Monday, October 3, 2016

कविता-पाऊस


⛈⛈🌧🌧🌧⛈⛈🌧🌧🌧⛈🌧⛈🌧⛈🌧
       उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त कविता

          !!पाऊस!!
💧💦☔💧💦☔💧💦☔💧💦☔💧💦☔
अरे पावसा ,पावसा
असा रे कसा तु उनाड
कधी देतोस ओढ तर
कधी पडतोस मुसळधार  ।।१।।

पावसाची येता सर
सान थोरांना आनंद
शेतीच्या कामात
माझा बळीराजा गुंग ।।२।।

पावसाची संततधार
तृप्त धरणीमाय झाली
रानपाखरासह सारी
गाती आनंदाची गाणी  ।।३।।

पडता पाऊस मुसळधार
नदी-नाल्या आला पुर
धारण केले रौद्ररुप
तुडुंब भरली बंधारी,धरणं ।।४।।

असा पावसाचा जोर
पाऊस पडतोय धों-धों
देऊ नको रे तु धोका
चुकेल मज काळजाचा ठोका ।।५।।

माझ्या माहेराचा कसा
जुना चिरेबंदी वाडा
दुधावरली जपत साय
चिंता करी माझी माय| ।।६।।

धिराचा देऊन शब्द
मनाची होते घालमेल
माहेराच्या काळजीने
मन नाही था-यावर ।।७।।

आता विनंती करते तुला
फिर माघारी रे पावसा
माझ्या बंधुच्या घराला
नको मारु तु वळसा ।।८।।
💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧
  संगीता भांडवले
  वाशी, उस्मानाबाद

No comments:

Post a Comment