Wednesday, November 27, 2019

दुहेरी चारोळी, ।।भिजली सुगी।।

*स्पर्धेसाठी दुहेरी चारोळी*(तृतीय क्रमांक प्राप्त)

*विषय:भिजली सुगी*

परतीच्या पावसानं
होत्याचं  नव्हतं केलं
सोयाबीन, कापुस, मका
संमदं  संमदं वाहून गेलं

भिजलेली सुगी सारी
दुष्काळ पडला ओला
दिनरात एकच चिंता
कसा जगवू जित्राबाला

श्रीमती भांडवले संगीता
वाशी, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment