।। लेक लाडकी या घरची।।
हिरवा चुडा सौभाग्याचा
शोभे गव्हाळ रंगाला
लेक माझ्या सानुलीच्या
हळद लागली अंगाला ।। १।।
मळवट शोभतो भाळी
मोती अन् लाल कुंकवाचा
कन्यादान करुन जाईल
तुकडा माझ्या काळजाचा ।। २।।
सजलेल्या नवरीला
व-हाडी पाहू लागली
कळलेच नाही कधी
बाळ मोठी केंव्हा झाली ।। ३।।
लेकीमुळेच अंगण माझे
सदोदित हसरे दिसायचे
मुलगी परक्याचे धन म्हणत
आता सारे विसरायचे ।। ४।।
लेकीमुळे मायबापाचं
काळीज थोडं थोडं तुटतं
लेक लाडकी या घरची म्हणत
मनाला समजायचं असतंं ।। ५।।
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
No comments:
Post a Comment