।। मी नाही मेकअप केला।।
💄💋👑
(सर्व महिलांची माफी मागून, सणवार, लग्न सोहळा असो की हळदी कुंकाचा कार्यक्रम, नेहमीच स्त्रियांचा प्रेमळ व तक्रारवजा संवाद, मी नाही मेकअप केला😜😝😜)
घड्याळात वाजला *एक*
मुलांनी मागितला केक
केक करण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। १।।
घड्याळात वाजले *दोन*
आईचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। २।।
घड्याळात वाजले *तीन*
हरवली जावेची पीन
पीन शोधण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। ३।।
घड्याळात वाजले*चार*
नंणंदेचे नखरे फार
नखरे पुरविण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। ४।।
घड्याळात वाजले *पाच*
मुलीने केला नाच
नाच बघण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। ५।।
घड्याळात वाजले* सहा*
सास-याने मागितला चहा
चहा करण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। ६।।
घड्याळात वाजले *सात*
सासूने सांगितला भात
भात करण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। ७।।
घड्याळात वाजले *आठ*
आजेसासुने घेतला हरिपाठ
हरिपाठ घेण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। ८।।
घड्याळात वाजले*नऊ*
टपकली मावस जाऊ
जाऊ बाईंना बोलण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। ९।।
घड्याळात वाजले दहा
मिस्टर घरी आले पहा
मिस्टरला बोलण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।। १०।।
घड्याळात वाजले *अकरा*
मी मारतोय चकरा
चकरा मारण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।।११।।
घड्याळात वाजले *बारा*
घरात पडलाय पसारा
पसारा आवरण्यात एक तास गेला
मी नाही मेकअप केला ।।१२।।
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद