Wednesday, December 23, 2020

कविता

ची स्पर्धेसाठीची

     🎯।।कविता।।🎯

एक,दोन,......,पाच करत
भुलविलेस त्या अबलांना
वचन देऊन जन्मजन्मांतराचे
का दुखविलेस तिच्या मनाला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।१।।

भुलली तुझ्या सत्याला
भुलली तुझ्या निष्ठेला
ओवाळुन टाकला जीव
भेदुन सा-या परंपरेला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।२।।

का ?खेळलास तिच्या भावनांशी
का?कलंकित केलेस तिच्या शिलाला
का?दिलास छेद तिच्या विश्वासाला
का?जपला नाहीस दिलेल्या शब्दांना
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।३।।

प्रेम हा शब्दच का वांझ झाला
देऊन फसव्या शब्दांचा सहारा
का,कायमचा असा दुरावला
भेटली का सातवी तुला?
आता तरी जप तिला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।४।।

नको असलेल्या शब्दांतुन
का तोडलेस तिला मनातुन
संशयाने दुर का केलेस तिला
तनामनातुन का हाकललेस तिला
वेळ येताच जबाबदारीची
फसविलेस ना त्या सहावीला ।।५।।

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी, उस्मानाबाद

Monday, August 17, 2020

IMP शा पो आहार बाबतीत आर्थिक बाब

*IMP आर्थिक बाब संग्रहीत ठेवा*

*💠 शा.पो.आ. जमा रक्कम 💠* 

*(शासनाकडून ऑनलाईन द्वारे  खात्यावर प्राप्त झालेले अनुदान)*

1) दि. 11/9/18  1 रू. राज्यसरकार कडून प्रायोगिक तत्वावर.

2)  दि. 1/10/2018 जुन 18 ,जुलै18, आॕगस्ट 18 मानधन.

3) दि. 8/10/2018  एप्रिल 18 इंधन व भाजीपाला 

4) दि.8/10/2018 जुन 18 इंधन व भाजीपाला 

5) दि.31/10/2018 जुलै 18 इंधन व भाजीपाला 

6) दि.1/11/2018 आॕगस्ट 18 इंधन व भाजीपाला 

7) दि.17/12/2018 मार्च 18 इंधन व भाजीपाला 

8) दि.1/1/2019 माहे सप्टेंबर 18 व आक्टोंबर18 इंधन व भाजीपाला.

9) दि.9/1/2019 माहे - सप्टें.18 ते नोव्हें.18 मानधन 

10) दि.11/01/2019 माहे नोव्हेंबर 18 चे इंधन व भाजीपाला रक्कम जमा

11) दि. 14/3/19 माहे डिसेंबर 18 व जानेवारी 19 इंधन व भाजीपाला रक्कम जमा 

12) दि.26/3/2019 रोजी रुपये 300 भांडी खरेदीसाठी शिक्षकांच्या खात्यावरती जमा

12) दि.31/3/19 माहे फेब्रुवारी 19 इंधन व भाजीपाला रक्कम जमा

13)दि. 3/4/2019 माहे मे 2018 चे दुष्काळी इंधन भाजीपाला मुख्याध्यापकांच्या खात्यावरती जमा

14) दि. 9/4/2019 रोजी माहे डिसेंबर 18 जानेवारी 19 फेब्रुवारी एकोणवीस चे स्वयंपाकी मदतनीस मानधन मुख्याध्यापकांच्या खात्यावरती जमा

15) दि.24/5/2019 रोजी शैक्षणिक वर्ष 2018.19 चे मुख्याध्यापक / शिक्षक मानधन खात्यावरती जमा

16) दि.7 जुलै 2019 रोजी माहे मार्च 19 इंधन भाजीपाला जमा

17) दि.17 जुलै 2019 रोजी माहे मार्च 19 स्वयंपाकी तथा मदतनीस मुख्याध्यापकाच्या खात्यावरती जमा

18) दि. 3 व 4 सप्टेंबर 2019 रोजी मुख्याध्यापकांच्या खात्यावर माहे एप्रिल 19 व जून एकोणवीस इंधन भाजीपाला रक्कम जमा

19) दि. 17/10/2019 रोजी MME अंतर्गत कार्यालयीन खर्चासाठी ₹800 शा पो आ खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहे.

20) दिनांक 18/10/2019 रोजी माहे जुलै ते सप्टेंबर 2019 इंधन व भाजीपाला रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा झालेली आहे.

21) दिनांक 22 ऑक्टोबर 2019 ला स्वयंपाकी मदतनीस मानधन नवीन दराने पंधराशे रुपये महिना याप्रमाणे जून जुलै ऑगस्ट 2019 मुख्याध्यापक खात्यावर जमा

22) दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी दुष्काळग्रस्त भागातील मुलांना दूध अंडी व फळे जी दिलेली आहेत त्याचे अनुदान मुख्याध्यापकाच्या खात्यावरती आज  जमा झालेले आहे.

23) दिनांक 4 फेब्रुवारी 2020 रोजी स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन माहे सप्टेंबर 2019 ते डिसेंबर 2019 मुख्याध्यापकांच्या खात्यावरती जमा झाले आहे.

24) दिनांक 7 व 10 फेब्रुवारी 2020 रोजी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2019 इंधन भाजीपाला रक्कम मु अ खात्यात जमा.

25) दि 17/03/2020 रोजी माहे जानेवारी 2020 चे इंधन भाजीपाला मानधन मुख्याध्यापक खात्यावर जमा झालेले आहे.

26) दिनांक 15 मे 2020 रोजी  माहे फेब्रुवारी 2020 इंधन भाजीपाला रक्कम मुख्याध्यापक खात्यावर जमा तसेच दिनांक 16 व 17 मे 2020 रोजी माहे मार्च 2020 इंधन भाजीपाला रक्कम मुख्याध्यापक खात्यावरती जमा.

*वरील प्रमाणे अनुदान जमा झालेले आहे. शपोआ पासबुक नुसार सदरील नोंदी नुसार किर्द अद्यावत करावी.*
(काही जिल्ह्यातील नोंदी बाबत दिनांक मध्ये 1 ते 2 दिवसाची तफावत असु शकते)
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

Wednesday, July 22, 2020

मोकळा श्वास

 :मोकळा श्वास
मोकळा श्वास घेण्यासाठी
उद्यानं ही झाली सील बंद
कोरोनाच्या  या महामारीत
पर्यावरण रक्षणाचे जपुया छंद

✍️संगीता भांडवले आहेत ug

     वाशी उस्मानाबाद
   दि २२ जुलै २०२०

श्रावणसरी

बालगीत*आमची मनी*

बालगीत   (मनी)
आमची मनी
आहे गुणी
चेंडु खेळते
घरभर पळते
उंदीर दिसताच 
मागे धावते
सा-या घरात
घालुन गस्त
दुधाचे पातेले
करते फस्त
डोळे तिचे 
फारच छान
कान मात्र
फारच लहान
पिल्ले तिची
गोरीगोरीपान
दिसतात किती
छान छान !
            संगीता भांडवले
       मु.अ.जि.प.प्रा.शा.शेंडी
   ता.वाशी जि.उस्मानाबाद

Sunday, July 19, 2020

कविता *माझी बहीण*

  ।।माझी बहिण।। 

बहिण माझी लहान
गोष्टी करते मोठ्या
म्हणे बालपणी मी
होते सर्वांची लाडकी  ।। १।। 

सर्वच करायचे लाड
तशी ती लाडावली
अभ्यासात मात्र
फार नाही रमली  ।। २।। 

कला गुण तिच्यात
भरले होते ठासून
रांगोळी, मेहंदीत तर
फारच होती निपुण  ।। ३।। 

लहान तोंडी मोठा घास
फाडफाड बोलायची
राग शांत होताच
क्षणात मला बिलगायची  ।। ४।। 

बहिण माझी गुणी
नेहमी होती हसतमुख
संसारात ही रमली छान
तिला गृहलक्ष्मीचा मान  ।। ५।। 

असली कितीही नाती
तरी बहिणीची सर नाही
तिचे हट्ट पुरवायला
अजुन कुणी दमत नाही  ।। ६।। 

माहेरची लहान धाकटी
सासरला झाली थोरली
संसाररुपी सागरात
नाव तिची तरली   ।। ७।। 

संसारातील जबाबदा-या
पार पाडते दक्षतेने
सुख आणि दु:खात
साथ देते बरोबरीने  ।। ८।। 

माया, ममता, वात्सल्याचे
आहे मूर्तीमंत उदाहरण
रुप आणि सौंदर्याची
आहे ती लावण्यवती  ।। ९।। 

दिवाळी, राखी पुनवेला
औक्षण करते भावाला
पंचप्राणाने ओवाळले म्हणून
ओवाळणी मागते वहिणीला  ।। १०।। 

पुढील पिढीची
सतावते चिंता
भावाला भाऊ नाही
बहिणीला बहिण नाही  ।। ११।। 

*हम दो हमारा एक* चा
मंत्र जपतो आम्ही
बहिण भावाच्या नात्याला
कवितेतूनच वाचणार का तुम्ही?  ।। १२।। 

*संगीता भांडवले*
वाशी उस्मानाबाद


Thursday, June 18, 2020

कविता शहीद जवान

अंत:करणास भेदून जाईल
आर्त हाक त्या वीर पत्नीची
कोण जाणावे दु:ख तिचे
कशी समजूत काढेल लेकरांची

अंत:करणास भेदून जाईल
टाहो त्या वीर मातेचा
कोण जाणावे दु:ख तिचे
झाला शहीद पुत्र पोटचा

अंत:करणास भेदून जाईल
रिती कुस  त्या वीर मातेची
कोण जाणावे दु:ख तिचे
गाथा पराक्रमाच्या शौर्याची
 
अंत:करणास भेदून जाईल
वेडी माया बहिणीची
कोण जाणावे दु:ख तिचे
हिंमत तिच्या धैर्याची

अंत:करणास भेदून जाईल
आक्रोश त्या वीर पित्याचा
मातृभूमीच्या रक्षणासाठी
अभिमान मुलाच्या बलिदानाचा

संगीता भांडवले 
वाशी ,उस्मानाबाद






Sunday, May 3, 2020

यशोगाथा रानफूल ची

🌹यशोगाथा 'रानफूलची '
➖➖➖➖➖➖➖
       लेखन /संकलन.
     © हरिश्चंद्र खेंदाड.
          
रानफूल साहित्य व्यासपीठ
रानफूल युट्यूब चॅनल.
रानफूल बाल व्यासपीठ.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹 स्थापना - 24 जुलै. 2016.

🌹रानफूल हा ग्रुप नसून तो एक जिव्हाळ्याचा परिवार आहे.

🌹 इथ कोणतीही आणि कोणाशीही कसलिही स्पर्धा नसते.

🌹 उद्दीष्ट ➖
जमेल एवढी मोफत साहित्य सेवा करून साहित्यीकांचा मान , सन्मान करणे. ( बांधीलकी नाही ) कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
🌹रानफूलची वैशिष्टये - 
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
➖ महिलांचा सन्मान
➖ मोफत कार्यक्रम
➖ कसलिही फी गोळा केली जात नाही
➖व्यक्त व्हा इतरांना वाचा.वाचू द्या

➖ काव्य मैफल, कवी संमेलने, काव्यगाणी कार्यक्रम , पुस्तक प्रकाशन, प्रकट मुलाखती, प्रासंगिक कार्यक्रम इ. अनेक  वेगवेगळे उपक्रम आयोजित करणे.
➖ बालसाहित्य व्यासपीठ , कार्यक्रम.
➖ मोफत काव्य ध्वनीमुद्रण.
➖रानफूल चॅनलवर प्रसारण.
➖ क्रमशः पुस्तक वाचन.

➖ रक्ताच्या पलिकडे जाऊन नाती जपली जातात.
➖ योग्य ठिकाणी ग्रुप साठीचे योगदान लक्षात घेऊन कार्यक्रमात मान्यवर पदी सन्मानाची संधी दिली जाते.
➖ कोणाच्याही साहित्याला कमी लेखले जात नाही.
➖ साहित्या शिवाय, वादक, गायक, संगीतप्रेमी, वाचक, मजूर, अधिकारी, शेतकरी, व्यावसायिक , गृहणी अशी अनेक प्रकारच्या विविधतेत एकता असणारा ग्रुप.
➖ ग्रूप ला एक स्वतंत्र संहिता आहे.
➖संहिता न पाळणाराला ग्रूप मधून निरोप ही दिला जातो.
🌹 टीम रानफूल👇
➖➖➖➖➖➖➖
🌷 मा. अनिता देशमुख ( अध्यक्षा )

🌹डॉ.मदन देगावकर -बार्शी
( मुख्य प्रवर्तक )
🌹 महादेव आवारे - मार्गदर्शक.

🌹डॉ. चंदा सोनकर -बार्शी

🌹कांचन वीर - यवतमाळ 
(समुह प्रशासिका )

🌹हणमंत पडवळ -उस्मानाबाद 
( सुत्रसंचालक/प्रशासक )

🌹संजयकुमार भालेराव - वैराग 
 (निवेदक समुह प्रशासक )

🌹अशोक खडके - तुळजापूर 
(यू टयूब चॅनल प्रमुख / समुह प्रशासक )

🌹संगीता भांडवले -वाशी
 (महिला विभाग प्रमुख. / प्रशासक )

🌹गणेश कसपटे -उस्मानाबाद
( सामाजिक विभाग प्रमुख / प्रशासक . )

🌹उमेश सुर्वे - तुळजापूर 
(समुह प्रशासक )

🌹 अनिता देशमुख -उस्मानाबाद
         ( समुह प्रशासिका )

 🌹ज्ञानेश्वरी  शिंदे - सोलापूर 
        (समुह प्रशासिका )

🌹शांता सलगर -उस्मानाबाद 
(समुह प्रशासिका )

🌹हरिश्चंद्र खेंदाड- वैराग (संस्थापक / प्रशासक )
 
🌹रानफूलच्या काही उल्लेखनीय घटनांचा आढावा ➖
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

१ ) 🔵२४ जुलै २०१६- स्थापना.

२ )🔵 दि.१५ ऑगस्ट २०१६- हरिश्चंद्र खेंदाड लिखीत " शिवकाव्याभिषेक " काव्यसंग्रहाचे प्रकाथन.
🌹 प्रकाशन - रत्नप्रिया, सोलापूर.

🌹स्थळ - शिक्षणाधिकारी कार्यालय जि.प. उस्मानाबाद..

🌹 आयोजक- हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 मान्यवर -
मा. औदुंबर उकिरडे - शिक्षणाधिकारी.(मा.)

मा. सचिन जगताप _ शिक्षणाधिकारी. ( प्रा. )

मा. संजय राठोड - शिक्षणाधिकारी( निरंतर )

मा. कादरशेख - कवी तथा उपशिक्षणाधिकारी निरंतर 

🌹Press News- 
१९ ऑगस्ट२०१६ दै.दि. मराठी.
२८ ऑ.२०१६- संचार

   ३) 🔵६ नोव्हे. २०१६
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹 शाहीर अमर शेख जन्म शताब्दी वर्ष निमित्त 
१०१ कवीची मानवंदना
 
🌹 स्थळ - श्रावणबाळ बालकाश्रम , इंदापूर जि. पुणे.

🌹रानफूलचा सहभाग - मानपत्राने गौरव...

➖ संजयकुमार भालेराव.
➖ हणमंत पडवळ.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ पूजा स्वामी.

🌹 आयोजक-
➖ मदन देगावकर.
➖ सविता इंगळे.
➖ राजीव कारडे.

🌹 संयोजन - विकास राऊत , चाकण.

  ४)🔵२९ जाने. २०१७
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹 मदन दंदाडे - देगावकर लिखीत " बिगारी " या आत्मकथेच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळा
 
🌹 राज्यस्तरीय कवि संमेलनात. रानफूलचा  सहभाग...

➖ विमल माळी.
➖ हरिश्चंद्र खेंदाड
➖ राजेंद्र माळी.
➖ विकास राऊत.
➖ कोमल पाखरे.

🌹 संयोजन - 
    प्रमोद जगताप.
    प्रसाद मोहिते.

🌹 आयोजक -
लोककवी मदन देगावकर.

  ५)🔵 २२ एप्रिल २०१७.
.......................................
🌹कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच पुणे व प्रतिक इंटर नॅशनल फिल्मस पुणे आयोजीत शब्द विद्या साहित्य स्नेहसंमेलनात ....
🌹तीन रानफूलांचा झाला गौरव..

➖ कांचन वीर ( स्पर्धा पारितोषीक )
➖ हणमंत पडवळ ( स्पर्धा पारितोषिक )
➖ हरिश्चंद्र खेंदाड ( उत्कृष्ठ काव्य पुरस्कार- 'आई'
🌹 मान्यवर -  
➖मा.मेघराज राजे भोसले , अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.
➖ मा. अशोक सूर्यवंशी
निर्माता दिग्दर्शक.
➖ मा.बबन पोतदार
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक .
➖ पूजा चांदूरकर, सिने अभिनेत्री.
➖ हनुमंत चांदगुडे.
    कवी /गीतकार.
यांच्या उपस्थितीत झाला रानफुलांचा गौरव.

६)🔵 १७ जून २०१७- रोजी
हरिश्चंद्र खेंदाड लिखीत " थोरांची अक्षर चरित्रे " हे  चरित्र संग्रह प्रकाशन.

🌹 प्रकाशन -स्मार्ट पब्लिकेशन , सोलापूर.

🌹स्थळ - जि.प.अध्यक्षांचे दालन जि.प. उस्मानाबाद.

🌹 आयोजक- हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 मान्यवर -
मा.नेताजी पाटील - अध्यक्ष जि.प.उस्मानाबाद.

🌹मा.विलास कंटेकुरे - (शिक्षक नेते )

🌹मा.कल्याण बेताळे (शिक्षक नेते )

🌹मा.बशीर तांबोळी (शिक्षक नेते)

🌹मा. भैया पाटील(शिक्षक नेते)

🌹मा.बिभीषण पाटील (शिक्षक नेते )

🌹Press News-

२१ जून २०१७- संचार.
२२ जून २०१७- एकमत.

७) 🔵४ जुलै २०१७
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
नक्षत्राचं देणं काव्यमंच व उज्वलम अॅग्रो मल्टी स्टेट कॉ. ऑप. सोसा.लि. संयुक्त विद्यमाने आयोजीत.. राज्यस्तरीय नक्षत्र सन्मानीत काव्य मैफल..२०१७....

🌹रानफूलांच्या कवींचा सहभाग...

🌹 हरिश्चंद्र खेंदाड लिखीत " थोरांची अक्षर चरित्रे " या पुस्तकांच्या १५ प्रती मान्यवर / कवींना स्नेहांकित भेट देण्यात आल्या.
🌹 मान्यवर -
 ➖मा. प्रा. राजेंद्र सोनवणे.

➖ डॉ.मदन देगावकर

   - अॅड. शंकर कदम  

➖ सुरेश घंगाळे.

➖ विकास राऊत .

🌹स्थळ - स्वामी समर्थ फंक्शन हॉल , बार्शी जि. सोलापूर.

   ८)🔵 ३० जूलै १७.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
राज्यस्तरीय नक्षत्र माहेरच्या शब्दसरी काव्य मैफल... !

🌹स्थळ- आश्रम शाळा कळंब.

🌹  रानफूलच्या कवींचा निमंत्रीतात सहभाग...
➖ वसुंधरा शर्मा.
➖ संजय भालेराव.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
  -   प्रमोद जगताप.
 -    हणमंत पडवळ.
 -    प्रसाद मोहिते.
➖ संगीता भांडवले.
➖ मनीषा क्षीरसागर.
➖ जोती माकुडे.

🌹 या क्रार्यक्रमात हरिश्चंद्र खेंदाड यांच्या थोरांच्या अक्षर चरित्रांच्या १० प्रती साहित्यिकांना स्नेहांकित भेट देण्यात आल्या.
🌹 मान्यवर - 
➖ डॉ.मदन देगावकर.
➖ विकास राऊत
➖ संध्याराणी कोल्हे.

🌹संमेलनाध्यक्ष - लोककवी मदन देगावकर.

🌹 आयोजक _ कवयित्री सुरजाकुमारी गोस्वामी.

९) 🔵१ ऑक्टो. २०१७- १ले राज्यस्तरीय कौटुंबिक कविसंमेलन व शिक्षक गौरव सोहळा.

🌹 साहित्य , शिक्षण, माहिती तंत्रज्ञानात उल्लेखनीय ठसा आठवणाऱ्या ४५ दांपत्याचा जोडीने गौरव केला गेला.
🌹 मान्यवर -
➖ मा.कवी माधव पवार, सोलापूर.
➖ मा. कवी कादर शेख तथा उपशिक्षणाधिकारी जि.प. उस्मानाबाद.
➖ मा.दत्ता गोसावी , बार्शी,संत साहित्य अभ्यासक.
➖ मा. दत्तात्रय नलवडे .
से. नि., सहायक आयुक्त महानगर पालिका कोल्हापूर.
➖ मा.वंदना कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री , सोलापूर.

🌹 स्थळ - शंभूराजे , छत्रपती संभाजी महाराज चौक, मोहोळ रोड वैराग जि. सोलापूर.
🌹 संयोजन_ सौ. विजयालक्ष्मी ह. खेंदाड.
🌹 आयोजक _ हरिश्चंद्र खेंदाड.
🌹Press News- 
➖२ऑक्टो.१७ दै.सकाळ
➖ दै. दिव्य मराठी
➖ दै.लोकमत, 
➖४ ऑक्टो. दै. संचार

 १०)🔵२५ फेब्रू २०१८
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
 शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंच महाराष्ट्र व शब्दांकुर काव्य समुह आयोजीत 
राज्यस्तरीय कविसंमेलन करमाळा.....

🌹रानफूलला प्रमुख उपस्थितीचा बहुमान. सह
निमंत्रीतात टीम रानफूल.

🌹स्थळ -  देवीचा माळ , करमाळा जि. सोलापूर.

🌹 मान्यवर..
➖ मा. संजिवनी राजगुरू
➖ मा.अशोक हृदयमानव
➖ मा. हनुमंत चांदगुडे.
➖ मा. अॅड. शंकर कदम.
➖ मा.हरिश्चंद्र खेंदाड. 

🌹 निमंत्रीत कवी मध्ये टीम रानफूल मधील कवी.

➖ संगिता भांडवले.
➖ मनीषा क्षीरसागर.
➖ मनीषा अपसिंगेकर.
➖ सरिता फडके.
➖ सुमित्रा आटपळकर.
➖ भावना चौधरी.
➖ संजय भालेराव.
➖ अकबर मुलाणी.
➖ पंकज काटकर.
➖ विजयकुमार भालेकर.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.

 ११ )  🔵 २४मार्च २०१८
रानफूल तिघांना मिळाला प्रमुख पाहुणे पदी बहुमान.

🌹स्वातंत्र्य सेनानी कै. धोंडीरामजी सोनवणे सांस्कृतिक कला क्रीडा बहुउद्देशीय संस्था , कवठा व दयानंद शिक्षण संस्था कवठा ता. उमरगा जि. उस्मानाबाद. यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कवी संमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रानफुलच्या तीन साहित्यीकांना बहुमान....

   ➖कवी कादर शेख तथा उपशिक्षणाधिकारी , जि.प. उस्मानाबाद

➖हरिश्चंद्र खेंदाड .
     संस्थापक
रानफूल साहित्य व्यासपीठ

 ➖कवयित्री संगिता भांडवले 
  समुह प्रशासिका  रानफूल साहित्य व्यासपीठ

   @ निमंत्रीत कवीत टीम रानफूल
      मनीषा क्षीरसागर
      हणमंत पडवळ.
      भावना चौधरी.
      संजय भालेराव.
      अकबर मुलाणी.
      पंकज काटकर.
   
१२) 🔵१७जून २०१८-
गडकाव्यांजली प्रकाशन सोहळा व निमंत्रीतांची राज्यस्तरीय काव्य मैफल.

🌹हरिश्चंद्र खेंदाड लिखीत 'गडकाव्यांजली ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.

🌹 प्रकाशन - स्मार्ट पब्लिकेशन , सोलापूर 

🌹 मान्यवर - 
➖ मा. कवयित्री  कांचन वीर , तथा अध्यक्षा स्नेहाधार प्रकल्प, यवतमाळ, वर्ल्ड पार्लमेंट सदस्या U.S.A.

➖ मा. कवी माधव पवार, सोलापूर. तथा अध्यक्ष रा. ना.पवार प्रतिष्ठान. सोलापूर.

➖ मा.डॉ. मदन देगावकर बार्शी (लोककवी) 

➖ मा.महादेव आवारे, उपसंपादक दै. संचार तथा प्रकाशक स्मार्ट पब्लिकेशन , सोलापूर.

➖ मा. कवी कादर शेख तथा उपशिक्षणाधिकारी जि.प. उस्मानाबाद.

➖ मा.सुनिल शिखरे 
     अधिक्षक वर्ग२ , (माध्यमिक) जि.प. सोलापूर.

🌹 राज्यस्तरीय काव्य मैफलाध्यक्ष - डॉ.मदन देगावकर.

🌹 निमंत्रीत कवी म्हणून २४ कवींचा होता सहभाग.

🌹गडावरील काव्याचे " गडकाव्यांजली " हे साहित्य क्षेत्रातील पहिले पुस्तक असल्याने " डॉ. मदन देगावकर यांनी हरिश्चंद्र खेंदाड यांना या कार्यक्रमात ' ' 'गडकाव्यांजलीकार ' हे संबोधन  दिले.

🌹स्थळ - शंभूराजे, छत्रपती संभाजी महाराज चौक, मोहोळ रोड , वैराग.
जि. सोलापूर.

🌹संयोजक- सौ. विजयालक्ष्मी खेंदाड

🌹 आयोजक - हरिश्चंद्र खेंदाड.

🌹Press News- 
➖२२जून , दै. संचार
➖२३ जून ,दै. पुढारी
➖२४ जून, दै तरूण भारत.

१३) 🔵रानफूल चे सामाजिक , शैक्षणिक, साहित्यीक कार्य पाहून डॉ.मदन देगावकर प्रभावित.
रानफूल परिवारात डॉ.मदन देगावकरांचे आगमन.

१४ ) 🔵 डॉ.मदन देगावकरांची रानफूलच्या मुख्यप्रवर्तक पदी आजीव नियुक्ती.

१५)🔵रानफूलचे  निवेदक  संजयकुमार भालेराव .

१६ ) 🔵रानफूल सुत्रसंचालक 
हणमंत पडवळ.

 १७ )   १७ ऑगस्ट २०१८
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
स्वर्गीय  मोहम्मद रफी यांच्या स्मृतीदिन निमित्त .

🌹एक शाम रफी के नाम स्वैरमैफिल.....

🌹स्थळ - स्वामी समर्थ फंक्शन हॉल, बार्शी.

🌹रानफूलचा सहभाग -

➖संजयकुमार भालेराव.
➖ राहुल झोंबाडे.
➖ डॉ. चंदा सोनकर.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 आयोजक - डॉ.मदन देगावकर.

१८) 🔵५ सप्टे २०१८
 गडकाव्यांजली या. काव्यसंग्रहास क्रांतीज्योती माहिला बहुउद्देशिय केंद्र नेरपरसोपंत  , यवतमाळ चा राज्यस्तरीय उत्कृष्ठ काव्यसंग्रह पुरस्कार १ला पुरस्कार जाहिर .

१९)🔵९ सप्टे. २o१८
रानफूलची राज्यस्तरीय श्रावणी काव्यधारा महोत्सव .
🌹स्थळ - यमाईदेवी मंदीर डोंगर परिसर , कोरफळे ता. बार्शी जि. सोलापूर.
🌹 मान्यवर - 
➖ मा. ज्येष्ठ कवयित्री विमल माळी , अनगर.
➖ प्राचार्य सतिश मातणे.
➖ मा. कवयित्री मोहिनी कुलकर्णी तथा निवेदिका आकाशवाणी उम्मानाबाद केंद्र.
➖ डॉ. चंदा सोनकर गायिका,बार्शी.
➖ मा. गौतम जगताप, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती, कोरफळे.

🌹४० कविंचा होता सहभाग.

🌹 संयोजन - प्रमोद जगताप / बापू भोंग.

🌹आयोजक - डॉ.मदन देगावकर / हरिश्चंद्र खेंदाड.

🌹Press News- 
➖१४ स्प्टे . दै. संचार
➖१८ सप्टे. दै. पुण्यनगरी.

२०)🔵 १४आक्टो.२०१८ 
🌹अमृतवाणी काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय कवी संमेलनात रानफूल ला बहुमान ....

🌹स्थळ➖वांगी( बु ) ता. भूम जि. उस्मानाबाद.

🌹 मान्यवर - 
➖ डॉ.मदन देगावकर.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ सुमन चंद्रशेखर.

🌹काव्य संमेलनाध्यक्ष- डॉ.मदन देगावकर.

🌹 निमंत्रीत कवीत- रानफूल परिवारातील १० कविचा सहभाग.
२१) 🔵१२ नोव्हें.२०१८
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूल कवयित्री मनिषा क्षीरसागर यांच्या उधळण काव्यगंधाची व अजब सोयरिकेची गजब कहाणी. या पुस्तकांचे प्रकाशन.व 
राज्यस्तरीय कवी संमेलन.

🌹 प्रकाशन - स्मार्ट पब्लिकेशन , सोलापूर.

🌹स्थळ - भगवती मंगल कार्यालय ,तुळाजापूर.

मान्यवर - 
➖ मा.जनक टेकाळे
मा.उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचनालय , पुणे.
➖ मा.भारत सातपुते 
ज्येष्ठ साहित्यीक लातूर.

➖ कवी कादर शेख.
उपशिक्षणाधिकारी जि.प. उस्मानाबाद.

➖कवयित्री तृप्ती अंधारे
गट शिक्षणाधिकारी लातूर

➖ बाळकृष्ण तांबारे ( शिक्षक नेते )

➖ कल्याण बेताळे ( शिक्षक नेते )

➖लालासाहेब मगर( शिक्षक नेते)

➖ मा.महादेव आवारे.
उपसंपादक दै. संचार तथा प्रकाशक स्मार्ट पब्लिकेशन, सोलापूर.

🌹 कविसंमेलनाध्यक्ष - मा.डॉ. मदन देगावकर
मुख्य प्रवर्तक रानफूल साहित्य व्यासपीठ.

  @  रानफूलच्या वतीने रानफूल कवयित्री मनीषा क्षीरसागर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. 

🌹४२ कविंचा होता सहभाग.

🌹 संयोजक /आयोजक 
अशोक खडके.
मनिषा क्षीरसागर खडके.

🌹Press News-
16 Nov.18 दै. संचार.

२२ ) 🔵 शांता सलगर- 
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 
दि. १२ नोव्हे. १८ रोजी रानफूल साहित्य व्यासपीठ परिवाराच्या कार्याने प्रभावित होऊन कवयित्री शांता सलगर यांचे रानफूल परिवारात आगमन.

२३)🔵 अशोक खडके.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
दि. १३ नोव्हे. रोजी रानफूलची कार्यप्रणाली पाहून प्रभावीत होऊन रानफूल परिवारात आगमन..

२४) 🔵 रानफुल साठी आजीव तंत्रज्ञान सेवा देणार......................... 📹📹📹📹📹📹
🎤- अशोक खडके.

२५) 🔵१५ नोव्हे.२०१८
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼कोरफळे स्नेहग्राम मधील चिमुकल्यांसाठी मोफत काव्यगाणी कार्यक्रम..
🌹स्थळ - कोरफळे माळावर.

🌹रानफूलचा सक्रीय सहभाग.
डॉ.मदन देगावकर.
हरिश्चंद्र खेंदाड.
राहूल झोंबाडे.

🌹संयोजन - राहूल झोंबाडे.

🌹 आयोजक _
महेश निंबाळकर. 
विनया निंबाळकर.

🌹 Press News-
१६ नोव्हें.२०१८ . दै. संचार.

  २६) 🔵१८ नोव्हें.२०१८.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
वडवानल कल्चरल सेंटर चाकण आयोजीत कविवर्य ,गझलकार  सुनिलनाना पानसरे लिखीत " सदाफुली "  काव्य संग्रह प्रकाशन सोहळा.

🌹स्थळ - चाकण, पुणे.

🌹या सोहळयात डॉ.मदन देगावकर व हरिश्चंद्र खेंदाड रानफूल साहित्य व्यासपीठ च्या वतीने रानफूल सदस्य कवी  सुनीलनाना पानसरे यांना आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष मा. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत मानपत्र प्रदान करण्यात आले....

२७)🔵 माहे डिसें .१८ रानफूलची मोठी घोषणा...
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूल युट्यूब चॅनलची होणार  स्थापना.
🌹२०१९ चा नवीन उपक्रम - मासिक काव्य ध्वनिमुद्रण कार्यक्रम.
🌹दरमहा तीन कवींच्या तीन रचना मोफत रेकॉर्ड करून रानफूल चॅनलवर प्रसारित होणार....
🌹 संकल्पना - 
डॉ.मदन देगावकर.
🌹 आयोजक _ 
सौ. स्वाती मदन देगावकर.
🌹संयोजन - हरिश्चंद्र खेंदाड.
🌹स्थळ - कृष्णकांता ,
गांधीनगर, मदन देगावकर 
बार्शी.

 २८) 🔵१३ जाने२०१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
 १ला ध्वनिमुद्रण कार्यक्रम व रानफूल युटयूब चॅनलची स्थापना.
🌹 मान्यवर -
➖डॉ. चंदा सोनकर  (गायिका )
➖प्रा. गिरीश काशिद
➖जनक वाघमोडे.
🌹१ले तीन लाभार्थी
➖ शांता सलगर , तेर 
➖ मनीषा क्षीरसागर, तुळजापूर.
➖ विजयकुमार भालेकर.
🌹 चॅनल प्रमुखपदी - अशोक खडकेंची निवड.
🌹 निवेदन - संजय भालेराव.

२९)🔵 ३ फेब्रू २o१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
अनमोल अश्रू काव्यसंग्रह  प्रकाशन व राज्यस्तरीय निसर्ग काव्य मैफल........

🌹 कवयित्री  शांता सलगर लिखीत अनमोल अश्रू या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व राज्यस्तरीय निसर्ग काव्य मैफल.......

🌹स्थळ- संत गोरोबा नगरी , तेर. जि. उस्मानाबाद.

🌹 मान्यवर
➖ मा. डॉ.चंदा सोनकर, गायिका बार्शी.

➖ मा.डॉ.मदन देगावकर 
मुख्यप्रवर्तक रानफूल.

➖ मा.मल्हारी माने .
शिक्षण विस्तार अधिकारी, तुळजापूर.

➖ मा. हरिश्चंद्र खेंदाड.
संस्थापक रानफूल.

➖ मा.मनिषा क्षीरसागर
  कवयित्री , तुळाजापूर.

    -  कवयित्री शांता सलगर यांना रानफुलच्या वतीने " मानपत्र " देण्यात आले.

🌹४८ कविंचा होता सहभाग.

 @ कविसंमेलनाध्यक्ष - 
डॉ.मदन देगावकर.

🌹 संयोजिका - शांता सलगर
🌹 आयोजक- जनक वाघमोडे.
🌹Press News-
➖६ फेब्रू. दै. संचार.
➖१५ फेब्रू. दै.एकमत.

 ३० )🔵१० फेब्रू २०१९.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹प्रार्थना फाऊंडेशन संचालित प्रार्थना बालग्राम आयोजित......

🌹 प्रार्थना राज्यस्तरीय काव्य मैफल -२०१९

🌹स्थळ - मोरवंची ता. उत्तर सोलापूर.

🌹रानफूलला   मैफलाध्यक्ष व प्रमुख उपस्थितीचा बहुमान

🌹 काव्य मैफलाध्यक्ष -डॉ.मदन देगावकर ( मुख्य प्रवर्तक ) रानफूल.

🌹 मान्यवर- 
➖प्रा.विशाल गरड (वक्ते )
➖ शंकर कसबे.

➖ शांता सलगर.

➖ हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 निमंत्रीतात रानफूल कवी - 

➖ वसुंधरा शर्मा.
➖ संजय भालेराव.
➖ उमेश सुर्वे
➖ विजयकुमार भालेकर.

🌹Press News-
➖१५ फेब्रू - दै. संचार.
➖१९ फेब्रू . दै. जनमत.

 ३१ ) 🔵१९ फेब्रू. २o१९.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूल आयोजीत - शिवविचारांची शिवजयंती.

🌹स्थळ -"शंभूराजे " छत्रपती संभाजी महाराज चौक , मोहोळ रोड , वैराग जि. सोलापूर.

🌹१८० कात्रण संग्रह पुस्तिकांचे वाचकांसाठी खुले प्रदर्शन....

🌹 शिवप्रेमी व वाचकांच्या प्रदर्शनास भेटी.
🌹 आयोजक -
        हरिश्चंद्र खेंदाड. 
    संस्थापक / प्रशासक
रानफूल साहित्य व्यासपीठ

      Press News- 
- १७फेब्रू .१९ दै.संचार .
 _ १७ फेब्रू १९ दै. जनमत.

  ३२)🔵२३ फेब्रु.२०१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूल चा आवाज घुमला " सुगंधा '' चित्रपटात .......... !

🌹रानफूल निवेदक तथा समुह प्रशासक संजयकुमार भालेराव यांचा आवाज अशोक हृदयमानव दिग्दर्शित " सुगंधा " या चित्रपटासाठी दिला गेला. याचे रेकॉर्डींग पुणे येथील स्टुडीओत दिनांक २३l२l१९ रोजी पार पडले..... !

  ३३)🔵१० मार्च २o१९.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
षटकोळी साहित्यप्रेमी समुह आयोजीत -

🌹 राज्यस्तरीय षटकोळी कविसंमेलन.व रानफूल सदस्या संध्या कोल्हे लिखीत षटकोळी प्रकाशन सोहळा.

🌹 स्थळ - श्रीरामपूर , जि. अहमदनगर.

🌹 उदघाटक - डॉ.मदन देगावकर.( मुख्य प्रवर्तक रानफूल )

🌹 निमंत्रीत रानफूल कवी.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ संजयकुमार भालेराव.
➖ अकबर मुलाणी.
🌹रानफूल कवयित्री संध्या कोल्हे यांना रानफूल साहित्य व्यासपीठच्या वतीने ' मानपत्र ' देण्यात आले.
🌹 आयोजक- संध्या कोल्हे , औरंगाबाद.

 ३४ )🔵२८ मार्च २०१९.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
वसुंधरा फाऊंडेशन व कल्याणकारी युवक क्रांती कारक बहुद्देशीय संस्था आयोजीत....

🌹 वासंतिक काव्य मैफल..मोगरा फुलला... !

🌹 रंगकर्मी साहित्यीक सन्मान सोहळा... !

 @ स्थळ -डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह , सोलापूर. 

🌹रानफूलांचा सक्रीय सहभाग.

🌹 लोककवी डॉ.मदन देगावकर ( मुख्य प्रवर्तक रानफूल ) यांना व सुनील नाना पानसरे यांना ... मानपत्र प्रदान ... !

🌹 काव्य मैफल मान्यवर
➖ मा.माधव पवार.
    (अध्यक्ष रा.ना. पवार प्रतिष्ठान )

➖ हरिश्चंद्र खेंदाड.
 ( गडकाव्यांजलीकार , वैराग. )
➖ डॉ. शुभाताई लोंढे.
   ( गझलकार , पुणे )

➖ सारिका माकोडे.
( गझलकार , पुणे )

🌹मानपत्र प्रदान सोहळा मान्यवर -
➖ पुरूषोत्तम सदाफुले
अध्यक्ष अ.भा. कामगार साहित्य परिषद ,पुणे.

➖ संजयभाऊ चौधरी
( अध्यक्ष साई प्रतिष्ठान, पुणे )
➖ सविता इंगळे
( अध्यक्षा स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पुणे. )

🌹सुत्र  संचालन - रानफूलची प्रसिद्ध जोडी.

➖ हणमंत पडवळ
➖ संजयकुमार भालेराव.

🌹 व्हीडीओ चित्रीकरण - अशोक खडके ( रानफूल यूट्यूब चॅनल )

🌹रानफूलचे निमंत्रीत कवीत ...
शांता सलगर / ज्ञानेश्वरी शिंदे / मनीषा क्षीरसागर सह १५ रानफूलां बहुमान.

🌹 आयोजक
वसुंधरा शर्मा.
कृष्णप्पा कोटी .

     Press News -
- ३१ मार्च १९दै. संचार.

   ३५)🔵१ जून २०१९.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
डॉ. शुभांगी धारमळकर यांच्या "काव्यविभोर " काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व काव्य मैफल.

🌹स्थळ -राजींद्रीनगर  वडगाव शेरी , केशवनगर मुंढवा , पुणे.

🌹 मान्यवर -
➖ मा. संजयभाऊ चौधरी, (अध्यक्ष श्री.साई प्रतिष्ठान, पुणे )
➖ हरिश्चंद्र खेंदाड. ( प्रमुख पाहुणे ) संस्थापक रानफूल.
🌹 कवी संमेलानाध्यक्ष -
डॉ. मदन देगावकर
मुख्य प्रवर्तक  रानफूल.

३६)🔵१४ मे२o१९ 
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त.. !

🌹रानफूल काव्य मैफल.

🌹स्थळ -' शंभूराजे ' 
छत्रपती संभाजी महाराज चौक, मोहोळ रोड , वैराग जि. सोलापूर... !

🌹 मान्यवर - 
➖ महादेव आवारे , उपसंपादक दै. संचार सोलापूर.
➖ डॉ. चंदा सोनकर गायिका , बार्शी.
➖ तनुजा ढेरे , लेखिका, ठाणे.
➖ वसुंधरा शर्मा , सिने अभिनेत्री.

🌹 याच कार्यक्रमात रानफूलची मीरा आत्या , सिने अभिनेत्री वसुंधरा शर्मा. यांनी हरिश्चंद्र खेंदाड यांना " दादाश्री " ही उपाधी दिली.

🌹 चित्रीकरण - अशोक खडके. चॅनल प्रमुख.

🌹१४ निमंत्रित कविंनी सादर केल्या आपल्या रचना...
➖ शांता सलगर.
➖ अनिता देशमुख.
➖ ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे.
➖ मंदाकिनी नेमाने.
➖ संगीता भांडवले.
➖ प्राजक्ता कुलकर्णी
➖ प्रतिक्षा काळे.
➖ तन्वी खडके.
➖ रज्जाक शेख.
➖ अकबर मुलाणी.
➖ संजय भालेराव.
➖ विजयकुमार भालेकर
➖ हरिश्चंद्र खेंदाड .
➖ डॉ.मदन देगावकर.

🌹 आयोजक _ 
हरिश्चंद्र खेंदाड.
सौ.विजयालक्ष्मी खेंदाड.

🌹Press News- 
➖१७ मे दै. संचार .
➖१८ मे. दै. जनमत.

 ३७ )🔵२८ मे २०१९.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूलचा तेर परिसर अभ्यास दौरा ....

🌹 रानफूलांचा सहभाग -
➖ डॉ.मदन देगावकर.
➖ संजयकुमार भालेराव
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ शांता सलगर.
➖ जनक वाघमोडे.
➖नवल धाकपाडे.
🌹 तेर परिसरातील मंदीरे , स्तुप , संत गोरोबा काका मंदीर, गोरोबांचे जुने घर , पाण्यावर तरंगणारी वीट.पुराण वस्तुसंग्रहालय , इत्यादी ची पाहणी करून माहिती जाणुन घेण्यात आली.

🌹 आयोजक /मार्गदर्शक - शांता सलगर ,तेर

     - Press News-
३१ मे. दै. जनमत.

  ३८) 🔵१८ऑगस्ट २०१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
रानफूल श्रावण काव्यधारा मैफल व तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा..... !

🌹 प्रकाशन पुस्तके
➖ परिघाच्यापार - डॉ.मदन देगावकर.
➖ स्पंदन - अनिता देशमुख.
➖ गोष्ट एका शब्दाची- हरिश्चंद्र खेंदाड.

🌹स्थळ - श्री महादेव मंदीर चिंचगाव टेकडी, कुर्डूवाडी जि. सोलापूर.

🌹 मान्यवर 

➖ मा.रामानंद सरस्वती महाराज.

➖ मा. महादेव आवारे ( प्रकाशक )

➖ मा.वसुंधरा शर्मा. सिने नाटय अभिनेत्री तथा कवयित्री.

➖ मा.प्रकाश बनसोडे. ( कवी )

➖ मा.संतोष चव्हाण. ( शेतकरी तथा कथाकार.

➖ मा. शांता सलगर.कवयित्री / बालगीतकार / गझलकार.

🌹 काव्य मैफलाध्यक्षा _
शांता सलगर. ( अनमोल अश्रूकार )

🌹या कार्यक्रमात शांता सलगर यांनी रानफूलच्या वतीने हरिश्चंद्र खेंदाड व डॉ.मदन देगावकर यांना सत्कारार्थ मानपत्र प्रदान करण्यात आले.

🌹 डॉ.मदन देगावकर व हरिश्चंद्र खेंदाड यांनी रानफूलच्या वतीने अनिता देशमुख यांच्या सत्कारार्थ मानपत्र प्रदान केले.

🌹 अन्नदान - संतोष चव्हाण.

🌹४५ निमंत्रीत कविंचा होता सहभाग.

🌹 चित्रीकरण _ अशोक खडके. रानफूल चॅनल प्रमुख.

🌹 सुत्रसंचालन - संजय भालेराव / हणमंत पडवळ.

🌹 आयोजक

➖ डॉ.मदन देगावकर.
➖ अनिता देशमुख.
➖हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 Press News
➖२१ ऑगस्ट दै. संचार.

  ३९)🔵१ नोव्हे. २०१९.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹 डॉ. चंदा सोनकर यांच्या वाढदिवसा निमित्त.

🌹 वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी रानफूलची काव्यगाणी कार्यक्रम.....

🌹स्थळ - मातोश्री वृद्धाश्रम , गोपाळपूर - पंढरपूर.

🌹 सादर कर्ते -
➖ डॉ. चंदा सोनकर
➖ डॉ.मदन देगावकर
➖ हरिश्चंद्र पाटील.
➖ विजयकुमार भालेकर.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ शांता सलगर.
➖ सुवर्णा शिनगारे.

🌹 अडीच तासांचा सादर झाला कार्यक्रम.

🌹 रानफूलच्या वतीने डॉ. चंदा सोनकर यांना वाढदिवसाची स्नेहांकित भेट म्हणून शांता सलगर लिखीत काव्यमय मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
🌹 वृध्दाश्रातील सर्वांना अन्नदान संध्याकाळचे जेवण - डॉ. चंदा सोनकर यांच्या वतीने देण्यात आले.

🌹 संयोजन - प्रा. गिरीश काशिद.

🌹 आयोजक- गायिका डॉ. चंदा सोनकर . बार्शी.

🌹Press News- 
➖३ नोव्हें. दै. एकमत.
➖४ नोव्हे. दै. संचार.
  
४०)🔵१o नोव्हे.२०१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
रानफूल सदस्या सुनिता शटगार लिखीत सूर चांदण्याचे व प्राजक्त या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ......... व 
🌹 शिव -बसव प्रतिष्ठान आयोजीत राज्यस्तरीय काव्य मैफल.......

🌹स्थळ -हि .ने. वाचनालय अॅम्फी थिएटर , पार्क मैदानसमोर सोलापूर.

🌹 प्रकाशन - स्मार्ट पब्लिकेशन सोलापूर.

🌹 मान्यवर _ 
➖ कवी माधव पवार
➖ प्राचार्य नरेश बदनोरे
➖ डॉ. गुरुनाथ परळे
➖ डॉ. प्रदीप आवटे
➖ डॉ. कमलादेवी आवटे
➖ श्री.हरिश्चंद्र खेंदाड.
➖ श्री. प्रकाश बनसोडे.

🌹 काव्य मैफलाध्यक्ष.
मा.डॉ. मदन देगावकर.
(मुख्य प्रवर्तक ,रानफूल )

🌹 सुत्रसंचालन -
    वसुंधरा शर्मा
    हणमंत पडवळ

🌹 चित्रीकरण-अशोक खडके रानफूल चॅनल प्र.

🌹 निमंत्रीत रानफूल कवी-
➖ शांता सलगर
➖ अनिता देशमुख
➖ मनिषा क्षीरसागर
➖ ज्ञानेश्वरी शिंदे
➖ सुवर्णा शिनगारे
➖ संगिता भांडवले
➖ विमल माळी
➖ मंदाकिनी नेमाणे
➖ कविता पुदाले
➖ कविता काळे
➖ उमेश सुर्वे
➖ विजयकुमार भालेकर
➖ रामचंद्र धर्मसाले

🌹 आयोजक-
सातालिंग शटगार, संस्थापक शिव -बसव प्रतिष्ठान, सोलापूर.

🌹Press News- 
➖११ नोव्हे. दै. संचार
➖१२ नोव्हे. दै. संचार
➖१३ नोव्हे. दै. एकमत.

४१) 🔵१४ नोव्हे.२०१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूल बाल व्यासपीठची स्थापना....
🌹बालदिनाचे औचित्य साधून आज रानफूल साहित्य व्यासपीठने बालकांना बळ आणि व्यासपीठ मिळावे म्हणून रानफूल बाल व्यासपीठ या शाखेची स्थापना ऑन लाईन करण्यात बैठक घेऊन करण्यात आली...

🌹 संकल्पना - अनिता देशमुख / अशोक खडके.

🌹 बाल व्यासपीठ ऑनलाईन समिती - 
➖ डॉ.मदन देगावकर.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ शांता सलगर.
➖ ज्ञानेश्वरी शिंदे.
➖ अनिता देशमुख.
➖ अशोक खडके.
➖ विजयकुमार भालेकर.
🌹press News- 
➖१६ नोव्हे.१९ एकमत.

४२)🔵 बालकांच्या अभिव्यक्तीचे चित्रीकरण व चॅनलवर प्रसारण.....

🌹 आजपर्यंत वेगवेगळ्या शाळातील विद्यार्थ्यांच्या जवळजवळ ५२ अभिव्यक्ति रानफूल चॅनलवर प्रसारित करण्यात आल्या.....

🌹Press News-
20 नोव्हे. दै. दिव्य मराठी.

४३)🔵१ डिसे.१९.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूल मध्ये मोठा बदल.......
🌹 अध्यक्ष पदाला सुरवात. कालावधी १ वर्ष.

🌹 बाल व्यासपीठ अध्यक्ष - कालावधी २ वर्ष.

🌹त्रिसदस्त्रीय समिती नियुक्त...
➖ डॉ.मदन देगावकर.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ गणेश कसपटे.

४४ ) 🔵१५ डिसें१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूल साहित्य व्यासपीठच्या २०२० या वर्षाकरिता पहिल्या अध्यक्षा म्हणून अनिता देशमुख , उस्मानाबाद यांची निवड.
🌹रानफूल बाल व्यासपीठच्या (२०२०व २०२१ याठी ) कु. तन्वी खडके यांची त्रिसदस्यीय समिती मार्फत निवड.

🌹Press News- 
➖१६ डिसे. दै. संचार.
➖१७ डिसें. दै. एकमत.

४५ )🔵२२ डिसें.१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹 मासिक काव्य ध्वनिमुद्रण उपक्रमाचा सांगता समारंभ......

🌹 अनिता देशमुख / तन्वी खडके यांना अध्यक्ष पदी निवडीची पत्रे सत्कार करून समारंभ पूर्वक प्रदान.

🌹स्थळ - कृष्णकांता, डॉ.मदन देगावकर, गांधीनगर , बार्शी.

🌹 मान्यवर-
➖मा. युवराज नळे , गझलकार तथा गटनेता नगर परिषद उस्मानाबाद.

➖ शिल्पा वाघमारे गायिका.(बीड )

➖ सविता ढाकणे ,कवयित्री  अहमदनर.

➖ डॉ. संजयादेवी गोरे.
    पर्यावरण तज्ञ , लातूर.

🌹 सहभाग - टीम रानफूल.

🌹 आयोजक -
 साै.स्वाती मदन देगावकर.

🌹 press news

➖२५डिसें. दै. एकमत.
➖३० डिसें. दै. संचार.

४६ ) 🔵 रानफूलचा काव्य ध्वनिमुद्रण / चित्रीकरण एक यशस्वी उपक्रम.....
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹मुळ संकल्पना - डॉ.मदन देगावकर.

🌹 स्थळ - कृष्णकांता डॉ मदन देगावकर , गांधीनगर ,बार्शी.

🌹 निवेदन - संजय भालेराव

🌹 चित्रीकरण - अशोक खडके. चॅनल प्रमुख.

🌹 संयोजन - हरिश्चंद्र खेंदाड

🌹 आयोजक _ सौ स्वाती मदन देगावकर.

🌹 उपक्रमाचे वैशिष्टये - 

➖ सर्व सेवा मोफत
➖ वर्षभरात ३८ कविंच्या
 ११४ कवितांचे झाले चित्रिकरण....
➖रानफूल  चॅनलवर
 झाले प्रसारण..

🌹रानफूल चॅनलचे सबक्रायबर्स ६००च्या वर.

🌹press news
➖30 डिसें.19 दै. संचार

४७ ) 🔵२o१९ या वर्षात  मोफत काव्य ध्वनिमुद्रण उपक्रमात यांच्या झाल्या कविता रेकॉर्ड....
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹लाभार्थी यादी...
👇👇👇👇👇👇👇
रानफूल साहित्य व्यासपीठ -जाने १९ ते डिसें१९ या वर्षभरात खालील कवी / कवयित्रींच्या कविता ध्वनिमुद्रित झाल्या..

१ )शांता सलगर- तेर,उस्मानाबाद

२ ) मनीषा क्षीरसागर - तुळजापूर

३ ) कविता काळे - पुणे

४ ) विजयकुमार भालेकर - तुळजापूर

५ ) प्रमोद जगताप - फलटण , ( सातारा )

६ ) प्रकाश बनसोडे - चाकण, (पुणे )

७ ) नवनाथ खरात - करमाळा  सोलापूर 

८ ) हणमंत पडवळ - लातूर

९ ) ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे- सोलापूर

१० ) सोनाली आरडले - लातूर

११ ) मनिषा कुलकर्णी - नळदुर्ग 

१२ ) भाऊसाहेब कोळेकर - भूम 

१३ ) संगिता भांडवले - वाशी

१४ ) अनिता देशमुख - उस्मानाबाद

१५ ) रज्जाक शेख - अहमदनगर

१६ ) सुनिता शटगार - सोलापूर

१७) राजेंद्र माळी - लातूर.

१८ ) मंदाकिनी नेमाने - बार्शी.

१९ ) भावना चौधरी - उस्मानाबाद .

२० ) संध्याराणी कोल्हे - औरंगाबाद 

२१ ) डॉ. जयश्री घोडके - नळदूर्ग

२२ ) कविता पुदाले- नळदुर्ग

२३ ) नितीन गायके - नेवासा ( अ.नगर )

२४ ) संतोष चव्हाण ( कथा ) -  कुर्डूवाडी 

२५ ) विमल माळी - अनगर

२६ ) सुवर्णा शिनगारे _ उस्मानाबाद

२७ ) सुमन चंद्रशेखर - बार्शी.

२८ ) अकबर मुलाणी - वैराग 

२९ ) डॉ.मदन देगावकर _ बार्शी

३० ) हरिश्चंद्र खेंदाड. _ वैराग

३१ ) युवराज नळे- उस्मानाबाद

३२) सविता ढाकणे - अहमदनगर

३३) शिल्पा वाघमारे - बीड

३४ ) वसुधा लिमकर - तुळजापूर

३५ ) संजय भालेराव - वैराग

३६ ) संजयादेवी पवार - लातूर .

३७ ) तनुजा ढेरे - ठाणे.

३८) डॉ.चंदा सोनकर - कोल्हापूर .

🌹Press News.
➖30 डिसे. दै. संचार.

४८ ) 🔵२५ डिसें.२०१९
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूल कोअर कमिटीची स्थापना......

🌹 उद्दीष्ट- 
रानफूल साहित्य व्यासपीठ व विविध कार्यक्रम आयोजन / नियोजन / प्रशासन या सारख्या सर्व कामकाजासाठी कोअर कमिटीची स्थापना.... 

🌹रानफूल त्रिसदस्यीय समितीने केली कोअर कमिठीची निवड.....

🌹रानफूल कोअर कमिटी
👇👇👇👇👇👇 

१ ) मा.अनिता देशमुख ( अध्यक्षा)

२ ) शांता सलगर .            सदस्या

३) अशोक खडके - सदस्य              

४) विजयकुमार भालेकर -
सदस्य
५) संजयकुमार भालेराव-  सदस्य    

६) हरिश्चंद्र  खेंदाड -      सदस्य       

७) डॉ.मदन देगावकर-      सदस्य   

८ ) महादेव आवारे-       सदस्य  

९ ) अकबर मुलाणी-    सदस्य      

१०) ज्ञानेश्वरी शिंदे-    सदस्य       

११) गणेश कसपटे (सचिव)

४९)🔵५ जाने. २०२०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹 शांता सलगर " साऊ" सन्मानाने सन्मानित.......

🌹 जिजाऊ चौक ,उस्मानाबाद.

🌹 मान्यवर _
➖ मा. अनिता देशमुख, अध्यक्षा.
➖ गणेश कसपटे, सचिव
➖ हरिश्चंद्र खेंदाड संस्थापक.

🌹रानफूलची प्रतिभांत कवयित्री /अनमोल अश्रूकार / बालगीतकार / गझलकारा गेले वर्षभर विद्यार्थांसाठी बालगीताचे सदर रानफूलवर अथकपणे चालवून मुलांसाठी मनोरंजनाचा जागर मांडला व शिक्षणाची गोडी लागण्या कामी प्रयत्न केले सावित्रीच्या विचारांचा जागर केला . याची दखल घेऊन रानफूल साहित्य व्यासपीठच्या वतीने छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमात अध्यक्षा मा. अनिता देशमुख यांच्या हस्ते रानफूल संस्थापक हरिश्चंद्र खेंदाड यांनी शांता सलगर यांना "साऊ" सन्मान प्रदान केला...

🌹या साऊ सन्मान वितरणास रानफूल कोअर कमिटीचे सचिव मा.गणेश कसपटे , सदस्य जनक वाघमोडे, सुवर्णा शिनगारे, विजयालक्ष्मी  खेंदाड, तर बाल रानफूलचे सदस्य मेघना कसपटे, वेदांत कसपटे, शंभूराजे खेंदाड, अयोध्या वाघमोडे, कौस्तुभ वाघमोडे.आदि उपस्थित होते.

🌹Press News-

➖७ जाने.२०२० दै.एकमत 

५०)🔵 दि. १०,११,१२ जाने. २०२० रानफूलने गाजवली काव्य मैफल
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - उस्मानाबाद.मध्ये रानफूलच्या जवळ जवळ ४५ कवींनी सादर केल्या आपल्या काव्यरचना...

🌹स्थळ - कविकट्टा, संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद.

🌹press news

➖१३जाने.२०२०दै. संचार

 ५१ ) 🔵९३ व्या साहित्य संमेलनात रानफूल टिमने केली साहित्य सेवा......

🌹 वेगळया वेगळया समितीत रानफूलने केले देहभान विसरून काम...

🌹 कवीकट्टा सन्मवय समिती.
➖ मा.अनिता देशमुख.
➖ मा.युवराज नळे.

🌹 स्वागत समिती -
➖ संगिता भांडवले.

🌹 प्रमाणपत्र लेखन समिती-
➖ डॉ.मदन देगावकर.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.

🌹सुत्रसंचालन समिती

➖ अनिता देशमुख.
➖ संजय भालेराव.
➖ शांता सलगर.
➖ हणमंत पडवळ.
➖ मनीषा क्षीरसागर.
➖ सोनाली आरडले.
➖ रोहिणी माने.
➖ संगिता थडवे.
➖ सुवर्णा शिनगारे.
➖ अनुराधा देवळे.
➖ सुषमा सांगळे.
➖ प्रा.संजयादेवी गोरे.
➖ प्रा.डॉ. कृष्णा तेरकर.
➖ संजय धोंगडे.

🌹 ग्रंथदिंडी समिती
➖ गणेश कसपटे.

🌹 प्रसिद्धी/चित्रीकरण विभाग -
➖ अशोक खडके.
रानफूल चॅनल प्रमुख.

५२)🔵११ जाने. २०२०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹 ९३ वे आखिल भारतीय मराठी साहित्य उस्मानाबाद  MTV वाहिनीवर रानफूलच्या कविता झाल्या लाईव्ह सादर...... !

🌹 सादरकर्ते - 

➖ डॉ.मदन देगावकर.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ संजय भालेराव.
➖ मनीषा क्षीरसागर
➖ सुवर्णा शिनगारे.

🌹स्थळ - संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद .

५३ ) 🔵१९ जाने.२०२०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
उस्मानाबादकरांनी  करुन दाखवले लातूर संचारच्या पत्रकारांनी घेतली रानफूलची दखल....

🌹 संमेलनावर केली मोठी स्टोरी..... 

🌹 स्टोरीत घेतली मा. अनिता देशमुख (अध्यक्षा रानफूल साहित्य व्यासपीठ ) ची बाईट.... !

🌹press news-
१९ जाने.दै.संचार -लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, विजापूर,इंदापूर(आवृत्ती) 

५४ ) 🔵२०२० चा रानफूलचा नवीन उपक्रम.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹रानफूलची वारी साहित्यीकाच्या दारी...

🌹या मध्ये दरमहा एका साहित्यीकाची मुलाखत होणार चॅनलवर प्रकाशीत.

🌹 संकल्पना - डॉ.मदन देगावकर.

🌹सादरकर्ते - टीम रानफूल.

५५) 🔵९ फेब्रू .२०२०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹रानफूलची वारी साहित्यीकाच्या दारी

🌹१ले पुष्प- 

➖कवी माधव पवार , सोलापूर.

🌹 स्थळ - कवी माधव पवार यांचे घर,सात रस्ता मोदी, सोलापूर .

🌹 मुलाखतकार - 

➖ शांता सलगर.
➖ ज्ञानेश्वरी शिंदे.
➖ गणेश कसपटे
➖ संजय भालेराव.
➖ हरिश्चंद्र खेंदाड.
➖ डॅा. मदन देगावकर.

🌹चित्रीकरण _
अशोक खडके.चॅनल प्रमुख

🌹press News
➖१२ फेब्रू. दै.एकमत.

५६)🔵 १९ फेब्रू. २०२०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
🌹 शिवजयंती निमित्त रानफूलचे कात्रणसंग्रह प्रदर्शन......

🌹स्थळ - शंभूराजे, छत्रपती संभाजी महाराज चौक , मोहोळ रोड, वैराग जि. सोलापूर.

🌹 मुलांना खाऊ वाटप.

🌹 आयोजक _ हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 Press News - 
➖१४ फेब्रू. दै. एकमत.

५७)🔵रानफूलच्या तीन साहित्यीकांची स्मार्ट वाङमय पुरस्कारासाठी निवड.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹१) परिघाच्या पार- डॉ.मदन देगावकर.

🌹२) गडकाव्यांजली - हरिश्चंद्र खेंदाड.

🌹३) अनमोल अश्रू - शांता सलगर.

🌹 उदघोषणा  -
प्रकाशक  स्मार्ट पब्लिकेशन,सोलापूर.

🌹press news

➖२० फेब्रू.२०२०दै संचार / दै.एकमत.

५८) 🔵२१ फेब्रू. २०२०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹निमंत्रितांचा महा शिवकाव्याभिषेक
 
🌹 स्मार्ट वाङमय पुरस्कार वितरण सोहळा...

🌹 महाशिवकाव्याभिषेक काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा.

🌹 संपादन - महादेव आवारे.

🌹स्थळ - पुण्यवंत भूमी सासुरे नगरी, महंकाळेश्वर मंदीर, सासुरे ता. बार्शी जि. सोलापूर.

🌹 पुरस्कारार्थी

➖ अनमोल अश्रू - शांता सलगर.

➖ परिघाच्या पार- डॉ.मदन देगावकर.

➖ गडकाव्यांजली - हरिश्चंद्र खेंदाड .

🌹 मान्यवर 
➖ मा.माधव पवार, सोलापूर.

➖ मा.महादेव करंडे
विश्वस्त मंदीर ट्रस्ट , सासुरे.

➖ मा. अनिता देशमुख ,
  अध्यक्षा रानफूल.

➖ युवराज नळे, गझलकार. उस्मानाबाद.

🌹 निमंत्रीत कवी _ 
रानफूलचे ३५ कवी ना निमंत्रीत कवी म्हणून सन्मान मिळाला .

🌹 सूत्रसंचालन _ 
➖ संजयकुमार भालेराव.
➖ हणमंत पडवळ.

🌹 चित्रीकरण 
अशोक खडके . चॅनल प्रमुख.

🌹 आयोजक
➖ मा.महादेव आवारे
उपसंपादक दै. संचार तथा प्रकाशक स्मार्ट पब्लिकेशन, सोलापूर.
➖ महंकाळेश्वर मंदीर ट्रस्ट.

🌹 press news

➖२३ फेब्रू  दै. सकाळ
➖ २४फेब्रू दै. संचार
➖२५ फेब्रू दै.दिव्य मराठी.
➖२५ फेब्रू दै. पुढारी.

५९ ) एप्रील २०२०
@@@@@@@

@ रानफूलची वारी साहित्यीकाच्या दारी.......

@ पुष्प  २रे

@ मान्यवर - 
मा. योगीराज वाघमारे ,
ज्येष्ठ साहित्यीक , ग्रामीण 
कथाकार,बालसाहित्यीक,

@स्थळ - श्रावस्ती,पद्मजा
पार्क, सोलापूर.

@ सादरकर्ते -
  _ मदन देगावकर.
  _हरिश्चंद्र खेंदाड.
  _संजय भालेराव.
  _ गणेश कसपटे.
  - शांता सलगर.
  - ज्ञानेश्वरी शिंदे.

   @ चित्रीकरण.

  _ अशोक खडके.

६o)🔵रानफूलच्या दोन पुस्तकांचे झाले वृत्तपत्र परीक्षण प्रकाशित.
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

१ )🌹 अजब सोयरिकेची गजब कहाणी➖ मनीषा क्षीरसागर .

🌹परीक्षण- बालाजी मदन इंगळे. उमरगा

🌹 वृत्तपत्र - 
➖२८ ऑक्टो.२०१९ दै. सकाळ. 

२ )🌹 गडकाव्यांजली - हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 परीक्षण - हरिश्चंद्र पाटील. टेंभूर्णी.

🌹 वृत्तपत्र -
➖२० फेब्रू. २०२०दै. पुण्यनगरी.

६१)🔵 रानफूल सदस्यांची प्रकाशीत पुस्तके..
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

१ )बिगारी - डॉ.मदन देगावकर.

२) शिवकाव्याभिषेक - हरिश्चंद्र खेंदाड.

३) थोरांची अक्षर चरित्रे - 
हरिश्चंद्र खेंदाड.

४) फूललेरे मन माझे - जि.प. प्रशाला काटी. ( संपादन -हरिश्चंद्र खेंदाड.

५) गडकाव्यांजली - हरिश्चंद्र खेंदाड.

६ ) ओंजळ काव्यफुलांची _ मनीषा कुलकर्णी (अपसिंगेकर)

७) माणुसकी- कविता पुदाले.

८) उधळण काव्यगंधाची- मनीषा क्षीरसागर.

९) अजब सोयरिकेची गजब कहाणी - मनीषा क्षीरसागर.

१०) आय.टी.ट्रीक्स -भाग१- रंजना स्वामी.

११ ) शैक्षणिक अॅप्स - मंजूषा स्वामी.

१३ ) शिंपल्यातील मोती- मंजूषा स्वामी.

१४ ) अनमोल अश्रू - शांता सलगर.

१५ ) प्राजक्त- सुनिता शटगार

१६ ) सूर चांदण्यांचे - सुनिता शटगार.

१७ ) स्पंदन - अनिता देशमुख.

१८ ) परिघाच्या पार - डॉ.मदन देगाववर .

१९ ) गोष्ट एका शब्दाची _ 
हरिश्चंद्र खेंदाड.

२०) पूण्यवंत भूमी सासुरे नगरी- महादेव आवारे .

@ प्रकाशन - स्मार्ट पब्लिकेशन सोलापूर.

६२)🔵रानफूलने यांना दिली मानपत्रे _
🌼🌼🌼🌼🌼🌼

१ ) मनीषा क्षीरसागर -तुळजापूर.

२ ) सुनील पानसरे - चाकण, पुणे.

३ ) शांता सलगर - तेर , उस्मानाबाद.

४ ) संध्या कोल्हे- औरंगाबाद.

५ ) डॉ. चंदा सोनकर - बार्शी.

६ ) अनिता देशमुख - उस्मानाबाद.

७ ) डॉ.मदन देगावकर- बार्शी

८ ) हरिश्चंद्र खेंदाड.

६३) 🔵रानफूलवर चाललेली अखंड सदरे. ( मागील )
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹 माझी बोधकथा- मनीषा क्षीरसागर.

🌹पत्रास कारण की- हरिश्चंद्र खेंदाड.

🌹वेदनेच्या डायरितले पान- मदन देगावकर.

🌹 गोष्ट एका शब्दाची- हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 बालगीत - शांता (साऊ) सलगर.

🌹 रात्र चारोळी- प्रमोद जगताप.

🌹 ओवी नारी शक्तीची - मनीषा क्षीरसागर. - मनीषा क्षीरसागर.

🌹बिगारी क्रमशः वाचन - मनीषा क्षीरसागर.

🌹 गोष्ट एका वळणावरची क्रमशः वाचन- मनीषा क्षीरसागर.

🌹 रविवारची गाव फेरी-
कमलाकर भोसले.

🌹 गावाकडचे खेळ - कमलाकर भोसले.

🌹 कवितेच्या गावा जावे -मनीषा कुलकर्णी.

🌹 मनाचे श्लोक _ कविता पुदाले.

🌹 चरित्र काव्यमाला -ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे.

🌹 चारोळी - अनिल दाभाडे.

🌹 गडकाव्यांजली - हरिश्चंद्र खेंदाड.

६४)🔵 रानफूलची सध्याची चालू सदरे
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹 इंग्रजी ऱ्हाईम्स- शांता( साऊ) सलगर.

🌹 गडकाव्यांजली - हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 चरित्र काव्यमाला - ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे.

🌹 मायकाव्य - अॅड. शंकर कदम.

🌹 जीवनमंत्र - हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 पहाटवारा - हणमंत पडवळ.

🌹 चारोळी - अनिल दाभाडे.

६५) रानफूलांचे झाले उस्मानाबादआकाशवाणीर काव्यवाचन
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹 अनिता देशमुख.

🌹 हरिश्चंद्र खेंदाड 

🌹 शांता (साऊ) सलगर.

🌹 सोनाली आरडले.

🌹 मनीषा कुलकर्णी.

🌹 मनीषा क्षीरसागर

🌹 आशाबी शेख.

🌹 पंकज काटकर.

🌹 डॉ.जयश्री घोडके

🌹 अनुराधा देवळे.

🌹 कविता पुदाले.

🌹 विजयकुमार भालेकर.

६६)🔵 रानफूलचे पत्रकार शिलेदार...
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹 मा.महादेव आवारे.

🌹 मा.अभिमान हंगरकर

🌹 मा. अण्णासाहेब कुरूलकर.

🌹 भागवत वाघ.

६७) 🔵रानफूलने दिलेल्या उपाधी...
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹 साऊ- शांता सलगर 

🌹 गडकाव्यांजलीकार- हरिश्चंद्र खेंदाड.

६८)🔵रानफूलली पुरस्कार प्राप्त पुस्तके -
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹गडकाव्यांजली - २

🌹 अनमोल अश्रू - १

🌹 परिघाच्या पार- १

६९)🔵रानफूल परिवारातील टोपण संबोधने .
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🌹 अनुसूर्य - अनिता देशमुख.

🌹 बप्पा - मदन देगावकर

🌹 आप्पा - महादेव आवारे 

🌹 काका - हणमंत पडवळ.

🌹दादाश्री - हरिश्चंद्र खेंदाड.

🌹 साऊ- शांता सलगर.

🌹 दिदी - ज्ञानेश्वरी शिंदे.

🌹 खूर्चीताई - सुवर्णा शिनगारे

🌹बप्पा - युवराज नळे

🌹 कांदा फेम - विजयकुमार  भालेकर

🌹 हास्य सम्राट - उमेश सुर्वे.

🌹मनुताई - मनीषा क्षीरसागर

🌹 रेखानिल- रेखा ढगे.

🌹 मीरा आत्या - वसुंधरा शर्मा.

🌹येसू- मंदाकिनी नेमाने

🌹 आवाज के बादशहा - 
संजयकुमार भालेराव.

    © हरिश्चंद्र खेंदाड.
रानफूल साहित्य व्यासपीठ

Friday, March 13, 2020

कविता *कोरोना व्हायरस*


।। कोरोना व्हायरस।। 

कोरोनाची  नको भिती
कोरोनाचा नको धसका
रुमालाचा वापर करुन
मगच शिंका किंवा ठसका     ।। १।। 

कोव्हिड-19 ने घातलाय
धुमाकूळ अनेक देशांत
वैयक्तिक व  सार्वजनिक 
स्वच्छता करा परिसरात  ।। २।। 

 ताप, थकवा,डोकेदुखी
 खोकला, स्नायुचं दुखणं
लक्षणे दिसताच प्रथम कर्तव्य 
जवळच्या रुग्णालयात जाणं    ।। ३।। 

आजारी माणसाला नका करु स्पर्श
नाक, तोंड, डोक्याला हात लावणं टाळा
मास्कचा करा वापर गर्दीत नका जाऊ
त्यानेच संसर्गाला बसेल संपूर्णतः आळा ।।४।। 

सध्या, अफवांचे फुटलेय  पेव
ब्रेकिंग न्यूजने केलाय कहर
कोरोनाच्या भितीनेच अनेकांनी
 वर्ज्य केलाय मांसाहार   ।। ५।। 

विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी
आरोग्य यंत्रणा सज्ज आहे
डॉक्टरांच्या कार्यतत्परतेला
त्रिवार वंदन आहे, त्रिवार वंदन आहे  ।। ६।। 

संगीता भांडवले 
वाशी ,उस्मानाबाद
©®
९९२३४४५३०६
    myshikshankatta.blogspot.in



Friday, February 7, 2020

कविता, ।। मामाची पोरगी।।

।।कविता।। 
।। मामाची पोरगी।। 
मामा तुमची पोरगी
आहे लई हुशार
तिला पाहून मी
झालो बघा बेजार  ।। १।। 

मामा तुमच्या पोरीला
विचारा नं जरा
कर म्हणावं माझा
विचार तु  गं जरा   ।। २।। 

येऊ लागलेत स्थळं
मामा यंदा माझ्यासाठी
करा नं विचार थोडा
जरा आमच्या लग्नासाठी  ।। ३।। 

मामा तुमची पोरगी
आहे थोडीशी सावळी
कधी तक्रार करणार नाही
असुनसुद्धा जरा बावळी   ।। ४।। 

मामा तुमचा आता
वाढवू नका तोरा
तुमचा भाचा तुंम्हाला
ठेवायचा का हो कोरा  ।। ५।। 

मामा आता तुम्ही
जरा विचार करा
तिच्यापेक्षा मी थोडा
आहे ना हो गोरा  ।। ६।। 

मामा तुमच्या पोरीचा
हात द्या माझ्या हाती
मागच्या सारखीच पुढे सुद्धा
अशीच जपूयात नाती   ।। ७।। 

मामा तुमच्या पोरीने
दिला नकार मला
तर खरं सांगतो.. ! (आई शप्पथ!!
पळवून नेईल तिला  ।। ८।। 

मामा तुमच्या पोरीला
समजवा  बघा जरा
मी आहे थोडा आवारा
पण्, संसार करील बरा.! । । ९।। 

संगीता भांडवले 
वाशी, उस्मानाबाद
myshikshankatta.blogspot.in

Tuesday, February 4, 2020

।। कविता।। ।। लेक लाडकी या घरची।।

।। लेक लाडकी या घरची।। 
हिरवा चुडा सौभाग्याचा
शोभे गव्हाळ रंगाला
लेक माझ्या सानुलीच्या
हळद लागली अंगाला   ।। १।। 

मळवट शोभतो  भाळी
मोती अन् लाल कुंकवाचा
कन्यादान करुन जाईल 
तुकडा माझ्या काळजाचा   ।। २।। 

सजलेल्या नवरीला
व-हाडी  पाहू लागली
कळलेच नाही  कधी
बाळ मोठी केंव्हा झाली  ।। ३।। 

लेकीमुळेच अंगण माझे
सदोदित हसरे दिसायचे
मुलगी परक्याचे धन म्हणत
आता सारे विसरायचे   ।। ४।। 

लेकीमुळे मायबापाचं
काळीज थोडं थोडं तुटतं
लेक लाडकी या घरची म्हणत
मनाला समजायचं असतंं   ।। ५।। 

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद

Wednesday, January 29, 2020

महाशिवरात्र , काव्यरचना

।। महाशिवरात्र।। 

वाहून बेलाचे पान
पूजा करावी शिवाची
घालून रुद्राक्षाच्या माळा
करावी आरास शुभ्र फुलाची  ।। १।। 

शाळुंका, बेल, फूल
शिव पिंडीवर वहावे
धोत्रा, आंबा पत्री सह
शिव पूजन करावे      ।। २।। 

घालून पंचामृत स्नान
शिव पिंडीस पूजावे
नको हळद कुंकुम
भस्म मात्र वापरावे    ।। ३।। 

महाशिवरात्रीला शिवाला
करुन पंचगव्याचा अभिषेक
मग द्यावा  शिव पिंडीवर
सुंदर पंचामृताचा लेप  ।। ४।। 

शिव पिंडीला शिवभक्तांनी
अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी
ॐ नमो:शिवाय च्या  मंत्राने
जपमाळ पूजा करावी    ।। ५।। 


तांदूळ पिठीच्या २६ दिव्यांनी
शिवाचे औक्षण करावे
त्यावेळीच १०८ दिवे
दान सुद्धा करावे     ।। ६।। 

श्रीमती भांडवले संगीता
वाशी, उस्मानाबाद