--------------------------------------------------
जि प प्रा शाळा कवडेवाडी व ता वाशी जि उस्मानाबाद
--------------------------------------------------
उपक्रम:टिश्यू पेपर पासून मोग-याचा गजरा किंवा हार बनविणे.
सहभाग:इ ४थी व इ ५वी विद्यार्थी
मार्गदर्शक शिक्षक:श्रीमती भांडवले संगीता
साहित्य:
टिश्यू पेपर, कात्री,फेवीकॉल, थर्मोकॉल गोळ्या, रंग, ब्रश, सुई व दोरा.
कृती:
टिश्यू पेपर चे २×२ चे तुकडे घ्या. मध्ये थर्मोकॉलची गोळी घालून पिळ द्या. मोगरा कळी प्रमाणे दिसेल. पिळदार भाग देठाप्रमाणे दिसेल. त्या देशात ब्रशच्या सहाय्याने रंग द्या. या रंगात थोडेसे पाणी व फेवीकॉल मिसळा. या प्रमाणे सर्व कळ्या बनवा. सुईदो-याच्या सहाय्याने हार बनवा. सुंदर गजरा/हार दिसेल.
या उपक्रमाचा व्हिडिओ आपणास माझ्या YouTube channel वर पहावयास मिळेल.
व्हिडिओ आवडल्यास like, share &subcribe करा.
खाली लिंक दिली आहे. 👇
(https://youtu.be/nxXrBvwVjO4)
उपक्रम निष्पत्ती:
१ ) विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला.
२) स्वनिर्मितीतून आनंदानुभूती.
३) सहकार्याची भावना वाढीस लागली.
४) कला, कार्यानुभव विषयांतर्गत उपक्रम-( उत्पादक उपक्रम)
No comments:
Post a Comment