Monday, March 21, 2022
जागतिक कविता दिन-२१मार्च
Sunday, March 20, 2022
जागतिक चिमणी दिन २० मार्च
माझ्या सप्तरंगी Message ने
पिलांचा एक थवा माझ्याकडे आला
थोडेसे Grains, थोडेसे Cold Water
रोज तुझ्या अंगणात ठेवत जा म्हणाला ।। २।।
काल म्हणे सगळीकडेच अंगणात
दिसत होते थोडेसे Granis आणि पाणी
आमचा photo आणि Video काढायचा
म्हणून नाहीच हुसकावून लावलं कोणी ।। ३।।
माझ्याकडे थोडं सहानुभूतीने बघत
एक chicks हळुच कानी कुजबुजलं
त्याच्या Mind मध्ये साठलेलं सारं दु:ख
त्यानी माझ्याजवळ हलकेच व्यक्त केलं ।। ४।।
माणसांनी आमचं अस्तित्व नष्ट करुन
आमच्या Home वर मिळवलाय ताबा
या Cement च्या जंगलात पुन्हा
भेटतील का गं आमचे आई बाबा ।। ५।।
मोठ मोठी झाडे तोडून माणसांनी
अनेक मजली Building त्यावर बांधले
आमची घरटी ,आमचा संसार मोडून त्यांचे
खरंच होणार आहे म्हणता का चांगले? ।। ६।।
Sister, निदान तु तरी आमच्यासाठी
एक तरी Big Big असं Tree लाव
पुन्हा सावलीचा शोध घेतघेत येऊन
तुझ्या कानी आमचा गुंजवू दे गं कलरव ।। ७।।
कवयित्री
संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
9923445306
21मार्च 2022