Saturday, July 29, 2017

कविता,॥श्रावण॥

कविता   

।।श्रावण।।

हिरवा श्रावण
अंगणात आला
पारिजात फुलांचा
सडा पडला

हिरवा श्रावण
हिरवा शिवार
धरणी मायेचा
साज शृंगार

हिरवा श्रावण
फुलली गवतफुले
फुलपाखरांसह
आनंदी मुले

हिरवा श्रावण
पूर्वेला तांबुसलाली
सणावाराची
रेलचेल झाली

हिरवा श्रावण
आला श्रावण
सुवासिनिंच्या
आनंदाला उधाण

हिरवा श्रावण
पंचमीचा झोका
नाच गाण्यावर
धरला ठेका

हिरवा श्रावण
बहीणभावाच्या
पावित्र नात्याचा
सण रक्षाबंधन

हिरवा श्रावण
सप्तरंगाने सुजला
ऋतु हवाहवासा
वाटे मजला

संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
९९२३४४५३०६

No comments:

Post a Comment