटनही खावा ॥२॥
हातलाई,येडाईचा डोंगरमळा
भक्ताच्या गळयात कवड्यांच्या माळा
उदोउदोच्या गजराने परिसर दणालला
चैत्री,नवरात्रीला देवीचा जागर केला ॥३॥
दुसरा नंबर तुळजापुराचा.......
महाराष्ट्राच्या भवानी मातेचा
कुलस्वामिनी आई शक्तीपीठ मातेचे
पायी वारी करतात भक्त भवानीचे ॥४॥
नवरात्रींचा नवउत्सव भक्तांनी गजबजतो
घाटशीळ घाटात भक्तीचा महापुर येतो
कुंकाचे कारखाने अन् कवड्यांच्या माळा
नेहमीच भरतो येथे आराध्यांचा मेळा ॥५॥
दिमाखात उभा नळदुर्गचा किल्ला
महाराष्ट्रातील मोठा भुईकोट किल्ला
एकशे चौदा बुरुजावरुन होतसे टेहळणी
नरमादी धबधब्यातुन आजही वाहते पाणी ॥६॥
तिस-या नंबरवर आहे वाशी.....
म्हणतात तिला ज्ञानाची काशी
वासकर घराण्याचा वारसा लाभलेला
वंदुया कर्मवीर मामांच्या शिक्षण कार्याला ॥७॥
चौथ्या नंबरवर भुम तालुका.......
अलंमप्रभुच्या येथे पवित्र पादुका
जैनांचे तिर्थक्षेत्र प्रसिद्ध कुंथलगिरी
खवा अन् पेढ्याची ख्याती दुरवरी ॥८॥
पाचवा नंबर परंडा तालुक्याचा.........
कालभैरवनाथ सोनारी कुलदैवतेचा
माकडांनी सजली सोनारी-कंडारी
परंडा किल्ल्यात तोफा लई भारी ॥९॥
सहावा नंबर उमरगा तालुक्याचा.........
जनावरांचा बाजार प्रसिद्ध 'कसगीचा'
सातवा नंबर कळंब तालुक्याचा......
येडाई डोंगरावर वावर येडेश्वरीचा। ॥१०॥
सर्वात लहान म्हणुन मिरवतो तोरा
आठव्या नंबरचा तालुका लोहारा.....
विकासाचा ध्यास अन् पाऊल प्रगतीचे
लेखणीतुन मांडले महत्व जिल्ह्याचे .... ॥११॥
✍🏻संगीता भांडवले✍🏻
वाशी,उस्मानाबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Very nice poem madam
ReplyDeleteSuperb poem Taiji👍👍💐💐💐
ReplyDeleteखुपच सुंदर रचना. मस्तच.
ReplyDeleteउस्मानाबाद जिल्हा वर्णन अप्रतिम
ReplyDeleteखूप छान.. मला तर वाटते असा भूगोल खूपच छान समजेल विद्यार्थ्यांना
ReplyDeleteसंपूर्ण जिल्ह्याचा सारं.....एकदम छान कविता..👌
ReplyDelete