Thursday, March 2, 2017

कविता \\आठवणीतील साडी//

कविता
  *आठवणीतील साडी*

तु घेतलेली,
पिवळ्या रंगाची
नक्षीदार वेलबुट्टीची
सोनेरी काठाची
आठवणीतील साडी

जरी झाली ती जीर्ण
लावीन आठवणींचे ठिगळ
तुझी आठवण जपण्यासाठी
करील ऊबदार वाकळ

त्या वाकळीतुन मिळेल
ऊब तुझ्या स्पर्शाची
तुझी आठवण मात्र
बोलेन माझ्या कानाशी

जरी झाली तिची लक्तरे
करील मी पायपुसणे
पाय त्यावर ठेवताच
आठवतील दुभंगलेली मने

जरी झाल्या तिच्या चिंध्या
दुपटे करील नातवाला
तुझ्या हळुवार स्पर्शाची
जाणीव होईल त्याला

संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद

No comments:

Post a Comment