Monday, August 15, 2016

जि प प्रा शा शेंडी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जि प प्रा शाळा शेंडी ता वाशी जि उस्मानाबाद येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थी व  शिक्षक यांची भाषणे झाली.,सौ.मनिषा  मोरे यांनी शिक्षकांबद्दलचा आदरभाव व्यक्त करत शाळेचे बदललेले स्वरुप ग्रामस्थांसमोर मांडले व माझ्यावर एक सुंदर कविता तयार करुन कविता वाचन केले.मी भारावुन गेले आणि गावक-यांकडुन मिळालेली माझ्या कामाची पावती समजुन मी ऋण व्यक्त करत मनातल्या मनात खुप मोठा पुरस्कार मिळाल्यागत आनंदी झाले.विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी व इंग्रजीतुन भाषणे केली व  उपस्थितांनी असे आश्वासन दिले की,इथुन पुढे एकही मुल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आम्ही पाठवणार नाहीत.यावर्षी तीन मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील माझ्या शाळेत प्रवेशित झाली आहेत.लहान गावात हा खुप मोठा बदल पाहुन गांवकरी  नेहमी आमच्या हाकेला ओ!म्हणत मदत करण्यास तत्पर असतात.
  विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप ,लेखन साहित्याचे वाटप व बक्षिसे देऊन अनेक दानशुर व्यक्तींनी सहभाग नोंदवला.त्यांचे शाळेच्या वतीने मनस्वी आभार.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
               संगीता भांडवले
             मु अ जि प प्रा शाळा शेंडी
             ता वाशी जि उस्मानाबाद
             myshikshankatta.blogspot.com

Sunday, August 14, 2016

महिलांचे स्वातंत्र्य अन् स्वातंत्र्याची ७०वर्षे

🔴   *महिलांचे स्वातंत्र्य* 🔴
अन्..............
       🔵 *स्वातंत्र्याची ७०वर्षे*🔵
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
   संगीता भांडवले,वाशी जि उस्मानाबाद
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

      स्वातंत्र्य मिळुन६९ वर्षे झाली.तरी आजची स्त्री ही म्हणावी तेवढी स्वतंत्र आहे का? याचा शोध घेण्याची वेळ माझ्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रिला आली याची खंत वाटतेय.इंग्रजांच्या पारतंत्र्यातुन,गुलामगिरीतुन आपला देश स्वतंत्र झाला खरा पण आपल्याच घरात कोणत्याही निर्णयाचे स्वातंत्र्य नसलेल्या ,पुरुषांची गुलामगिरी सहन करणा-या आज कितीतरी स्त्रिया सापडतील.मग ख-या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत का??
          आज मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक स्त्रिया या स्वत:च्या पायावर उभा असुन नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्या आहेत.कमावत्या आहेत पण त्यांना त्यांचाच पैसा मनासारखा खर्च करण्याचे स्वातंत्र्य नाही. घरातील कर्ता पुरुष किंवा नवरा यांना विचारुनच पैसे खर्च करावे लागतात. मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?हा प्रश्न पडतो.घरात कुठलेही धार्मिक कार्य असो की अजुन काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली तर स्त्रिला सामावुन घेतले जात नाही.तिची मते विचारात घेतली जात नाहीत.समाजात मानाचे स्थान येताच तिच्या हिंडण्याफिरण्याचे स्वातंत्र्य हिरावुन घेतले जाते.कित्येक ठिकाणी तर फक्त निवडणुकीत आरक्षित पद आहे म्हणुन स्त्रियांना निवडणुक लढवु दिली जाते.पण प्रत्यक्ष कारभार मात्र त्यांचे पतीच पाहतात.मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
        मुलांचे शिक्षण असो की लग्न,घर खरेदी असो की अजुन काही. जेंव्हाजेंव्हा कुटुंबातील काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येते तेंव्हा मात्र घरातील कर्ता पुरुष किंवा नवरा यांचा निर्णय अंतीम समजला जातो.स्त्रिच्या निर्णयाला काहीच महत्व नसते.मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
        काही कुटुंबात मात्र या उलट परिस्थिती असते.स्त्रिचा आदर केला जातो.तिची ही मते विचारात घेतली जातात.प्रत्येक निर्णयात तिला सामावुन घेतले जाते. ती कुटुंबे  खरच आज प्रगत झालेली कुटुंबे आहेत असे म्हणले तर वावगे होणार नाही.
         परंतु एवढेच मर्यादीत स्वातंत्र्य स्त्रिला पुरेसे नाही.तिचे पंख छाटु नका.तिच्या आनंदाची चावी तुमच्या हाती ठेवु नका.तिला प्रत्येक निर्णय प्रक्रियेत पुरेसे स्वातंत्र्य द्या.बघा त्या कुटुंबाची कशी भरभराट झालेली दिसेल.....पण...पण एवढेच स्वातंत्र्य पुरेसे नाही अजुन बराच पल्ला गाठायचाय.दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचे २०२०साली देश महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करायचेय.मग द्या ना स्त्रिला ही सन्मान,निर्णय प्रक्रियेत मान,मग आपला देश ख-या अर्थाने बनेल महान!

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
             ✍🏻संगीता भांडवले✍🏻
                 वाशी जि उस्मानाबाद
                  myshikshankatta. blogspot.com

Saturday, August 13, 2016

माझी शाळा-माझा उपक्रम

🏆 *माझी शाळा-माझा उपक्रम*🏆
        ••••••••••••••••••••••••••••

✅ *जि. प. प्रा.शाळा शेंडी ता. वाशी जि. उस्मानाबाद*✅

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

*उपक्रमाचे नांव*::

🎾 *कुंडीतील बाग/फिरती बाग*🎾
       ~~~~~~~~~~~~~~~~
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

🌹 *हेतु*🌹

🌺 *विविध फुलझाडांची ओळख होणे.*

🌿 *विविध पानांच्या आकाराची ओळख होणे.*

🎋 *परिसरातील औषधी वनस्पतींची ओळख होणे.*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🔻 *साहित्य*:🔻

🌀 *कुंडी*

🌐 *काळी माती.*

🎋 *विविध फुलझाडांची कलमे/रोपे.*

🌵 *विविध शोभेच्या झाडांची कलमे/रोपे*

🌿 *परिसरातील उपलब्ध औषधी वनस्पतींची रोपे.*

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

✅  *कृती:*  ✅

🌷 *प्रथम: कुंड्यामध्ये काळी माती भरुन घ्यावी.*

🌷 *विविध फुलझाडांची लागवड करावी.*

🌷  *विविध शोभेच्या झाडांची लागवड करावी.*

🌷 *परिसरात उपलब्ध होणा-या औषधी वनस्पतींची लागवड करणे.उदा.तुळस,कोरफड,दुर्वा,अडुळसा इ.रोपांची लागवड करणे.*

🌷 *अशा रितीने ह्या उपक्रमातुन विद्यार्थ्यांना विविध औषधी वनस्पतींची ओळख, विविध पानांचे आकार,व 'वृक्ष लागवड व संवर्धन'यांचे ज्ञान मिळते.*

🌷 *झाडांना पाणी घालणे,कुंडीतील रोपांची निगा राखणे,या मुळे विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेत वाढ होते.*

🌷 *विद्यार्थी या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात*.

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
                 ✍🏻 *संगीता भांडवले*✍🏻
                       *मु अ जि प प्रा शा शेंडी*
                         *ता.वाशी जि.उस्मानाबाद*
                      http//myshikshankatta.blogspot.com
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

*आपणास हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा*
     *हे  व अशेच शालेय उपक्रम,बालकविता,वैचारीक लेख व चारोळी लेखनासाठी  माझ्या ब्लॉगला भेट द्या.वाचा व प्रतिक्रिया नोंदवा.आपल्या सुचनांचे स्वागत केले जाईल.*
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
      myshikshankatta.blogspot.com

Wednesday, August 10, 2016

SKILL DAY मेहंदीरेखाटन

🇮🇳 *SKILL DAY* 🇮🇳
----------------------------------------------------------
🌹 *नागपंचमीनिमित्त* *मेहंदीरेखाटन*🌹
-----------------------------------------------------------
🔻* *जि * प *प्रा* *शा *  * शेंडी * * ता * *वाशी * जि* * * * *उस्मानाबाद*🔻
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

        आज दि.६/८/२०१६ रोजी नागपंचमीनिमित्त मेहंदीरेखाटन घेण्यात आले व आगळावेगळा असा हा प्रासंगिक 'कौशल्य दिन'साजरा करण्यात आला.या रेखाटन कलेचे प्रात्यक्षिक सौ.मनिषा सतिश मोरे(प्रेरक),सौ.इंदु भायगुडे(स्वयंपाकी),कु तृप्ती गुंजाळ(युवती),संगीता भांडवले(मु .अ.)यांनी केले.विद्यार्थिनींच्या चेह-यावरील आनंद पाहुन खुप समाधान वाटले.कु सान्वी वरकड या इ.४थी तील विद्यार्थीनिने सर्व मुलीं व मुलांना नेलपेंट लावले.सर्व विद्यार्थी आज आनंदी.विद्यार्थ्यांना नागपंचमीनिमित्त नागाचे पुजन व त्याचे कारण  याची सविस्तर माहिती संगीता भांडवले यांनी सांगीतली.असे हे आजचे मेहंदीरेखाटनाचे कौशल्य मुलींना भावी आयुष्यात नक्कीच उपयोगी पडणार!
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
                ✍🏻संगीता भांडवले✍🏻
                      मु अ प्रा शा शेंडी
                    ता वाशी जि उस्मानाबाद

मेहंदी रेखाटन

महिलांचे स्वातंत्र्य

💃 *महिलांचे स्वातंत्र्य* 💃�
--------------------------------------------------------------------
स्वातंत्र्य मिळुन६९ वर्षे झाली.तरी आजची स्त्री ही म्हणावी तेवढी स्वतंत्र आहे का? याचा शोध घेण्याची वेळ माझ्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रिला आली याची खंत वाटतेय.इंग्रजांच्या पारतंत्र्यातुन,गुलामगिरीतुन आपला देश स्वतंत्र झाला खरा पण आपल्याच घरात कोणत्याही निर्णयाचे स्वातंत्र्य नसलेल्या ,पुरुषांची गुलामगिरी सहन करणा-या आज कितीतरी स्त्रिया सापडतील.मग ख-या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत का??
          आज मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक स्त्रिया या स्वत:च्या पायावर उभा असुन नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्या आहेत.कमावत्या आहेत पण त्यांना त्यांचाच पैसा मनासारखा खर्च करण्याचे स्वातंत्र्य नाही. घरातील कर्ता पुरुष किंवा नवरा यांना विचारुनच पैसे खर्च करावे लागतात. मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?हा प्रश्न पडतो.घरात कुठलेही धार्मिक कार्य असो की अजुन काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली तर स्त्रिला सामावुन घेतले जात नाही.तिची मते विचारात घेतली जात नाहीत.समाजात मानाचे स्थान येताच तिच्या हिंडण्याफिरण्याचे स्वातंत्र्य हिरावुन घेतले जाते.कित्येक ठिकाणी तर फक्त निवडणुकीत आरक्षित पद आहे म्हणुन स्त्रियांना निवडणुक लढवु दिली जाते.पण प्रत्यक्ष कारभार मात्र त्यांचे पतीच पाहतात.मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
        मुलांचे शिक्षण असो की लग्न,घर खरेदी असो की अजुन काही. जेंव्हाजेंव्हा कुटुंबातील काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येते तेंव्हा मात्र घरातील कर्ता पुरुष किंवा नवरा यांचा निर्णय अंतीम समजला जातो.स्त्रिच्या निर्णयाला काहीच महत्व नसते.मग याला स्वातंत्र्य म्हणायचे का?
        काही कुटुंबात मात्र या उलट परिस्थिती असते.स्त्रिचा आदर केला जातो.तिची ही मते विचारात घेतली जातात.प्रत्येक निर्णयात तिला सामावुन घेतले जाते. ती कुटुंबे  खरच आज प्रगत झालेली कुटुंबे आहेत असे म्हणले तर वावगे होणार नाही.
         परंतु एवढेच मर्यादीत स्वातंत्र्य स्त्रिला पुरेसे नाही.तिचे पंख छाटु नका.तिच्या आनंदाची चावी तुमच्या हाती ठेवु नका.तिला प्रत्येक निर्णय प्रक्रियेत पुरेसे स्वातंत्र्य द्या.बघा त्या कुटुंबाची कशी भरभराट झालेली दिसेल.....पण...पण एवढेच स्वातंत्र्य पुरेसे नाही अजुन बराच पल्ला गाठायचाय.दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांचे २०२०साली देश महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करायचेय.मग द्या ना स्त्रिला ही सन्मान,निर्णय प्रक्रियेत मान,मग आपला देश ख-या अर्थाने बनेल महान!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
             ✍🏻संगीता भांडवले✍🏻
                 वाशी जि उस्मानाबाद

माझी शाळा-माझा उपक्रम

🔵  *माझी शाळा -माझा उपक्रम*🔵
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडी ता. वाशी. जि. उस्मानाबाद*

🌹 _*दे टाळी* 🌹
     ~~~~~~~~~~

☘ _*हेतू*_ ☘

☘महिन्यांची नांवे क्रमाने म्हणता येणे.
☘चालु महिन्याचे नांव सांगता येणे.
☘ _*साहित्य*_ - साहित्याची आवश्यकता नाही.
🔻_*कृती*_ 🔻
☘प्रथम विद्यार्थ्यांचा वर्गातच बसून एक गोल करावा .
☘बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला आपले दोन्ही हात मांडीवर तळहात वर करून ठेवाण्यास सांगावे. .
☘प्रत्येक विद्यार्थ्याच्या डाव्या हाताच्या तळहातावर शेजारील विद्यार्थ्याचा उजवा तळहात वर करून ठेवावा . .
☘कोणत्याही एका विद्यार्थ्यांपासून इंग्रजी महिने बारा-जानेवारी म्हणत सुरूवात करून त्या विद्यार्थ्यांने डाव्या बाजूच्या विद्यार्थ्याच्या उजव्या तळहातावर टाळी द्यायची .
☘दुसर्या विद्यार्थ्यांने फेब्रुवारी म्हणत तिसऱ्याच्या तळहातावर टाळी द्यावी .तिसऱ्याने चौथ्या च्या ,चौथ्या ने पाचव्या च्या हातावर टाळी देत महिन्यांची नांवे म्हणावीत.
☘अशा रितीने हसत खेळत जानेवारी ते डिसेंबर महिन्याची नांवे विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतील.
☘विद्यार्थ्यांना हा उपक्रम खेळताना खूप मज्जा येते.विद्यार्थी आनंदाने उपक्रमात सहभागी होतो .
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎾🎾🎾 *पुरक*  *उपक्रम*🎾🎾🎾
१.मराठी महिन्यांची नांवे.
२.आठवड्यांच्या वारांची नांवे.
३.Days of week.
४.1 ते 100 अंक क्रमाने वाचन.
५.रंगांची नांवे .
६.टप्प्याने येणा-या संख्या.(२चा,५चा,१०चा टप्पा इ.)
७.सम संख्या.
८.विषम संख्या.
( *त्या त्या* *इयत्तेच्या काठिण्य पातळीनुसार* )
√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√√
      *इत्यादी*..........
*पुरक उपक्रम शिक्षकांच्या कल्पकतेनुसार घेता येतील*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✍🏻 *संगीता* *भांडवले*✍🏻
*मु* *अ* *जि* *प* *प्रा* *शाळा* *शेंडी*
  *ता* *वाशी* *जि* *उस्मानाबाद*
   myshikshankatta.blogspot.com
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
*आपणांस हा उपक्रम कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा*
    या व अशाच काही उपक्रमाला ,बालकविता व चारोळी लेखन यासाठी माझ्या ब्लॉगला एक वेळ आवश्य भेट द्या व प्रतिक्रिया नोंदवा,सुचनांचे स्वागत केले जाईल.👏🏼
http://myshikshankatta.blogspot.com