Wednesday, July 22, 2020

बालगीत*आमची मनी*

बालगीत   (मनी)
आमची मनी
आहे गुणी
चेंडु खेळते
घरभर पळते
उंदीर दिसताच 
मागे धावते
सा-या घरात
घालुन गस्त
दुधाचे पातेले
करते फस्त
डोळे तिचे 
फारच छान
कान मात्र
फारच लहान
पिल्ले तिची
गोरीगोरीपान
दिसतात किती
छान छान !
            संगीता भांडवले
       मु.अ.जि.प.प्रा.शा.शेंडी
   ता.वाशी जि.उस्मानाबाद

No comments:

Post a Comment