Monday, May 23, 2016
अरुणा शानबाग यांच्या स्मृतीदिनानिमित्त काव्यमय आदरांजली
केईएम रुग्णालयातील नर्स अरुणा शानबाग यांच्यावर १९७३ मध्ये अत्याचार झाला,४२वर्षे त्या कोमात होत्या.गेल्या वर्षी १८मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त काव्यमय आदरांजली.
अरुणा शानबाग-
काव्यमय आदरांजली
----------------------
संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
********************""****************************
कर्नाटकची अरुणा
मुंबईत आली
मात्र वॉर्डबॉयने
अत्याचार करुन
ती कायमची
कोमात गेली ।।१।।
अरुणाला माहित होते
सोहनलालचे गुढ
तक्रारीच्या भितीनेच
त्याने घेतला सुड ।।२।।
दारुच्या व्यसनापायी
कुत्र्याचे खाणे चोरुन नेई
दांड्या मारण्यात झाला पटाईत
अरुणाने दम दिला
म्हणुनच तो संतापला ।।३।।
अरुणाने तुला समजावला,धमकावला
संतापुन तु राक्षसी अत्याचार केला
का रे सोहनलाल तु नाही कळवळला
कुत्र्याच्या साखळीणेच गळा आवळला ।।४।।
न्यायदेवता आपली आंधळी
बलात्काराची शिक्षा नाही झाली
फक्त खुणाचा प्रयत्न??
आरोप झाला
सात वर्षेच तुला तुरुंगवास
भोगावा लागला ।।५।।
शिक्षा भोगलीस पण
सुड कायम राहिला
कोमातील अरुणावर
हल्ल्याचा प्रयत्न केला
मात्र आजुबाजुच्या लोकांनीच
तो हाणुन पाडला ।।६।।
लग्न ठरले डॉक्टरांशी
म्हणुन ती सुखावली
लग्नासाठी पैशांची
तरतुद ही केली ।।७।।
भावाचा पत्कारुन विरोध
बहिणीचा पाठिंबा मिळविला
सुखी संसाराची स्वप्ने
पाहतानाच तिच्यावर
दुर्दैवी प्रसंग ओढवला ।।८।।
अरुणा तुझी कशी ही
करुन कहाणी
आवडायची ना तुला
जुनी गाणी ।।९।।
अरुणा कोमातुन बाहेर येईना
रुग्णालयाने तगादा लावला
सहकारणीने संप पुकारला
परिस्थितीस तिच्या
रुग्णालयच जबाबदार धरला ।।१०।।
अरुणाला दयामरण द्यावे
मागणी केली पिंकी विराणीने
फेटाळली ती सर्वोच्च न्यायालयाने
म्हणे घटनेने अधिकार दिला जगण्याचा
नाही मृत्युला कवटाळण्याचा ।।११।।
नातेवाईक,सगे सोयरे यांनी
अरुणाकडे फिरवली पाठ
केईएम परिचारिकांनीच
सांभाळली जबाबदारी ताठ ।।१२।।
गेली कोमात,जगली ती बेचाळीस वर्ष
नाही झाला तिला फायदा
अरुणानेच मिळवुन दिला
भारताला दयामरणाचा
ऐतिहासीक कायदा ।।१३।।
......संगीता भांडवले
मु. अ .प्रा .शाळा शेंडी
ता.वाशी जि.उस्मानाबाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment