Wednesday, December 23, 2020

कविता

ची स्पर्धेसाठीची

     🎯।।कविता।।🎯

एक,दोन,......,पाच करत
भुलविलेस त्या अबलांना
वचन देऊन जन्मजन्मांतराचे
का दुखविलेस तिच्या मनाला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।१।।

भुलली तुझ्या सत्याला
भुलली तुझ्या निष्ठेला
ओवाळुन टाकला जीव
भेदुन सा-या परंपरेला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।२।।

का ?खेळलास तिच्या भावनांशी
का?कलंकित केलेस तिच्या शिलाला
का?दिलास छेद तिच्या विश्वासाला
का?जपला नाहीस दिलेल्या शब्दांना
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।३।।

प्रेम हा शब्दच का वांझ झाला
देऊन फसव्या शब्दांचा सहारा
का,कायमचा असा दुरावला
भेटली का सातवी तुला?
आता तरी जप तिला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।४।।

नको असलेल्या शब्दांतुन
का तोडलेस तिला मनातुन
संशयाने दुर का केलेस तिला
तनामनातुन का हाकललेस तिला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।५।।

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment