Sunday, October 23, 2016

कविता भुकबळी

कविता
     ।।भुकबळी।।

भाकरीच्या चंद्रासाठी
दारोदार फिरतो आहे
भुकेने व्याकुळ मन
घासासाठी झुरते आहे

वर उन्हाचा चटका
पोटात भुकेचा डोंब
स्वत:च्या सुखासाठी
करती कुणी शांती,होम

धनिकाला कमी नाही धनाची
पुढ्यात धान्याच्या राशीच राशी
गरिब मात्र एकवेळच्या जेवणासाठी
दिवसभर दारोदार फिरतो उपाशी

मंदिराच्या दारात बसणा-याला
कुणी छदाम ही भीख देत नाही
सुवर्ण कळसासाठी मात्र
देणगीदारांची रिग आहे

भरल्या मंदिराच्या हुंड्या
झाले हिरेजडीत कळस
गरीबांना मात्र,आजही
पोटभर अन्न नाही दोन वेळेस

शेतीप्रधान देशाची
ही शोकांतिका आहे
रोज कितीतरी जणांचा
भुकबळी जात आहे

संगीता भांडवले
मु अ जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी,जि उस्मानाबाद
९९२३४४५३०६


1 comment: