दिनांक 15/10/2024
पुस्तके मस्त घडवतात .....
शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक जेवढे महत्त्वाचे असतात तितकेच ग्रंथालयही महत्त्वाचे असते.समाज घडवण्याचे काम शाळा करते. त्यासाठी शाळानी समृद्ध ग्रंथालयाची वाट चालण्याची गरज आहे .शालेय स्तरावर होणारे वाचन संस्कार जीवनभर टिकतात .शैक्षणिक गुणवत्ता विकासात ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शालेय जीवनात पुस्तकांचा परिचय झाला तर भविष्यात समाज वाचनाचे आकर्षण मुलांमध्ये निर्माण होईल. जो समाज वाचतो तो अधिक प्रगत होतो. त्या समाजात शहाणपण, विवेक पेरण्याचे काम पुस्तके करतात. त्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक प्रगत राष्ट्रांनी समाज समृद्धतेसाठी शाळा, महाविद्यालयाबरोबर गावागावात ही ग्रंथालय निर्मिती करण्यावर भर दिला आहे. फ्रान्स सारख्या देशात जगातील सर्वात मोठे ग्रंथालय निर्माण केले होते. माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा यांच्या इतकीच पुस्तकांची आणि वाचनांची गरज आहे. लिओ टॉलस्टॉय यांनी म्हटले आहे की माझ्या जीवनात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते म्हणजे पुस्तक ,पुस्तक आणि केवळ पुस्तकच .महानतेची वाट चालणाऱ्या माणसांच्या आयुष्यात पुस्तकाचे मोल किती महत्त्वाचे आहे हे माणसाची चरित्र वाचले की पुस्तकांचे स्थान अधोरेखित होते.वाचन हा एक आनंददायी अनुभव आहे.त्यासाठीचे संस्कार करण्यासाठी शाळा,महाविद्यालयासारखे दुसरे स्थान नाही.मिसाइल मॅन, थोर शास्त्रज्ञ,भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलामसारखा माणूस जीवनभर पुस्तकांच्या प्रेमात होता.पुस्तकांनी आपल्याला जीवनभर मूल्यांच्या आणि नैतिकतेच्या वाटेवर घेऊन जाण्याची प्रेरणा दिली आहे म्हणून राष्ट्रपती भवन सोडताना त्यांनी सोबत केवळ आपली पुस्तके बाळगली होती.त्यांच्या आयुष्यात तीन पुस्तकांचा मोठा प्रभाव होता. त्यातील ' कुरल' नावाचे एक पुस्तक होते. त्या पुस्तकांनी त्यांना अधिक शक्ती देत मूल्याधिष्ठित जगण्यासाठी बळ दिले आहे.आज आपला समाज पुस्तकापासून दुरावला आहे याचे प्रमुख कारण म्हणजे माहिती तंत्रज्ञान,सोशल मीडियाचा अतिवापर.त्यामुळे सध्या लोकांच्या साक्षरतेचा आलेख उंचावत असला तरी मात्र पुस्तके वाचकांची संख्या घटत आहे .13_ 14 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्याची अवस्था तर विचार करायला लावणारी आहे एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकाशिवाय आपल्याला दुसरे काही नको म्हणून सांगायचे.आयुष्यात सारे गेले तरी चालेल पण पुस्तके जाता कामा नयेत असे म्हणत होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे ही सतत आपल्या सोबत पुस्तकांची सोबत करत होते.ज्यांच्या हाती पुस्तके होती त्यांनी जीवनभर समाजाच्या विकासाचा आणि उन्नत व्यवस्थेचा विचार केला.आजची हरवलेली व्यवस्था जर पूर्णस्थापित करायचची असेल तर आपल्याला केवळ वाचन प्रेरणा दिनाचा इव्हेंट न करता वाचता समाज निर्मितीची पावले उचलावी लागणार आहेत.
श्रीमती भांडवले संगीता
मुख्याध्यापिका
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडेवाडी व.
तालुका वाशी, जिल्हा धाराशिव
9923445306