Sunday, December 10, 2017

कविता। सहज येऊन जाते ओठावर...

कविता

...सहज येऊन जाते ओठावर....

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
भाव प्रेमाचे दिसतात
तिच्या निरागस चेह-यावर  ।।1॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
तिचे अस्मानी सौंदर्य खुलते
गालावर खळी पडल्यावर  ॥2॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
भाळलो होऊन प्रेमवेडा मी
तिच्या साैज्वळ शालिन रूपावर ॥3॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
तिच्या  सौभाग्य साजशृंगाराने
माझा जीव तळमळल्यावर   ॥4॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
अंगणातील मोगऱ्याचा
केसात गजरा माळल्यावर  ॥5॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
तिच्या गोड आठवणींना
कवितेत शब्दबद्ध केल्यावर। ॥6॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
तिच्या मृगनयनात स्वप्ने
भावी आयुष्याची पाहिल्यावर  ॥7॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
नजरेने नजरेची भाषा
माझ्याशी काही बोलल्यावर ॥8॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
माझ्या शब्दाने झाली दुःखी
तरीही मला बिलगल्यावर  ॥9॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
भेटीच्या आठवणी कोरलेत
माइया हृदय पटलावर      ॥10॥

सहज येऊन जाते ओठावर
कविता तिला पाहिल्यावर...
आठवणीच्या डायरीतील पाने
पुनःपुन्हा चाळल्यावर            ॥11॥

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी,उस्मानाबाद
९९२३४४५३०६

No comments:

Post a Comment