कविता
।।अंतरीच्या वेदना।।
पापणीत वाहतात
अश्रु बनुन
मोत्यासम.....
गालावर घरंगळतात
अंतरीच्या वेदना कधी
मुक कधी बोलक्या
सखीसवे गुज करता
आपसुक ओघळतात
तुच निंव माझ्या
अंतरीच्या वेदनेची
येईल का कीव
माझ्या बेचैन मनाची
कधी मिटतील
आपल्यातील दुरावे
अंतरीच्या वेदनेला
सांग कसे सावरावे
तुला कधी कळतील
माझ्या अंतरीच्या वेदना
माझ्या ओठांतुन आज
शब्दही फुटेना
अंतरीच्या वेदनांना
नको शब्दांचा घाट
तुझ्यासोबत संवादाची
शोधत बसलेय वाट
✍🏻 संगीता भांडवले✍🏻
वाशी,उस्मानाबाद
9923445306
No comments:
Post a Comment