Thursday, November 24, 2022

वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन

💐 *15 ऑक्टो -2022💐*आपल्या बहुमूल्य संशोधनाने भारताला अग्निपंखाचे बळ देणारे थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती 🥇*भारतरत्न 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम'* *यांच्या जन्म दिना निमीत्त जि. प प्रा शाळा कवडेवाडी( व)  ता.वाशीच्या वतीने विनम्र अभिवादन*
💐🌹💐🌹 
*आणि जागतिक हात* 
*धुवा दिन व  वाचन प्रेरणा दिना निमीत्त सर्वांना सस्नेह शुभेच्छा* -
🌹💐🌹💐🌹💐🙏

माझी शाळा माझा उपक्रम - आकाश कंदिल तयार करणे

*माझी शाळा - माझा उपक्रम*
जि प प्रा शाळा कवडेवाडी (व) ता. वाशी.
💫💫💫💫💫💫💫
*उपक्रमाचे नाव - आकाश कंदिल तयार करणे*
सहभागी विद्यार्थी -
*इयत्ता पहिली ते पाचवी*.
💫💫💫💫💫💫💫
मार्गदर्शक - 
*श्रीमती. भांडवले एस.यू*.
💫💫💫💫💫💫💫

माझी शाळा माझा उपक्रम -भेटकार्ड तयार करणे

*माझी शाळा - माझा उपक्रम*
जि प प्रा शाळा कवडेवाडी (व) ता. वाशी.
💫💫💫💫💫💫💫
*उपक्रमाचे नाव - 
*भेटकार्ड  तयार करणे*
सहभागी विद्यार्थी -
*इयत्ता पहिली ते पाचवी*.
💫💫💫💫💫💫💫
मार्गदर्शक - 
*श्रीमती. भांडवले एस.यू*.
💫💫💫💫💫💫💫

आधी केले मग सांगितले

*आधी केले मग सांगितले*
💫💫💫💫💫💫💫      हा आमच्या शाळेतील इयत्ता पाचवी चा  विद्यार्थी *योगेश सावंत* हुशार,चुणचुणीत व प्रामाणिक,नेहमी इतरांना मदत करणारा..प्रत्येक कामात अग्रेसर असणारा..आज काही कामानिमित्त माझ्या घरी आलेला..तर माझ्या दिवाळ सणाची खरेदीच,.याला एक सुंदर ड्रेस व चप्पल घेऊन  केली...योगेश व त्याची आई दोघेच राहतात.आई रोज मजुरी करते...मग चला आपणही अशा गरजूंना मदत करून ..थोडासा का होईना मदतीचा हात देऊन ही दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करू या..

*श्रीमती भांडवले एस. यू.*

Friday, November 18, 2022

My School-My Activity.. माझी शाळा माझा उपक्रम.. पुस्तक अभिप्राय - सारांश लेखन

*My School-My Activity*
माझी शाळा -माझा उपक्रम
📚📚📚📚📚📚📚
*जि. प प्रा शाळा कवडेवाडी व. ता.वाशी*

   आज आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गोष्टीच्या पुस्तकाचे वाचन करून सारांश लेखन शिक्षकांच्या मदतीने केले.पुस्तक देवघेव कु.अंकिता एकाळ इ.४थी व कु.स्वरांजली कवडे इ.३री यांनी केले.
📚📚📚📚📚📝📝

Monday, March 21, 2022

जागतिक कविता दिन-२१मार्च

जागतिक कविता दिन-२१मार्च

जागतिक काव्य दिनानिमित्त
कविता लिहावी म्हणते खास
लागण्या  आजचा दिन सार्थकी
माझ्या मनाची पूर्ण व्हावी आस ।। १।। 

याक्षणी माझ्या कवितेने
आसमंत उजळून यावा
शब्द शब्दाने गुंफून तिला
जन्म द्यावा पुन्हा नवा   ।। २।। 

माझ्या कवितेचा मधुर ध्वनी
आसमंतात दरवळावा
तिच्या काव्य मैफिलिचा रंग
जीवनी सप्तरंगी उधळावा   ।। ३।। 

काव्यसुमनांची ओंजळ
आसमंतात रिती व्हावी
कवितेच्या रम्य विश्वात
माझी कविता रमून जावी ।। ४।। 

एकरुप व्हावी माझी काया
काव्य मुलायम सहवासाने
धन्य धन्य व्हावे माझे जीवन
कवितेच्या परिस स्पर्शाने  ।। ५।। 

जागतिक कविता दिनाच्या सर्वांना काव्यमय  शुभेच्छा! 

कवयित्री
संगीता भांडवले 
वाशी ,उस्मानाबाद
9923445306
21मार्च 2022


Sunday, March 20, 2022

जागतिक चिमणी दिन २० मार्च

जागतिक चिमणी दिन २० मार्च
     
जागतिक Sparrow day
कालच म्हणे साजरा झाला 
इतर days प्रमाणेच त्यालाही
शुभेच्छांचा वर्षाव खुप झाला  ।। १।।

माझ्या सप्तरंगी Message ने
पिलांचा एक थवा माझ्याकडे आला
थोडेसे Grains, थोडेसे Cold Water
रोज तुझ्या अंगणात ठेवत जा म्हणाला  ।। २।।

काल म्हणे सगळीकडेच अंगणात
दिसत होते थोडेसे Granis आणि पाणी
आमचा photo आणि Video काढायचा
म्हणून नाहीच हुसकावून लावलं कोणी  ।। ३।।

माझ्याकडे थोडं सहानुभूतीने बघत
एक chicks हळुच कानी कुजबुजलं
त्याच्या Mind मध्ये साठलेलं सारं दु:ख
त्यानी माझ्याजवळ हलकेच व्यक्त केलं ।। ४।।

माणसांनी आमचं अस्तित्व नष्ट करुन
आमच्या Home वर मिळवलाय  ताबा
या Cement च्या जंगलात पुन्हा
भेटतील का गं आमचे आई बाबा  ।। ५।।

मोठ मोठी  झाडे तोडून माणसांनी
अनेक मजली Building त्यावर  बांधले
आमची घरटी ,आमचा संसार मोडून त्यांचे
खरंच होणार आहे म्हणता का चांगले?  ।। ६।।

Sister, निदान तु तरी आमच्यासाठी
एक तरी Big Big  असं Tree लाव
पुन्हा सावलीचा  शोध घेतघेत  येऊन
तुझ्या कानी आमचा  गुंजवू दे गं कलरव  ।। ७।।

कवयित्री
संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
9923445306

21मार्च 2022