*होळी पेटवून कच-याची! *
*जि प प्रा शाळा कवडेवाडी (वरची)ता.वाशी* येथे पर्यावरण पूरक कच-याची होळी'हा सण साजरा केला.
आज सर्व सोशल मीडियावर होळीचे काऊंट डाउन सुरु आहे. त्यात सर्व जण दंग होवून'होली है'म्हणत एकमेकांना कोपरखळ्या ही मारत आहेत तर काहीजण प्रेमाचे चार शब्दही अर्पण करत आहेत. सध्या प्रत्येक गावात,, गल्ली बोळात, मोठमोठ्या रस्त्यावर एवढेच नव्हे तर माणसांच्या मनामनात ही कचरा साठला आहे. त्याचे प्रदुषण होण्याआधी तो जाळुन टाकूया, असे म्हणत आज २० मार्च च्या होळीत हा कचरा पेटवून सारा निसर्ग स्वच्छ, निर्मळ करुया याच ध्येयाने जि प प्रा शाळा कवडेवाडी वरची ता वाशी येथील विद्यार्थी व सतत नाविन्याचा ध्यास असणा-या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती संगीता भांडवले व श्रीमती सूर्यवंशी अर्चना यांनी या उपक्रमाची सुरुवात स्वत: पासुन करत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. शालेय परिसरातील कच-याची होळी करून होळी हा सण 'काल आणि आज'तो साजरा करण्याची पद्धत व होळी या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
बदलत्या काळानुसार सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यापेक्षा त्यात नाविन्याची भर पडली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. होळीसाठी मोठमोठ्या झाडांची कत्तल करून होळी पेटवण्यापेक्षा कच-याची होळी करा. वाईट विचारांची होळी करा. होळी मध्ये पुरणपोळी टाकण्याऐेवजी गरजु व भुकेल्यास ती पोळी दान करा. कुपोषण रोखण्यासाठी हातभार लावा. असा संदेश देत आज होळी महोत्सव आमच्या शाळेत साजरा केला.
शब्दांकन
श्रीमती संगीता भांडवले
प्र. मु. अ. प्रा शाळा कवडेवाडी वरची
ता वाशी जि उस्मानाबाद
No comments:
Post a Comment