।। महाशिवरात्र।।
वाहून बेलाचे पान
पूजा करावी शिवाची
घालून रुद्राक्षाच्या माळा
करावी आरास शुभ्र फुलाची ।। १।।
शाळुंका, बेल, फूल
शिव पिंडीवर वहावे
धोत्रा, आंबा पत्री सह
शिव पूजन करावे ।। २।।
घालून पंचामृत स्नान
शिव पिंडीस पूजावे
नको हळद कुंकुम
भस्म मात्र वापरावे ।। ३।।
महाशिवरात्रीला शिवाला
करुन पंचगव्याचा अभिषेक
मग द्यावा शिव पिंडीवर
सुंदर पंचामृताचा लेप ।। ४।।
शिव पिंडीला शिवभक्तांनी
अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी
ॐ नमो:शिवाय च्या मंत्राने
जपमाळ पूजा करावी ।। ५।।
तांदूळ पिठीच्या २६ दिव्यांनी
शिवाचे औक्षण करावे
त्यावेळीच १०८ दिवे
दान सुद्धा करावे ।। ६।।
श्रीमती भांडवले संगीता
वाशी, उस्मानाबाद
No comments:
Post a Comment