Tuesday, December 12, 2017

कविता ।। स्वच्छ भारत।।

कविता ॥स्वच्छ भारत॥
________________________
स्वच्छ भारत,सुंदर भारत
देऊ आपण नारा
हाती घेऊन खराटा
गांव झाडु सारा     ।।१॥

स्वच्छ भारत,सुंदर भारत
प्रत्यक्षात साकारुया
प्लँस्टिकचा वापर टाळुन
गाव कॅरिबॅगमुक्त कुरुया   ।।2॥

स्वच्छ भारत,सुंदर भारत
प्लॅस्टिकचे प्रदुषण टाळूया
कापडी पिश०या वापरुन
पर्यावरणाचे रक्षण करुया   ॥3॥

स्वच्छ भारत,सुंदर भारत
स्वच्छतेचा संदेश देऊया
शौचालयाचा करून वापर
गांव हागणदारीमुक्त करुया  ॥4॥

स्वच्छ भारत,सुंदर भारत
स्वच्छतेचा करून पुकारा
स्वच्छ़ परिसर ठेवून
रोगराईला दूर करा   ॥5॥

स्वच्छ भारत,सुंदर भारत
संदेश आहे मौल्यवान
अभिमानाने म्हणूयात
माझा देश महान    ॥6॥

संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
९९२३४४५३०६

No comments:

Post a Comment