Monday, August 15, 2016

माझी शाळा-माझा उपक्रम

🔵 *माझी शाळा माझे उपक्रम* 🔵

🇮🇳  *स्वातंत्र दिन उत्साहात साजरा*🇮🇳

🇮🇳 *जि.प.प्रा.शा.शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*🇮🇳

🇮🇳 *आज जि.प .प्रा.शा.शेंडी येथे स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.*

🇮🇳 *सकाळी प्रभात फेरीने सुरवात झाली.*

👬  *गावातील परीसर विद्यार्थी घोषणांनी  दुमदुमला.*

🇮🇳  *सर्व विद्यार्थीनींनी देशभक्तीपर गीते सादर केली.*

🇮🇳 *शाळेतील ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायतच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.*

🇮🇳  *या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्द्ल *मराठी,हिंदी,इंग्रजी*  *भाषेत आपले मनोगत व्यक्त केले व उपस्थित पालक व गावकरी यांची मन जिंकुन घेतली.यात ११ विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतुन  अस्खलित भाषणे केली.*

🇮🇮🇳 *मुख्याध्यापिका संगीता भांडवले यांनी शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांची व शासकिय योजनांची माहीती दिली.*

🇮🇳 *ई-लर्निंगसाठी निधी संकलीत करुन लवकरच हे युनिट आपण शाळेत कार्यान्वित  करणार आहोत यासाठी निधी सढळ हाताने देण्यासाठी आवाहन करण्यात आले.*

🇮🇳 *शाळेतील चांगल्या बाबी ग्रामस्थांसमोर मांडत, शाळेला असणा-या उणिवांची व त्यावरील उपाययोजनांची  चर्चा करण्यात आली.*

🇮🇳 *प्रेरक सौ मनिषा मोरे यांनी आपले विचार व्यक्त करत शाळेचे बदललेले स्वरुप ग्रामस्थांसमोर मांडले, व संगीता भांडवले यांच्यावर तयार केलेले काव्य वाचन केले.*

💥 *देशभक्तीपर गीत सादर करणाऱ्या व भाषण करणा-या विद्यार्थ्यांना सरपंच  सौ. कबई वीर व उपसरपंच  सतीश मोरे यांनी रोख स्वरुपात बक्षिस दिले.*

🇮🇳 *कार्यक्रमाचे प्रास्ताविक चौधरी अनिल यांनी केले.*

🍫 *विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व उपस्थितांना चहापान करून कार्यक्रमाची सांगता झाली.*

🇮🇳 *याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती,ग्रामस्थ व युवक  वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.*

🇮🇳 *ग्रामस्थांनी  केलेल्या कौतुकामुळे ऊर् भरुन आला व मिळालेल्या प्रेरणेतुन पुढील कार्यास ऊजा मिळाली.*

,🇮🇳 *आम्हाला नेहमीच साथ, पाठिंबा नि पाठबळ  देणा-या पालकांचे व सर्व आनंदी विद्यार्थ्यांचे तसेच  सहकार्य करणा-या सर्व हितचिंतकाचे मनस्वी आभार.*

🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
            
          ✍🏻संगीता भांडवले✍🏻
            मु अ जि प प्रा शा शेंडी
             ता वाशी जि उस्मानाबाद
             myshikshankatta.blogspot.com

No comments:

Post a Comment