जागतिक एडस दिनानिमित्त-
*भरकटलेली युवापिढी*
दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणुन पाळला जातो. जगभर फैैलावलेल्या एडस (Acquired immune Definitely Syndrome)या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी यासाठी जागतिक राष्ट्रसंघाने UNO(United Nations Organization)घोषित केले आहे.१९८१साली एडस या रोगाचा पहिला रुग्ण आढळला.आणि त्या नंतर वेगाने या रोगाचा फैलाव संपुर्ण जगभरात झाला.या रोगाची कारणे,लक्षणे व उपाय सापडलेत पण अजुनही हा रोग संपु्र्णपणे बरा होण्यासाठी एखादी लस शोधण्यास संशोधकास अपयश आले आहे.म्हणुन यावरती खबरदारी हाच उपाय आहे. म्हणुनच जागतिक पातळीवर सर्वात महाभयंकर रोग म्हणुन या रोगाकडे पाहिले जाते.
समाजामध्ये बदल घडवुन आणण्यासाठी युवाशक्तीच महत्वाचा वाटा उचलु शकते.भारतातील युवाशक्ती ही अन्य शक्तीपेक्षा प्रभावशाली आहे.जगाला विळखा घालु पहात असलेल्या 'एड्स'या आजाराला थोपविण्यासाठी युवाशक्ती हातभार लावु शकते.जगात एडस या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. १९९८ अखेर ३३४ लाख व्यक्तिंना एच.आय.व्ही.विषाणुंची बाधा झाल्याचे वैद्यकिय अहवालावरुन दिसुन येते.या रोगाचा प्रसार होण्यामागे याबाबतचे असलेले अज्ञान दुर करणे आवश्यक आहे. युवापिढी नेहमी धोका पत्करण्यामध्ये अग्रेसर असतात.परंतु त्यांचे मन संस्कारक्षम असते.पालकांनी योग्य वयातच त्यांच्यावर संस्काराची बिजे रुजविण्याचे काम करणे गरजेचे आहे. युवकांमध्ये या रोगाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
परंतु हीच बाब सध्या चिंतेचा विषय बनत चाललेली आहे.आजचा युववर्ग हा चुकीच्या मार्गाने जात आहे. पालकांकडे असणारा पैसा व ही चैनी मुले यातुन अनेक गंभीर बाबींना सामोरे जावे लागत आहे.त्याचे वेळोवेळी समुपदेशन होणे गरजेचे अाहे पण तसे होताना दिसत नाही.किशोरवयीन वयापासुनच मानवी लैंगिकता व लैंगिक संबंधातुन पसरणारे आजार आणि एच आय व्ही जंतुसंसर्ग याबाबतची माहीती त्यांच्या या जडणघडणीच्या काळातच होणे अपेक्षित आहे.परंतु पालक व शिक्षक यांनी या तरुणाईला लैंगिकतेबाबत चर्चा व योग्य व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे.
'जवान हुँ,नादान नहीं'हे तरुण वर्गाने बोलायला शिकले पाहिजे.आजची युवापिढी देशाचे उज्वल भविष्य समजले जाते परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपुर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवापिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे.युवापिढी पार भरकटली आहे.शरीराला अपायकारक असणा-या तंबाखु,सिगारेट आदि व्यसनांच्या विळख्यात युवक गुरफटलेले आहेत.हा व्यसनांचा विळखाच युवापिढीला अत्यंत घातक ठरत आहे.सध्या या तरुणाईवर सिनेमा,मिडीया,सोशल नेटवर्किंग साईट यांचाच प्रचंड प्रभाव आहे पण त्याचबरोबर देशामध्ये चाललेले पाश्च्यात्याचे अंधानुकरण आणि आपल्या संस्कृतीला प्रतिगामी ठरवुन खोट्या जीवन पद्धतीचा
'पुरोगामी' म्हणुन समावेश केला जात आहे. सिनेमा,मिडिआ,तसेच राजकारणी वर्ग यांचा पण या युवापिढीला भरकटण्यास हातभार आहे असे म्हणले तर वावगे होणार नाही.
एडस या आजारावर अजुनही म्हणावे तसी लस उपलब्ध नाही,परंतु सुरक्षिततेच्या सवयी व आरोग्यामय जीवनशैलीचा अंगीकार करुन तो सहज टाळता येतो.तरुण अवस्थेत मुले जास्त जंतुसंसर्गप्रणव असतात.मानवी लैंगिकतेबाबत त्यांना अधिक कुतुहल असते.वाईच संगतीमुळे मुले या मार्गाकडे जावु शकतात.हे रोखण्यासाठी जनजागृती व प्रतिबंध केला पाहिजे.
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
मोबाईल नं९९२३४४५३०६
No comments:
Post a Comment