Thursday, March 2, 2017

कविता \\आठवणीतील साडी//

कविता
  *आठवणीतील साडी*

तु घेतलेली,
पिवळ्या रंगाची
नक्षीदार वेलबुट्टीची
सोनेरी काठाची
आठवणीतील साडी

जरी झाली ती जीर्ण
लावीन आठवणींचे ठिगळ
तुझी आठवण जपण्यासाठी
करील ऊबदार वाकळ

त्या वाकळीतुन मिळेल
ऊब तुझ्या स्पर्शाची
तुझी आठवण मात्र
बोलेन माझ्या कानाशी

जरी झाली तिची लक्तरे
करील मी पायपुसणे
पाय त्यावर ठेवताच
आठवतील दुभंगलेली मने

जरी झाल्या तिच्या चिंध्या
दुपटे करील नातवाला
तुझ्या हळुवार स्पर्शाची
जाणीव होईल त्याला

संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद

Monday, February 27, 2017

माझी शाळा-माझा उपक्रम 'सेल्फी विथ मॅथ्स स्टुडंट'

🏵माझी शाळा-माझा उपक्रम🏵
जि.प.प्राथमिक शाळा शेंडी ता.वाशी
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*गणित समृद्धीकरण*(इ.१ली/२री)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
  गणित समृद्धीकरण साहित्य संचामधील प्रत्येक साहित्याच्या माध्यमातुन मुले आनंदाने शिकताना,ज्ञानाच्या निर्मितीचा आनंद घेताना.खरंच विद्यार्थ्याच्या मनातील गणिताची भिती दुर होवुन गणित विषयाची गोडी वाढेल,.......

*विद्यार्थी गटात कृती करताना..
*विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी...
*विद्यार्थ्यांकडुन विविध आकार निर्मिती...
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
संगीता भांडवले
जि प प्रा शाळा शेंडी
myshikshankatta.blogspot.com

कविता 'तो'चेहरा

कविता
।। 'तो' चेहरा ।।

साथ नाही तरी
आठवण येते तुझी
'तो'चेहरा आठवताच
घालमेल होते माझी

तुझा सहवास
साठवला डोळ्यात
'तो'चेहरा अजुनही
माझ्या ह्रदयात

तुझ्या आठवणीने
मन होते वेडेपिसे
तुझा 'तो'चेहरा
अजुनही स्वप्नी दिसे

तुझ्या आठवणीने
केला काळजात वार
तुझा 'तो'चेहरा
अजुनही डोळ्यासमोर

तुझ्या आठवणीचा
चंद्र हासतो नभी
तुझ्या 'त्या' चेह-याला
नजर लागु नये कधी

तुझी आठवण येताच
नयन माझे पाणावते
तुझा'तो'चेहरा
अजुनही मनातच स्मरते

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
९९२३४४५३०६
myshikshankatta.blogspot.com

Thursday, February 16, 2017

प्रकल्प म्हणजे काय?,प्रकल्प लेखन कसे करावे? व शालेय प्रकल्पाची यादी

प्रकल्प म्हणजे काय ?

विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

प्रकल्पाची उद्दिष्टे
1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.
प्रकल्पकार्य लेखन कसे कराल? प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे –

( विद्यार्थ्यांसाठी )
1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.

2. प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.

3. प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.

4. प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.

5. प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.

6. प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.

7. प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.

8. आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
( शिक्षकांसाठी )

9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा
.
10. मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा.
तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.

शालेय प्रकल्पांसाठी यादी ::

1. माहिती संकलन –
थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, थोर समाजसेविका इत्यादी.

2. संग्रह –
म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह, शंख-शिंपले संग्रह, तिकिटे संग्रह, जुनी नाणी संग्रह इत्यादी.

3. प्रदर्शन –
चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञानप्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.

4. तक्ते
शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.5. आदर्श
आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव, आदर्श शहर, आदर्श राष्ट्र इत्यादी.

संकलन:
संगीता भांडवले(मु अ)
जि प प्र शाळा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद
myshikshankatta.blogspot.com

Thursday, January 5, 2017

नव वर्षाचे नव संकल्प

       *नव वर्षाचे नव संकल्प*

नवे दिवस,नवी प्रेरणा,नवे स्वप्न आणि नवी कल्पना घेऊन नवीन वर्ष येत असते.आनंदी वातावरणात नव वर्षाची सुरुवात झाली तर आपण ध्येयाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहचु शकतो.इंग्रजी कँलेंडरप्रमाणे १ जानेवारीपासुन आपण नवीन वर्षात पदार्पण करत आहोत.नवीन वर्षात नवीन संकल्प करायचे आहेत.३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आपण जुन्या वर्षास निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत जोमाने,जल्लोषात करणार आहोत.काही कडु-गोड आठवणी विसरुन नव वर्षाचे स्वागत, नवीन वर्षात काहीतरी संकल्प करायचे आपण ठरवले असणार!मग तो संकल्प कोणताही असो,उदा.वजन वाढविणे,वजन कमी करणे,व्यसनमुक्त होणे,सद् सद् विवेक बुद्धीने वागणे किंवा पाहिलेली स्वप्ने पुर्ण करण्याचा संकल्प.असे संकल्प आपण दरवर्षी करत असतो पण त्यातील किती पुर्णत्वास जातात हा संशोधनाचा विषय आहे.हे संकल्प पुर्ण करायचे आपल्या मनाने ठरविले तर ते साध्यही होतात पण यासाठी वेळेचे उत्तम नियोजन व ते पुर्णत्वास नेण्याची जिद्द आपणात असावी लागे.'मी हे करु शकतो' असा वि्श्वास आपणाकडे असला पाहिजे.आपण केलेला संकल्प आपल्या मित्रास किंवा कुटुंबियांना माहीत असला पाहिजे. त्यामुळे तो पुर्णत्वास नेताना यांची मोलाची मदत होऊ शकते.सध्याचे युग हे धावपळीचे युग आहे.या विज्ञान युगामध्ये ,तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन,विशेषत:,वॉट्सअॅप व फेसबुक,ट्विटर इ.सोशल मिडीयाच्या अति वापराने माणुस सर्वच नाती विसरत चालला आहे.त्यामुळे असा एखादा संकल्प आपण  केला पाहिजे की,काही ठराविक दिवसानंतर किंवा सुख दु:खात मी यांच्या सोबत राहु शकेन.परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन केले तर यश हमखास मिळेल.महिला व मुलींनी आपले आरोग्य जपतच कुटुंबाचेही आरोग्य जपण जरुरीचे असते.महिलांनी दिवसभरातील १०-१५मिनिटे वेळ स्वत:साठी राखुन ठेवला पाहिजे. याच १०-१५ मिनिटांत आपण एखादा छंद जोपासु शकता किंवा व्यायाम करुन फिट राहु शकता.सर्व चांगल्या कामाचा शत्रु म्हणजे 'आळस'.तो झटकुन आपण सर्व कामे जबाबदारीने पार पाडली पाहिजेत.नियोजन व शिस्तीमुळे सर्व कार्ये पुर्णत्वास जातात.असे नव वर्षाचे नव संकल्प करुन आपण ते पुर्णत्वास नेऊ या!!!
        *माझ्या नजरेत २०१६हे वर्ष*:
काही ठळक बाबींचा आढावा.....
   * या वर्षी वरुन राजाने चांगली कृपा केली.मागील सात आठ वर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाले.
   *उरीच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले.
   *नागराज मंजुळे निर्मित 'सैराट' या मराठी चित्रपटास सैराट म्हणजे १०८ कोटींचा नफा झाला.देश पातळीवर विविध पुरस्कार मिळविणारा चित्रपट ठरला.या चित्रपटातील सर्वच गाणी सैराट गाजली.
   *चायना ओपन बँडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधुने यश मिळविले.
  *हॉकी ज्युनिअर वल्ड कप भारताने जिंकला.
*आरक्षण,अॅट्रासिटी कायदा दुरुस्ती आणि कोपर्डी घटनेत न्याय मिळावा यासाठीचे शिस्तबद्ध मराठा क्रांती मुक मोर्चाने २०१६ हे वर्ष गाजले.
  *८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता ५००/१००० च्या नोटाबंदीचा ऐतिहासीक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला.
*ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे पुण्यात निधन झाले.
*ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे वयाच्या ७८व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
  *तामिळनाडुच्या मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतात 'आम्मा 'या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या जयललिता यांचे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात निधन झाले.
  *नविन वर्षाच्या आगमनाप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि.२४ डिसेंबर २०१६ ला अरबी समुद्रात  शिवस्मारकाचे भुमीपुजन मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.
       'सोळावं  वरिस धोक्याचं' असं म्हणतंच २०१६ हे साल सरले.खुप तणावग्रस्त व धावपळीत गेलं हे साल.कौटुंबिक प्रगतीबरोबरच या वर्षात कार्यालयीन प्रगतीही झाली.माझी शाळा-उपक्रमशील शाळा वरुन ,माझी शाळा-प्रगत शाळा होऊन नावारुपास आली.याचे सर्व श्रेय माझे विद्यार्थी,पालक,सहकारी शिक्षक,अधिकारी यांना जाते.
   एकंदरीत या २०१६ सालात मी मनोमन खुश आहे. निसटलेत काही क्षण हातातुन पण त्याचा बाऊ न करता मिळालेल्या संधीचे सोने केले यातच खुप समाधानी आहे.Welcome 2017 & Good bye 2016 म्हणत येणा-या नवीन वर्षाच्या स्वागतास मी  खंबीरमनाने तयार आहे. येणा-या नवीन वर्षात माझ्या हितचिंतकाची,मित्रपरिवार व नातेवाइकांची सर्व मनोरथ पुर्ण होवो!हाती घेतलेल्या कामात सुयश येवो!अशी मनोकामना!!

संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
९९२३४४५३०६

    

बालकविता, रानफुल

।बालकविता।   *रानफुल*

हिरव्यागार शिवारात
गर्द झाडांची दाटी
ठरलेल्या असतात
इथेच रोज गाठीभेटी

अवखळ निरागस
उनाड ते बालपण
आठवांच्या शिदोरीचे
विसरत नाहीत क्षण

कधी सुरपारंब्या
कधी माकड उड्या
बालपणीच करता येतात
अवखळपणाच्या खोड्या

बालपणी काय कळावी
जगण्याची रितभात
स्वप्न मात्र पाहतो
काय व्हावे आयुष्यात

आनंदी आनंद वाटे
फांदीवर झुलताना
हर्षित ही रानपाखरे
स्वच्छंद बागडताना

संगीता भांडवले
वाशी ,उस्मानाबाद
९९२३४४५३०६

कविता, शौचालय

कविता

🌹शौचालय🌹

अबब!किती मोठा
हा बांधला बंगला
पती-पत्नीच्या,वाटे
स्वप्नांचाच ईमला

महागडे फर्ऩिचर
जसे वाटे प्रसादालय
'बडा घर पोकळ वासा'
त्यात नाही शौचालय

गावात प्रवेशताच
स्वागत होते भाऱी
घरात नाही संडास
याचे दर्शन घडते दारी

आयाबाया,पोरंटोरं
उघड्यावर जाती शौचास
रोगाला आमंत्रण द्यायला
डासांची करतात पैदास

मलेरिया,चिकणगुनिया होतो
डास चावताच माणसाला
शौचालय बांधुन घरोघरी
पळवा त्या रोगराईला

लेकीसुनाचा तरी
विचार करा निदान
शौचालय बांधायला
सरकार देतयं अनुदान

घेवुन लाभ योजनेचा
घरोघरी बांधा शौचालय
निरोगी  भावी पिढीसाठी
वाटावे बांधले मी देवालय

संगीता भांडवले
वाशी उस्मानाबाद
९९२३४४५३०६
myshikshankatta.blogspot.com