।।मोगरा।।
सुकला पालापाचोळा
आला कडक उन्हाळा
ठेवुन दाणापाणी अंगणात
पक्षांप्रती दाखवा जिव्हाळा!
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
।।मोगरा।।
सुकला पालापाचोळा
आला कडक उन्हाळा
ठेवुन दाणापाणी अंगणात
पक्षांप्रती दाखवा जिव्हाळा!
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
कविता
*आठवणीतील साडी*
तु घेतलेली,
पिवळ्या रंगाची
नक्षीदार वेलबुट्टीची
सोनेरी काठाची
आठवणीतील साडी
जरी झाली ती जीर्ण
लावीन आठवणींचे ठिगळ
तुझी आठवण जपण्यासाठी
करील ऊबदार वाकळ
त्या वाकळीतुन मिळेल
ऊब तुझ्या स्पर्शाची
तुझी आठवण मात्र
बोलेन माझ्या कानाशी
जरी झाली तिची लक्तरे
करील मी पायपुसणे
पाय त्यावर ठेवताच
आठवतील दुभंगलेली मने
जरी झाल्या तिच्या चिंध्या
दुपटे करील नातवाला
तुझ्या हळुवार स्पर्शाची
जाणीव होईल त्याला
संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद