जि प प्रा शाळा शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे झाली.,सौ.मनिषा मोरे यांनी शिक्षकांबद्दलचा आदरभाव व्यक्त करत शाळेचे बदललेले स्वरुप ग्रामस्थांसमोर मांडले व माझ्यावर एक सुंदर कविता तयार करुन कविता वाचन केले.मी भारावुन गेले आणि गावक-यांकडुन मिळालेली माझ्या कामाची पावती समजुन मी ऋण व्यक्त करत मनातल्या मनात खुप मोठा पुरस्कार मिळाल्यागत आनंदी झाले.विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी व इंग्रजीतुन भाषणे केली व उपस्थितांनी असे आश्वासन दिले की,इथुन पुढे एकही मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आम्ही पाठवणार नाहीत.यावर्षी तीन मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील माझ्या शाळेत प्रवेशित झाली आहेत.लहान गावात हा खुप मोठा बदल पाहुन गांवकरी नेहमी आमच्या हाकेला ओ!म्हणत मदत करण्यास तत्पर असतात.
विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप ,लेखन साहित्याचे वाटप व बक्षिसे देऊन अनेक दानशुर व्यक्तींनी सहभाग नोंदवला.त्यांचे शाळेच्या वतीने मनस्वी आभार.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
संगीता भांडवले
मु अ जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद
myshikshankatta.blogspot.com
Monday, August 15, 2016
जि प प्रा शा शेंडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment