Tuesday, May 3, 2016
अविस्मरणिय क्षण
माझ्या मित्रपरिवारातील लग्नाचा हा अविस्मरणिय क्षण.अगदी कुठेही लग्नाला जायचे म्हंटले की मी या गोष्टी आवर्जुन तपासते.
माझ्या मैत्रिणीच्या मुलीचे लग्न चाऱवर्ष्यापुर्वी झाले.लग्न मुलाकडे म्हणजेच सांगलीला होते.लग्नाची सर्व तयारी जोरात झाली होती.आदल्यादिवशी नवरी हळदीसाठी व व-हाड दोन्हीही सोबतच निघणार होते.लग्नात द्यायचे सर्व सामान एका रुममध्ये ठेवले होते.बस्ता,पाहुण्यांच्या बँगा सर्व एकाच ठिकाणी ठेवले होते. नवरीमुलीचे सर्व सामान उदा.साड्या,शालु,दागिऩे,मेकअप किट याच्या दोन बँगा वेगळ्याच काँटवर ठेवल्या होत्या.शिदोरी,सामान ठेवलंय का?म्हणुन पुरुषमंडळी सारखी विचारत होती.पाठवणीच्या नादात अन् रडारडीच्या गोंधळातच सर्वचजण ठेवलंय ठेवलंय म्हणुन नवरीला हळदीला पाठवुन रात्री व-हाड पण निघाले.दुस-या दिवशी हळदीसाठी नवरीमुलीचे दागिऩे, साड्या, शालुची मागणी वरपक्षाकडुन झाली. मग बँगा ची शोधाशोध सुरु.कुठेच पत्ता नाही.मग शेवटी लक्षात आले की या बँगा बहुतेक घरीच राहिल्या असतील.ऐनवेळी काय करावे समजेना.काऱण अंतर पण खुप लांबचे.माझ्या मैत्रिणीच्या लक्षात आले बँगा कॉटवर ठेवल्या होत्या.शिदोरी आली मग बँगा कशा नाहीत?तर्क-वितर्क सुरु झाले.नवरी मुलगी तर काय? आकाश कोसळल्यागत धाय मोकलुन रडु लागली.कारण सर्वच सामान उदा दागिऩे, साड्या, मेकअप यापैकी काहीच नाही,,, मी ऐनवेळी काय करु?कसे करु?सर्वांनी तिला समजावले.कसेतरी नवरीमुलीच्या बापाने पैशाची जुळवाजुळव करुन ऐनवेळी आवश्यक ते सामान,,शालु,दागिऩे मित्रांच्या मदतीने आणले.या सर्व धावपळीत लग्न जरा उशीराच लागले.लग्नात दिवसभर याचीच चर्चा. दुस-या दिवशी घरी आल्यावर पाहतात तर काय? बँगा कॉटवर नसुन कॉटखाली कुणीतरी मुद्दामच सरकावुन ठेवलेल्या होत्या.सामानाच्या आडबाजुला ठेवले होते.किती हा खोडसाळपणा.कुणीतरी जवळच्याच नातेवाईकाने हे काम केले असणार ना?जातानाच लगीनघाईत त्यांनी फायदा घेतला पण असा आसुरी आनंद घेऊन त्यांना काय मिळाले असेल बरं!!
पण माझ्या मात्र हा प्रसंग कुठेही लग्नाला गेले की एकदम डोळ्यासमोर उभा राहतो.त्या नवरीमुलीचा चेहरा आठवतो.असा प्रसंग पुन्हा कधी येऊ नयेे म्हणुन मी ज्या ज्या वेळी नातेवाईकांच्या लग्नात जाते ना तेंव्हा नवरी जाताना हळद असो की पाठवणी.नवरीमुलीच्या सामानाच्या बँगा ठेवल्यात का?हे अगोदर मी आवर्जुन पाहते.
संगीता भांडवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment