कविता
*नातं मैत्रीचं*
स्वच्छ निरभ्र आकाश
चंद्राचं शितल चांदणं
डोळ्यासमोर उभारला
आपल्या मैत्रीचा तो क्षण
किती स्वप्ने पाहिली
दोघांनी मिळुन सजवलेली
हरेक भेटीची आठवण
त्यात होती साठवलेली
कधी रुसवा,कधी फुगवा
झाली कधी कडाक्याची भांडणे
अापल्या विचारांच्या तफावतीत
दुखवली गेली एकमेकांची मने
नाटकी,चतुर,हजरजबाबी
उपमा ही खुप दिल्यास
सुंदर, निरागस,घरंदाज
अशा उपाधीही लावल्यास
सारेच कसे स्वप्नवत झाले
सर्व क्षण डोळ्यासमोर आले
झाल्या गेल्या प्रसंगांना
आज पुन्हा उजाळले
नाते आपुले मैत्रीचे
असेच चिरंतन राहु दे
माझ्या अस्तित्वाची उणीव
सतत तुुला भासु दे.....
.....संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
No comments:
Post a Comment