*माझा वर्ग माझा उपक्रम*
🎂 श्रावणी बाळासाहेब राऊत हिचा अनोखा वाढदिवस साजरा
💐💐💐💐💐💐
*पी. एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवशक्ती नगर, वाशी, जि. धाराशिव* येथे इयत्ता चौथीतील कु.श्रावणी बाळासाहेब राऊत हिचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त श्रावणीने इतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप न करता शाळेसाठी पाण्याचे जार घेण्यासाठी बंद पाकीटातून आर्थिक मदत दिली. तिच्या या उपक्रमातून शाळेप्रती असलेले प्रेम, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणपूरक विचार दिसून आला.
श्रावणीच्या या स्तुत्य उपक्रमाचे मुख्याध्यापिका श्रीमती देवळे अनुराधा,शिक्षकवृंद श्री सुनील गिरवरकर, श्रीमती अंधारे छाया, श्रीमती गवई बबीता, श्रीमती भांडवले संगीता, श्रीमती नंदिनी मेहत्रे आणि सर्व विद्यार्थ्यांनी कौतुक केले. यावेळी तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
✒️शब्दांकन
*श्रीमती भांडवले संगीता*
वर्गशिक्षिका
इयत्ता: चौथी
No comments:
Post a Comment