Monday, March 21, 2022

जागतिक कविता दिन-२१मार्च

जागतिक कविता दिन-२१मार्च

जागतिक काव्य दिनानिमित्त
कविता लिहावी म्हणते खास
लागण्या  आजचा दिन सार्थकी
माझ्या मनाची पूर्ण व्हावी आस ।। १।। 

याक्षणी माझ्या कवितेने
आसमंत उजळून यावा
शब्द शब्दाने गुंफून तिला
जन्म द्यावा पुन्हा नवा   ।। २।। 

माझ्या कवितेचा मधुर ध्वनी
आसमंतात दरवळावा
तिच्या काव्य मैफिलिचा रंग
जीवनी सप्तरंगी उधळावा   ।। ३।। 

काव्यसुमनांची ओंजळ
आसमंतात रिती व्हावी
कवितेच्या रम्य विश्वात
माझी कविता रमून जावी ।। ४।। 

एकरुप व्हावी माझी काया
काव्य मुलायम सहवासाने
धन्य धन्य व्हावे माझे जीवन
कवितेच्या परिस स्पर्शाने  ।। ५।। 

जागतिक कविता दिनाच्या सर्वांना काव्यमय  शुभेच्छा! 

कवयित्री
संगीता भांडवले 
वाशी ,उस्मानाबाद
9923445306
21मार्च 2022


No comments:

Post a Comment