Monday, July 31, 2017

My school-My Activity 2017-18

My school-My Activity  2017-18

*विद्यार्थी वाढदिवस साजरा करणे*

आज दि ३१/७/२०१७ रोजी कु.समीक्षा रामचंद्र वीर इ.४थी हिचा वाढदिवस शालेय परिपाठात साजरा केला.सर्व मित्र मैत्रीणिंने शुभेच्छा दिल्या.समीक्षा ने सर्वांना चॉकलेट दिले.वाढदिवस म्हंटलं की मुले खुप आनंदी असतात ना!
   या सर्वांचे  माझ्या कँमे-यात कैद आजचे हसरे क्षण....

शब्दांकन..

संगीता भांडवले
मुख्याध्यापक
जि प प्रा शा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद

Sunday, July 30, 2017

ध्यास ।आठोळी।


_______________

🌹ध्यास🌹
==============

मनी ध्यास घेतला
विद्यार्थी प्रगत करण्याचा
रुजवून ज्ञानरचनावाद
महाराष्ट्र प्रगतीकडे नेण्याचा

मनी ध्यास घेतला
गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्याचा
डिजीटल वर्ग,डिजीटल शाळा.
वापर माहीती तंत्रज्ञानाचा.!

✍🏻संगीता भांडवले✍🏻
     वाशी,उस्मानाबाद

*

Shared with https://goo.gl/9IgP7

Saturday, July 29, 2017

प्रथम क्रमांक प्राप्त चारोळी

*==============
मनभावन माझा श्रावण
सप्तरंगाने  सजला
श्रावणसरींनी शृंगारले
हिरव्यागार वसुंधरेला

   ✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
     दि २७/७/२०१७*

चारोळी

जागतिक लोकसंख्या दिन ११जलै

कविता,॥निरोप॥

कविता,॥झोका॥

कविता,॥श्रावण॥

कविता   

।।श्रावण।।

हिरवा श्रावण
अंगणात आला
पारिजात फुलांचा
सडा पडला

हिरवा श्रावण
हिरवा शिवार
धरणी मायेचा
साज शृंगार

हिरवा श्रावण
फुलली गवतफुले
फुलपाखरांसह
आनंदी मुले

हिरवा श्रावण
पूर्वेला तांबुसलाली
सणावाराची
रेलचेल झाली

हिरवा श्रावण
आला श्रावण
सुवासिनिंच्या
आनंदाला उधाण

हिरवा श्रावण
पंचमीचा झोका
नाच गाण्यावर
धरला ठेका

हिरवा श्रावण
बहीणभावाच्या
पावित्र नात्याचा
सण रक्षाबंधन

हिरवा श्रावण
सप्तरंगाने सुजला
ऋतु हवाहवासा
वाटे मजला

संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
९९२३४४५३०६

Thursday, July 27, 2017

My school-My Activity-2017-2018

मेहंदी रेखाटन

*नागपंचमी सणानिमित्त संगीता भांडवले यांनी सर्व मुलींना मेहंदी काढली.

मु अ
प्रा शा शेंडी

Tuesday, July 25, 2017

चित्रचारॊळी

🌹साहित्य स्पंदन समुह ,कुही आयोजित🌹
🎯चित्रचारोळी स्पर्धा,दिः25/7/2017🎯 ============================
ना घर,ना दार
आम्ही अनाथ बालक
मायेचा देऊन हात
कुणी होईल का पालक?

✍🏻संगीता भांडवले✍🏻
      वाशी,उस्मानाबाद
Shared with https://goo.gl/9IgP7

Saturday, July 22, 2017

Thursday, July 20, 2017

My School - My Activity-2017-18

🌹My school-My Activity _2017-18🌹
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,.,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*जि .प.प्रा.शाळा शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*उपक्रमाचे नाव:विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करणे.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कु.सुप्रिया गुंजाळ इ.४थी

हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

सर्व वर्गमित्र व शिक्षकवृंद

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Monday, July 17, 2017

My school-My Activity

My school - My Activity--2017-I8
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जि . प .प्रा .शाळा शेंडी ता .वाशी जि .उस्मानाबाद
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    
    शब्द_चित्रवाचन

इ.१ली
वाचन पुर्व तयारी
चित्रावरून शब्द सांगणे.
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

संगीता भांडवले
मुअ प्रा शा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद