Sunday, October 23, 2016

कविता अंधश्रद्धा

    ।।अंधश्रद्धा।।

घ्या विज्ञानाचा वसा
अंधश्रद्धेला नको थारा
गंडेदोरे जंतरमंतर
यांना छु मंतर करा

     नसती जगी भुतेखेते
     असतो  वहंम मनाचा
     करा पर्दा फाश
      भोंदु बुवा बाबांचा

येते जयांच्या अंगी
तो ढोंगी ओळखावा
जो होईल त्याचा दास
तो अज्ञानी मानावा

     दगडास पुजुन कुठे
     लाभती मुले, धनसंपत्ती
     विज्ञानानाची कास धरा 
     होईंल तुमची प्रगती

गर्भलिंग निदान
हा आहे गुन्हा
अंधश्रद्धेच्या नावावर
का करतात पुन:पुन्हा

विज्ञानाची धरा कास
विज्ञान रुजवा कणाकणात
विज्ञानाने करा प्रगती
जीवन बदलेल एका क्षणात

     विज्ञानाचा घेता वसा
     होतील बदल आमुलाग्र
     वाढेल प्रगतीचा आलेख
     होईल बुद्धी कुशाग्र

नको अंधश्रद्धेचा होऊ बळी
नको अंधश्रद्धेला देऊ थारा
याचसाठी दाभोळकरांनी
बलिदान दिला जीव प्यारा

     संगीता भांडवले
मु अ जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी,जि उस्मानाबाद
९९२३४४५३०६
     

   

    

     

         

कविता भुकबळी

कविता
     ।।भुकबळी।।

भाकरीच्या चंद्रासाठी
दारोदार फिरतो आहे
भुकेने व्याकुळ मन
घासासाठी झुरते आहे

वर उन्हाचा चटका
पोटात भुकेचा डोंब
स्वत:च्या सुखासाठी
करती कुणी शांती,होम

धनिकाला कमी नाही धनाची
पुढ्यात धान्याच्या राशीच राशी
गरिब मात्र एकवेळच्या जेवणासाठी
दिवसभर दारोदार फिरतो उपाशी

मंदिराच्या दारात बसणा-याला
कुणी छदाम ही भीख देत नाही
सुवर्ण कळसासाठी मात्र
देणगीदारांची रिग आहे

भरल्या मंदिराच्या हुंड्या
झाले हिरेजडीत कळस
गरीबांना मात्र,आजही
पोटभर अन्न नाही दोन वेळेस

शेतीप्रधान देशाची
ही शोकांतिका आहे
रोज कितीतरी जणांचा
भुकबळी जात आहे

संगीता भांडवले
मु अ जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी,जि उस्मानाबाद
९९२३४४५३०६


शेतकरी जगला तर;देश टिकेल(वैचारिक लेख)

शेतकरी जगला तर ; देश टिकेल! भारत हा शेतीप्रधान देश आहे.शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.भारतातील जवळ जवळ ७०%लोकांची उपजिविका शेतीवर अवलंबुन आहे.शेतकरी हा भारताचा अविभाज्य घटक आहे.परंतु या शेतीप्रधान देशातील शेतकरी,जो जगाचा पोशिंदा आहे.तोच नेहमी निसर्गाच्या चक्रात सापडतो.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ ,कधी महापुर,कधी वादळ,तर कधी गारपीठ.या सा-या संकटांचा त्याला वेळोवेळी सामना करावा लागतो.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे जेंव्हा हिसकावुन घेतला जातो.तेंव्हा तो शेतकरी अपयशाने खतुन जातो.त्याचं अंध:कारमय भविष्य त्याला दिसतं अन् नकळतपणे आपला संसार उध्वस्त करुन ,आपले कुटुंब वा-यावर सोडुन मृत्युला कवटाळतो.तेंव्हा खुप वाईट वाटते.आपण ज्या कृषिप्रधान देशात राहतो तेथेच या कृषकाची अशी अवस्था पाहताना! सत्तेवर सरकार येते, सत्ता स्थापन करते.शेतक-यांसाठी कोटींच्या कोटी घोषणा ही होतात आणि दुस-या बाजुला मात्र याच शेतक-याचा आपला माल रस्त्यावर फेकावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.कधी कांदा रडवतो तर कधी झेंडुचा चिखल होतो .कापुस ,मका व सोयाबीनला हमीभाव मिळत नाही.मागील तीन चार वर्षे तर सतत चा दुष्काळ,यात सततच्या भारनियमाने तर उपलब्ध पाणी देखील शेतीला देता आले नाही.अशा सर्व समस्येचा सामना बळीराजाला करावा लागतो आणि यातुनही शेवटी जो माल पदरात पडतो त्याचा मोबदला शेतक-यापेक्षा व्यापा-यालाच जास्त फायदेशीर असतो.मेहनत एकाची अन् लाभ दुस-यालाच अशी गत झालीय. शेतक-याला पेऱणीपासुन ते पिक बाजारात नेईपर्यंत अनेक संकटांना सामोरे जावे लागते.कधी बोगस बियाणे तर कधी खरेदीला रांगाच रांगा.एक धान्य पिशवी बियाणे खरेदीला कधीे कधी एक दिवस जातो नेमके याच दिवसात शेतीची इतर कामे देखील महत्वाची असतात. तिच गत नुकसान भरपाई अनुदानाची.पिकांचे पंचनामे कोण करतात अऩ् कसे होतात हे माहितय आपणाला.पिकविमा भरताना खरा राबता शेतकरी शेतात असतो,गांवकारभारी शेतकरी मात्र पिकविमा भरतात,शासनाचे अनुदानही पदरात पाडुन घेतात.यातुन खरा शेतकरी मात्र या अनुदानास वंचित होतो काऱण काय तर बँकेत असणा-या रांगाच्या रांगा.म्हणुन सरकारने सरसकट सर्वांनाच अनुदानास पात्र समजावे. सततच्या नापिकीला कंटाळुन,सावकारी कर्जाला कंटाळुन महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी मृत्युचा पाश आपल्या गळ्याभोवती आवळुन आपली स्वत:ची सुटका करुन घेतात.पण घरातील कर्ता पुरुष गेल्याने खुप हाल होतात त्या कुटुंबाचे.त्या घरातील मुले उच्च शिक्षणापासुन वंचित राहतात. सध्या वाढलेली शैक्षणिक फिस त्या कुटुंबाला परवडत नाही.मुलांना शिक्षण ,उत्तम आरोग्य,मुलीचे लग्न,या समस्यांचा सामना त्या कुटुंबियांना करावा लागतो.हे सर्व रोकायचे असेल तर गरज आहे ती सरकारच्या ठोस धोरणांची व अंमलबजावणीची.अशा कुटुंबातील मुलांचे शिक्षण सरकारने मोफत केले पाहिजे.व अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणुन योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. यंदा वेळोवेळी पावसाने साथ दिली.सुरुवातीला थोडाथोडा का होईना पण शेतीला आवश्यक असा पाऊस झाला.पिके जोमाने आली.मध्यंतरी जरा पानसाने ओढ दिली परंतु परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन नेला.सगळीकडे पाणीचपाणी झाले.शेते, विहीरी,नदी,नाले,ओढे,बंधारे,तलाव,धरणे सर्व तुडुंब भरली.संततधार पावसाने व जास्त पाण्याने पिके नासली.उडीद,मुग,सोयाबीन ही पिके हातची गेली तर तुरींची पाऩे पिवळी पडली अन् पुन्हा माझ्या बळिराजावर निसर्गाने अवकृपा केली.मागील तार वर्षापेक्षा यंदा तरी दसर, दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्याची स्वप्न पाहतानाच निसर्ग असा कोपला.पंधरा दिवसातच होत्याचे नव्हते करुन सोडले.पुढील भविष्यासाठी हा पाऊस चांगला झाला पण सध्याच्या वर्तमानाचे काय?परंतु पुन्हा बळिराजा रब्बीच्या तयारीला जोमाने लागलाय,दाद द्यावी त्याच्या हिमतीला. गतवर्षी झेंडुला ५०-६०रुपये भाव मिळाल्यामुळे अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात झेंडुची लागवड केली.परंतु या वर्षी दस-याला सुरुवातीला १०-१५ रुपयांनी विकणारा झेंडु ३-५रुपयावर येऊन ठेपला.शेतक-याला त्याच्या लागवडीचा,मशागतीचा खर्च करी परवडला का?अनेक शेतक-यांनी तर ट्रकच्या ट्रक झेंडुची फुले रस्त्यावर फेकणेच पसंद केले.या शेतीच्या कामात कुटुंबातील महिला, शालेय विद्यार्थी शेतात राबत असतात.त्यांना तरी मदत म्हणुन आपण एवढेच करुयात.......... व्यापा-यांकडुन भाजीपाला खरेदी न करता शेतक-यांकडुनच खरेदी करुयात. भाजीपाला खरेदी करताना भावात घासघीस करु नका.त्या शेतक-याचीही मुले शिकुन आपल्यासारखीच नौकरदार बनण्यासाठी मदत करुयात.आपल्या आजी-आजोबांनी,आई-वडिलांनी आपणाला शेतात कष्ट करुनच दोन पैसे मिळविल्यामुळेच आपण शिकलो याची जाणीव ठेवा!शेतक-यांला जगवायचे असेल तर आपण एवढे करायलाच पाहिजे.तरच आपण या शेतीप्रधान देशातील शेतक-याची भावी पिढी म्हणुन गर्वाने मिरवु! संगीता भांडवले मुख्याध्यापिका जि प प्रा शाळा शेंडी ता वाशी,जि उस्मानाबाद 9923445306 Email-iamsangitabhandwale@gmail.com Blog-myshikshankatta.blogs.com

Saturday, October 8, 2016

माझा बायोडाटा

*माझा बायोडाटा/स्वपरिचय*

नांव:
       संगीता उत्तमराव भांडवले

जन्मतारीख:
                   ०४/१०/१९७५
                  चार ऑक्टो.एकोणीसशे पंच्याहत्तर

पत्ता:
       रा .वाशी ता .वाशी जि .उस्मानाबाद
        पिन-४१३५०३

पद:
      प्राथमिक शिक्षिका

मोबा.नं.:
          ९९२३४४५३०६

E-mail:
            iamsangitabhandwale@gmail.com

Blog:
         myshikshankatta.blogspot.com

शिक्षण:
           एम.कॉम./एम.ए(इंग्रजी). डी. एड

कार्यालय:
             जि प प्रा शाळा कवडेवाड़ी व.

              ता वाशी जि उस्मानाबाद

              प्र.मुख्याध्यापिका

प्रकाशित साहित्य: *३६५दिवसांचे दिनविशेष*-स्पर्धा परिक्षेसाठी
  
                           *शाळा रे शाळा*-बालकविता संग्रह

                           *मोगरा*-चारोळी संग्रह

आगामी साहित्य:

रातराणी_चारोळी संग्रह

काव्यानंद _काविता संग्रह

बालकविता संग्रह

लेखन:
दैनिक दिव्यमराठी,

(किड्स कॉर्नर),  

दैनिक लोकमत, 

दैनिक एकमत(,साक्षी पुरवणी),

दैनिक संघर्ष,

किशोर मासिक,

जीवन शिक्षण मासिक,

यात कविता ,लेख व शालेय उपक्रम प्रकाशित.

 YouTube channel....

https://www.youtube.com/@sangitabhandwale1939

विविध शैक्षणिक व्हिडिओ,maths trick, 

Blog ..

https://myshikshankatta.blogspot.com/

 विविध शैक्षणिक उपक्रम /लेख प्रकाशित

छंद-आवड:

 समाजकार्य,वक्तृत्व,लेखन,वाचन,पाककला,कलाकुसर,विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम

*मानसन्मान व पुरस्कार:*

 @  वाशी तालुका पंचायत समिती अंतर्गत 'तालुकास्तरिय आदर्श शिक्षक' पुरस्कार,

@ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा  'शिक्षक भुषण' पुरस्कार.

@ लोकमंगल मल्टिस्टेट बँकेचा' जिल्हस्तरिय आदर्श शिक्षक' पुरस्कार.

@ मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचा 'जिजाऊ' पुरस्कार.

  @ अकोला वर्षा महोत्सवाचा राज्यस्तरिय 'पर्यावरणस्नेही शिक्षक'पुरस्कार.

@अयोध्या गँस एजन्सीतर्फे कवीगौरव

@क्रांती योगाक्लासतर्फे कवीगौरव

@कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी तर्फे कवीगौरव

@भैरवनाथ हॉस्पिटल वाशीतर्फे कवीगौरव

@नक्षत्राचं देणं काव्यमंचतर्फे कवीगौरव

@उस्मानाबाद जि पः चा जिल्हास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०१७-१८

@पार्वती सदाफुले स्म्रति पुरस्कार,सोलापूर

@हिरकनी पुरस्कार.जालना-2018

@'गुणवत्तेचे शिलेदार' म्हणून विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते सन्मान-2019

@ स्मृतीशेष रामलिंगअप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठान उमरगा तर्फे ..महात्मा ज्योतिबा फुले स्मृती आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार २०२०

@

@धनेश्र्वरी शिक्षण समूह महाराष्ट्र, छत्तीसगढ तर्फे  *धनेश्र्वरी शिक्षक रत्न* पुरस्कार-२०२२

@ आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत तर्फे *राष्ट्रीय आदर्श शिक्षक* पुरस्कार -२०२२.

@ आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, भारत तर्फे ..राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार २०२२

@आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत  *राष्ट्रीय पर्यटन विकास तथा सांस्कृतिक कला महोत्सव संस्थान* तर्फे...राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२३

@आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत तर्फे 'राष्ट्रीय काव्यरत्न पुरस्कार'-२०२३

@ वाशी अर्बन बँकेचा   ..वाशी अर्बन दुर्गा पुरस्कार २०२३ प्राप्त

काव्यवाचन:

@ ५वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पळसप येथे काव्यवाचन.

@ लातुर ग्रंथमहोत्सवात काव्यवाचन.

@उदगीर ग्रंथमहोत्सवात काव्यवाचन.

@राज्यस्तरिय शिक्षक साहित्य संमेलन औरंगाबाद येथे काव्य वाचन

@नक्षत्राचं देणं काव्यमंच राज्यस्तरिय कविसंमेलनात काव्यवाचन

@राज्यस्तरिय निसर्ग कवीसंमेलनात काव्यवाचन

@राज्यस्तरिय श्रावणी काव्यमैफिलित काव्यवाचन

@ लिम्का वल्ड रेकॉर्ड प्रस्तावित,विश्वविक्रमी सलग २४तास काव्यवाचनात काव्यवाचन

@वैराग येथे राज्यस्तरिय कविसंमेलनात काव्यवाचन

@३९वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे काव्यवाचन

@काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर येथे काव्यवाचन

@राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन पुणे येथे काव्यवाचन

@रानफूल साहित्य संमेलन वैराग बार्शी येथे काव्यवाचन

@अमृतवाणी पुस्तक प्रकाशन वांगी ता.भूम येथे काव्यवाचन

@उधळण काव्यगंधाची पुस्तक प्रकाशन तुळजापुर येथे काव्यवाचन

@राज्यस्तरीय महिला शिक्षिका साहित्य संमेलन अध्यक्ष पद उमरगा जि उस्मानाबाद येथे.. 

@क्रांती ज्योती  सावित्रीबाई फुले जयंती निमित्त 'एक दिवस तीच्या साठी'  राज्य स्तरीय महिला विशेष समेलन व  सन्मांन  ३जाने.२०१९

@९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन बडोदा येथे निवड

@९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद  काव्य वाचन

@९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे स्वागत कक्षेत उल्लेखनीय कार्य

@ महाराष्ट्र राज्य शैक्षणिक  संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे- आयोजित'जीवन शिक्षण  प्रश्नमंजुषा' स्पर्धेत लातुर विभागात प्रथम.

@महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (विद्या परिषद)-प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत *राज्यस्तरिय शोध निबंध पुरस्कार* सन-२०१५-१६

 @पुनर्रचित अभ्यासक्रम इ.५वी-सुलभक म्हणुन कार्य,जिल्हा व तालुकास्तर

@शालेय व्यवस्थापन समिति सदस्यांचे  तालुकास्तरिय प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणुन कार्य

@ मा डॉ. प्रतापसिंह पाटील मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित वाशी तालुका महिला बचत गट मेळाव्याच्या(१०००महिला) प्रमुख मार्गदर्शिका  -तेरखेडा तालुका वाशी येथे 

@ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव (काळे) येथे शाळास्तरिय चौथे बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

@पाणी फौंडेशन ,वॉटर कप स्पर्धेत हिवरा ता भुम येथे श्रमदान

@vopa school(V-School) मध्ये E-content निर्मिती. 

@आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत . शाखा- उस्मानाबाद..*

उस्मानाबाद जिल्हा महिला अध्यक्षा* म्हणून निवड

@रानफुल साहित्य व्यासपीठ,श्रावण काव्य धारा २०२१ गौरव पत्र 

@

@26जानेवारी 2023रोजी  वाशी अर्बन बँकेचा *वाशी अर्बन दुर्गा पुरस्कार 2023* प्राप्त

@




* सुत्रसंचालन:
विविध शैक्षणिक कार्यक्रम -बाल आनंद मेळावा,

महिला दिन मेळावा,

बालिका दिन,

किशोरी मेळावा

बालसाहित्य संमेलन

शिक्षण परिषद 

या कार्यक्रमात सुत्रसंचालन.

* विविध स्पर्धा परिक्षण* :
निबंध स्पर्धा,

वक्तृत्व स्पर्धा,

रांगोळी स्पर्धा,

काव्यवाचन, 

काव्यलेखन स्पर्धा, 

वरिष्ट महाविद्यायीन काव्यवाचन स्पर्धा,

नाटयीकरण स्पर्धा ..

@ कोविड-१९ कालावधीत Zoom &Google meet द्वारे  साहित्ऑनलाईन ग्रुप वरील  कार्यक्रमाचे  अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून  कार्य. 

@ कोरोना कालावधीत महिलांसाठी  *तंत्रज्ञान* कार्यशाळेत मार्गदर्शन

@ *तंत्रस्नेही शिक्षका* म्हणून विशेष ओळख

Monday, October 3, 2016

नोंदी कशा कराव्या!

नोंदी कशा कराव्यात....!!!!!!
.
व्यक्तिमत्व गुणविशेष
1 आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो
2 आपली मते ठामपणे मांडतो
3 कोणतेही काम एकाग्रतेने करतो
4 कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो
5 आत्मविश्वासाने काम करतो
6 इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो
7 जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो
8 वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
9 शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो
10 स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे
11 धाडसी वृत्ती दिसून येते
12 स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो
13 गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो
14 भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो
15 वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो
16 मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो
17 मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो
18 शाळेच्या नियमाचे पालन करतो
19 इतराशी नम्रपणे वागतो
20 नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो
21 नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात
22 उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो
23 शाळेत येण्यात आनंद वाटतो
24 गृहपाठ आवडीने करतो
25 खूप प्रश्न विचारतो
26 स्वत:चा अभ्यास स्वत: करतो
27 शिक्षकाविषयी आदर बाळगतो

सुधारणा आवश्वक
1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31 शालेय परिपाठात सहभाग असावा
32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33 लेखनातील चुका टाळाव्या
34 नकाशा वाचनाचा सराव करावा
35 उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
37 नियमित उपस्थित राहावे
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42 अक्षर सुधारणे आवश्यक
43 भाषा विषयात प्रगती करावी
44 अक्षर वळणदार काढावे
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48 गणिती क्रियाचा सराव करा
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
50 गणितातील मांडणी योग्य करावे
51 शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे

आवड /छंद
1 चित्रे काढतो
2 गोष्ट सांगतो
3 गाणी -कविता म्हणतो
4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5 खेळात सहभागी होतो
6 अवांतर वाचन करणे
7 गणिती आकडेमोड करतो
8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो
9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
11 वाचन करणे
12 लेखन करणे
13 खेळणे
14 पोहणे
15 सायकल खेळणे
16 चित्रे काढणे
17 गीत गायन
18 संग्रह करणे
19 उपक्रम तयार करणे
20 प्रतिकृती बनवणे
21 प्रयोग करणे
22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
23 खो खो खेळणे
24 क्रिकेट खेळणे
25 संगणक हाताळणे
26 गोष्टी ऐकणे
27 गोष्टी वाचणे
28 वाचन करणे
29 रांगोळीकाढणे
30 प्रवास करणे
31 नक्षिकाम
32 व्यायाम करणे
33 संगणक
34 नृत्य
35 संगीत ऐकणे

कला
1 कलेचे विविध प्रकार समजून घेतो
2 मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो 
3 चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो
4 चित्रे सुंदर काढतो
5 प्रमाणबद्ध रेखाटन करतो
6 मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
7 रंगाच्या छटातील फरक ओळखतो
8 चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो
9 चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो
10 कलात्मक दृष्टीकोन ठेवतो
11 विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
12 कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो
13 वर्ग सजावट करतो
14 मातीपासून विविध आकार बनवितो
15 स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
16 नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो

शारीरिक शिक्षण
1 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
2 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो
3 तालबद्ध  हालचाली करतो
4 गटाचे नेतृत्व करतो
5 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो
6 गटातील सहकर्‍यांना मार्गदर्शन करतो
7 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो
8 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
9 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो
10 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो
11 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो
12 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
13 मनोरंजक खेळात सहभागी होतो
14 शारीरिक श्रम आनंदाने करतो
15 मैदानाची स्वच्छता करतो
16 जय पराजय आनंदाने स्वीकारतो
17 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो
18 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
19 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो
20 शिस्तीचे पालन करतो
21 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो
22 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो
23 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो
24 कलेविषयी रुचि ठेवतो
25 दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो
26 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो

कार्यानुभव
1 कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो
2 कृती,उपक्रम आवडीने करतो
3 उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो
4 तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
5 परिसर स्वच्छ ठेवतो
6 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो
7 कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो
8 आधुनिक साधनाचा वापर करतो
9 व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो
10 चर्चेत सहभागी होतो
11 समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो
12 विविध मुल्याची जोपासना करतो
13 साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो
14 शिक्षकाचे सहकार्य घेतो
15 आत्मविश्वासाने कृती करतो
16 समजशील वर्तन करतो
17 ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो
18 समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
19 दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो
20 प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो
21 प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो

1 इतिहास नागरिकशास्त्र
2 ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो
3 संविधान व प्रतिज्ञा म्हणतो
4 समाजसुधारकाची माहिती सांगतो
5 संविधानाचे महत्व सांगतो
6 थोर नेत्याची माहिती सांगतो
7 ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो
8 नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो

विज्ञान
1 विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो
2 विज्ञानाचा आपणास होणारा फायदा सांगतो
3 आधुनिक शोधाची माहिती घेतो
4 आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो
5 वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो
6 विविध पदार्थाचे गुणधर्म सांगतो
7 वैज्ञानिक राशीची एकके सांगतो
8 विविध प्रकारच्या बलाची माहिती सांगतो
9 चुंबकीय व अचुंबकीय पदार्थ ओळखतो
10 धातू व अधातू सांगतो
11 नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
12 भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो
13 मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो
14 जैविक - अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
15 सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो
16 मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो
17 प्रथमोपचाराची माहिती सांगतो
18 परिसरात घडणार्‍या घटनांची माहिती घेतो
19 अवकाशीय घटना समजून घेतो
20 वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो
21 वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो
22 प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो
23 प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
24 प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो
25 धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो
26 पदार्थ्याच्या संज्ञा सांगतो
27 बदलाचे प्रकार सांगतो
28 बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
29 पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो
30 नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
31 समतोल आहाराचे महत्व सांगतो
32 रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो
33 रोगावरील उपायाची माहिती करून घेतो
34 प्रदूषणाचे प्रकार सांगतो
35 प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो
36 प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो
37 वृक्ष संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
38 पाण्याचे महत्व जाणतो
39 पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो
40 नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो
41 वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो
42 पाणी संवर्धंनासाठी  उपाय समजून घेतो
43 अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो
44 विज्ञानातील गंमतीजमती सांगतो
45 टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो
46 वैज्ञानिक व संशोधक यांची पुस्तके वाचतो

गणित
1 संख्या वाचन करतो
2 लहान मोठ्या संख्या ओळखतो
3 संख्याचा क्रम ओळखतो
4 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
5 बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
6 पाढे पाठांतर करतो
7 गुणाकाराने पाढे तयार करतो
8 संख्या अक्षरी लिहितो
9 अक्षरी संख्या अंकात मांडतो
10 संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
11 संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
12 तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
13 संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
14 विविध भौमितिक संबोध समजून घेतो
15 विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
16 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
17 गणितीय चिन्हे ओळखतो
18 चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
19 गणितातील सूत्रे समजून घेतो
20 सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो
21 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
22 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
23 विविध परिमाणे समजून घेतो
24 परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
25 विविध राशिची एकके सांगतो
26 विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
27 उदाहरणे गतीने सोडवितो
28 सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
29 आलेखाचे वाचन करतो
30 आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
31 दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
32 विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
33 संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
34 संख्या विस्तारीत रूपात लिहितो
35 समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
36 अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
37 क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
38 थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
39 उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
40 दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो
41 गणितीय कोडी सोडवितो
42 सारणी व तक्ता तयार करतो

English
1 Solve the Activity by confience
2 Copy the Letters and words correctly
3 Read aloud from textbook
4 Write correctly on one line
5 Listen with concentration
6 Read the poem in rhythm
7 Read and act accordingly
8 Read the part in dialougs by understanding
9 Write the answer of questions
10 Take part in language game
11 Read silently by understanding
12 Recite with enjoyment poems and songs
13 Give responses in various contexts
14 identify commonly used words
15 Rearrange the story events
16 Enjoy the rhythm and understand
17 Take the dictation of familiar words
18 Read english daily newspaper

हिंदी
1 सामान्य सूचनाओ को समझता है
2 स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है
3 वर्णोका योग्य उच्चारण करता है
4 चिंत्रो को देखकर शब्द कहता है
5 रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है
6 सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है
7 स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है
8 पाठयांश का आशय समझता है
9 गीत और कविताए कंठस्थ करता है
10 मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है
11 अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है
12 मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है
13 हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है
14 मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता है
15 पाठयांश को समझतापूर्वक पढता है
16 मौनवाचन समझतापूर्वक करता है
17 हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
18 लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
19 नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता है
20 पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है
21 समाचारपत्र दररोज पढता है
22 सुसष्ट और शुद्ध लेखन करता है
23 दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है
24 परिचित विषयपर निबंध लेखन करता है
25 दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है
26 हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता है
27 हिंदी भाषा के प्रति रुचि रखता है
28 हिंदी में कहानी सुनाता है
29 अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता है
30 शुद्धलेखन समझतापूर्वक करता है

मराठी
" 1" आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
" 2" ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
" 3" बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
" 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
" 5" प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
" 6" मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
" 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो
" 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
" 9" लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
" 10" योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
" 11" विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
" 12" स्वत:हून प्रश्न विचारतो
" 13" कविता तालासुरात साभिनय म्हणतो
" 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
" 15" नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
" 16" दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
" 17" विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
" 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
" 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
" 20" भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
" 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
" 22" ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
" 23" मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
" 24" निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
" 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
" 26" अवांतर वाचन करतो
" 27" गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
" 28" मुद्देसूद लेखन करतो
" 29" शुद्धलेखन अचूक करतो
" 30" अचूक अनुलेखन करतो
" 31" स्वाध्याय अचूक सोडवितो
" 32" स्वयंअध्ययन करतो
" 33" अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
" 34" संग्रहवृत्ती जोपासतो
" 35" नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
" 36" भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
" 37" लेखनाचे नियम पाळतो
" 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
" 39" वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
" 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
" 41" पाठातील शंका विचारतो
" 42" हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
" 43" गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
" 44" वाचनाची आवड आहे
" 45" कविता चालीमध्ये म्हणतो
" 46" अवांतर वाचन ,पाठांतर करतो
" 47" सुविचाराचा संग्रह करतो
" 48" प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
" 49" दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
" 50" बोधकथा सांगतो
" 51" वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो

कविता-पाऊस


⛈⛈🌧🌧🌧⛈⛈🌧🌧🌧⛈🌧⛈🌧⛈🌧
       उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त कविता

          !!पाऊस!!
💧💦☔💧💦☔💧💦☔💧💦☔💧💦☔
अरे पावसा ,पावसा
असा रे कसा तु उनाड
कधी देतोस ओढ तर
कधी पडतोस मुसळधार  ।।१।।

पावसाची येता सर
सान थोरांना आनंद
शेतीच्या कामात
माझा बळीराजा गुंग ।।२।।

पावसाची संततधार
तृप्त धरणीमाय झाली
रानपाखरासह सारी
गाती आनंदाची गाणी  ।।३।।

पडता पाऊस मुसळधार
नदी-नाल्या आला पुर
धारण केले रौद्ररुप
तुडुंब भरली बंधारी,धरणं ।।४।।

असा पावसाचा जोर
पाऊस पडतोय धों-धों
देऊ नको रे तु धोका
चुकेल मज काळजाचा ठोका ।।५।।

माझ्या माहेराचा कसा
जुना चिरेबंदी वाडा
दुधावरली जपत साय
चिंता करी माझी माय| ।।६।।

धिराचा देऊन शब्द
मनाची होते घालमेल
माहेराच्या काळजीने
मन नाही था-यावर ।।७।।

आता विनंती करते तुला
फिर माघारी रे पावसा
माझ्या बंधुच्या घराला
नको मारु तु वळसा ।।८।।
💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧
  संगीता भांडवले
  वाशी, उस्मानाबाद

धगधगती आग दहशतवाद

🎼नादचारोळी🎼

उरीच्या हल्ल्याचा
मनी दहशतवाद धगधगला
एकोणीस जवानांच्या हौतात्म्याचा
अडोतीस 'पाकड्यांचा' बदला घेतला!

पेटली सुडाची आग
दहशतवाद धगधगला
भारतीय लष्कराने
पीओकेत चढविला हल्ला !(स्पर्धेसाठी)

माझ्या भारत देशाची
बघितलीस ना ताकद
गनिमी कावा वापरुन
केले तुला बरबाद!

अरे 'पाकड्यांनो'!
करु नका छुप्या कारवाया
लष्कर आमचे करतील खात्मा
मग करु नका गयावया!

१९चा बदला
३८ने घेतला
पुन्हा आलास वाटेला तर.....
असाच चिरडील तुला!!

✍🏻संगीता भांडवले
    वाशी, उस्मानाबाद
         (१६)

प्रेमाचे प्रतिक ताजमहल

तृतीय क्रमांक प्राप्त

🎯चित्रशलाका🎯

प्रेमाचे प्रतीक,
वास्तुकलेचा नमुना
ताजच्या गळक्या छताचे
रहस्य अजुन उमजेना !

नशीबवान ठरली मुमताज
जिला पती लाभला शहाँजहाँन
दोघांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणुन
वास्तु उभारला ताजमहाल  !!

मुमताजच्या प्रेमाखातीर
शहाँजहाँन ने बांधला ताज
बायकोने सांगीतले कांदे,टोमँटो
पण त्याचा भाव लई आज!

नशीबवान ठरली मुमताज
जिला पती लाभला शहाँजहाँन
दोघांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणुन
वास्तु उभारला ताजमहाल  !!(स्पर्धेसाठी)

शहाँजहाँनने मुमताजसाठी
बांधला सुंदरनताजमहल
धनी!शौचालय बांधुन
तुम्ही सोडवाना माझे हाल!

यमुना नदीने वेढले
आग्र्याच्या ताजला
मुमताजच्या स्मृतीप्रित्यर्थ
शहाँजहाँनने बांधला!

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
(१६)