Monday, May 23, 2016

सुसंस्कार

***सुसंस्कार*** -------------------------------------------------------- प्रथमत: संस्कार म्हणजे काय ते पाहु... सं--संस्कृतीरक्षक स्--स्वावलंबी का--कार्यकुशल र--रचनात्मक प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलावर चांगले संस्कार झाले पाहिजेत.ते तसा प्रयत्नही करत असतात.बालकांवर योग्य संस्कार करणे हे मातापित्याचे प्रथम कर्तव्य आहे.आई ही बालकाची प्रथम गुरु असते.तिने अगदी गर्भापासुऩच आपल्या बालकांवर उत्तम संस्कार केलेले असतात. प्रत्येक पालकाला वाटते आपल्या मुलावर चांगले संस्कार, योग्य जडणघडण व्हावी. भारताचा एक सुजान नागरिक बनविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. काहींना तर बालपणापासुनच याचे योग्य ज्ञान मिळते.कारण मुलांवर संस्कार हे त्याच्या कुटुंब,समाज,शाळा व परिसर यातुनच होत असतात.म्हणुन प्रत्येकाच्या कुटुंबात योग्य आचारविचारांची माणसे असली तर त्या पिढीतील मुलांवर उत्तमोत्तम संस्कार होतात.पुर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांना घरातील सर्वांच्या वागण्या-बोलण्यातुन आपोआपच संस्कार घडायचे.हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीत आई-बाबा, शाळा,मित्र यावरच संस्काराची शिदोरी अवलंबुन राहिली आहे. संस्कार हेआपोआप होत नसतात ते रुजवावे लागतात.यासाठी कुटुंबाबरोबर परिसर व शाळेचाही या घटकावर परिणाम जाणवतो.हल्ली मित्रांबरोबर,किंवा वाढत्या तंत्रज्ञानामुळे मुलांवर योग्य संस्कार केले तरी ती बिघडण्याची शक्यताच जास्त वाढली आहे. तरीही आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेळोवेळी त्यांना त्यांच्या भविष्याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. आजची ही तरुण पिढी फँशनच्या नावाखाली,पाश्चात्य संस्कृतिचे अनुकरण करत, व्यसनी,व्यभिचारी बनत चालली आहे.भारतीय संस्कृती सोडुन पाश्चात्य संस्कृतीमुळे ही पिढी बरबाद होऊ लागली आहे.प्रत्येक आई-बाबांचा हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. आजच्या राजकारणात तर अशा बिघडलेल्या तरुण पिढीचा वापर सर्रास होताना दिसतो. तरुणाई डिजेच्या तालावर थरकतेय.योग्य वयात म्हणजे बालवयातच बालकांवर उत्तम संस्कार झाले नाहीत तर या अशा घटऩांना सामोरे जावे लागते म्हणुन प्रत्येक जबाबदार पालकांचे एकच कर्तव्य आहे ते म्हणजे आपली पिढी सुशिक्षित बरोबरच सुसंस्कारित केली पाहिजे. ----------------------------------------------------------------------- .......संगीता भांडवले मु अ जि प प्रा शा शेंडी ता वाशी, जि उस्मानाबाद

No comments:

Post a Comment