Saturday, August 1, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी*
💐💐💐💐💐💐
पी एम श्री जि प प्राथमीक शाळा शिवशक्ती नगर वाशी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर  श्रीमती गवई बबीता व श्रीमती भांडवले संगीता यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती सोप्या भाषेत सांगितली. त्यांच्या विचारांमधून विद्यार्थ्यांनी देशप्रेम, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्याचा आनंद घेऊन  कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला व महापुरुषांच्या कार्याचा आदर्श घेण्याचा संकल्प केला.

कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती छाया अंधारे ,श्री सुनील गिरवलकर, श्रीमती नंदिनी म्हेत्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मुख्याध्यापिका श्रीमती देवळे अनुराधा यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
✒️ शब्दांकन ✒️
*श्रीमती संगीता भांडवले*

No comments:

Post a Comment