Wednesday, August 10, 2016

महिलांचे स्वातंत्र्य

💃 *महिलांचे स्वातंत्र्य* 💃�
--------------------------------------------------------------------
स्वातंत्र्य मिळुन६९ वर्षे झाली.तरी आजची स्त्री ही म्हणावी तेवढी स्वतंत्र आहे का? याचा शोध घेण्याची वेळ माझ्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रिला आली याची खंत वाटतेय.इंग्रजांच्या पारतंत्र्यातुन,गुलामगिरीतुन आपला देश स्वतंत्र झाला खरा पण आपल्याच घरात कोणत्याही निर्णयाचे स्वातंत्र्य नसलेल्या ,पुरुषांची गुलामगिरी सहन करणा-या आज कितीतरी स्त्रिया सापडतील.मग ख-या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत का??
          आज मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक स्त्रिया या स्वत:च्या पायावर उभा असुन नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्या आहेत.कमावत्या आहेत पण त्यांना त्यांचाच पैसा मनासारखा खर्च करण्याचे स्वातंत्र्य नाही. घरातील कर्ता पुरुष किंवा नवरा यांना विचारुनच पैसे खर्च करावे लागतात. मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?हा प्रश्न पडतो.घरात कुठलेही धार्मिक कार्य असो की अजुन काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली तर स्त्रिला सामावुन घेतले जात नाही.तिची मते विचारात घेतली जात नाहीत.समाजात मानाचे स्थान येताच तिच्या हिंडण्याफिरण्याचे स्वातंत्र्य हिरावुन घेतले जाते.कित्येक ठिकाणी तर फक्त निवडणुकीत आरक्षित पद आहे म्हणुन स्त्रियांना निवडणुक लढवु दिली जाते.पण प्रत्यक्ष कारभार मात्र त्यांचे पतीच पाहतात.मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
        मुलांचे शिक्षण असो की लग्न,घर खरेदी असो की अजुन काही. जेंव्हाजेंव्हा कुटुंबातील काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येते तेंव्हा मात्र घरातील कर्ता पुरुष किंवा नवरा यांचा निर्णय अंतीम समजला जातो.स्त्रिच्या निर्णयाला काहीच महत्व नसते.मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
        काही कुटुंबात मात्र या उलट परिस्थिती असते.स्त्रिचा आदर केला जातो.तिची ही मते विचारात घेतली जातात.प्रत्येक निर्णयात तिला सामावुन घेतले जाते. ती कुटुंबे  खरच आज प्रगत झालेली कुटुंबे आहेत असे म्हणले तर वावगे होणार नाही.
         परंतु एवढेच मर्यादीत स्वातंत्र्य स्त्रिला पुरेसे नाही.तिचे पंख छाटु नका.तिच्या आनंदाची चावी तुमच्या हाती ठेवु नका.तिला प्रत्येक निर्णय प्रक्रियेत पुरेसे स्वातंत्र्य द्या.बघा त्या कुटुंबाची कशी भरभराट झालेली दिसेल.....पण...पण एवढेच स्वातंत्र्य पुरेसे नाही अजुन बराच पल्ला गाठायचाय.दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचे २०२०साली देश महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करायचेय.मग द्या ना स्त्रिला ही सन्मान,निर्णय प्रक्रियेत मान,मग आपला देश ख-या अर्थाने बनेल महान!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
             ✍🏻संगीता भांडवले✍🏻
                 वाशी जि उस्मानाबाद

No comments:

Post a Comment