Sunday, March 3, 2019

साहित्यिकांची टोपण नांवे

🔸! साहित्यिकांची टोपणनावे !🔸

🌀टोपणनाव----------------लेखक🌀

अनंत फंदी-------शाहीर अनंत घोलप
अनंततनय-------दत्तात्रय अनंत आपटे
अनिरुध्द पुनर्वसू-------नारायण गजानन आठवले
अनिल-------आत्माराम रावजी देशपांडे
अमरशेख-------मेहबूब पठाण
अज्ञातवासी-------दिनकर गंगाधर केळकर
आनंद-------वि.ल.बर्वे
आरती प्रभु-------चिंतामण त्र्यंबक खानोलकर
काव्यविहारी-------धोंडो वासुदेव गद्रे
कुंजविहारी-------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
कुमुद-------स.अ.शुक्ल
कुसुमाग्रज-------वि.वा.शिरवाडकर
कृष्णकुमार-------सेतू माधव पगडी
केशवकुमार-------प्र.के. अत्रे
करिश्मा-------न.रा.फाटक
केशवसुत-------कृष्णाजी केशव दामले
गदिमा-------ग.दि.माडगुळकर
गिरीश-------शंकर केशव कानेटकर
ग्रेस-------माणिक शंकर गोडघाटे
गोल्या घुबड-------विष्णुशास्त्री चिपळूणकर
गोविंद-------गोविंद त्र्यंबक दरेकर
गोविंदाग्रज-------राम गणेश गडकरी
चंद्रिका /चंद्रशेखर-------शिवराम महादेव गो-हे
चारुता सागर-------दिनकर दत्तात्रय भोसले
छोटा गंधर्व-------सौदागर नागनाथ गोरे
बालगंधर्व-------नारायणराव राजहंस
जीवन-------संजीवनी मराठे
ठणठणपाल/अलाणे-फलाणे-------जयवंत दळवी
तुकडोजी महाराज-------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट
संत तुकाराम-------तुकाराम बोल्होबा अंबिले
तुकाराम शेंगदाणे-------ज्ञानेश्वर नाडकर्णी
दत्त (कवी)-------दत्तत्रय कोंडदेव घाटे
द्या पवार (कवी)-------दगडू मारुती पवार
जागल्या (कथालेखक)-------दगडू मारुती पवार
दक्षकर्ण-------अशोक रानडे
दादुमिया-------दा.वि.नेने
दासोपंत-------दासोपंत दिगंबर देशपांडे
दिवाकर-------शंकर काशिनाथ गर्गे
दिवाकर कृष्ण-------दिवाकर कृष्ण केळकर
धनुर्धारी-------रा.वि.टिकेकर
धुंडिराज-------मो.ग.रांगणेकर
नागेश-------नागेश गणेश नवरे
नाथमाधव-------व्दारकानाथ माधवराव पितके
निशिगंध-------रा.श्री.जोग
नृसिंहाग्रज-------ल.गो.जोशी
पद्मा-------पद्मा विष्णू गोळे
पराशंर-------लक्ष्मणराव सरदेसाई
पी.सावळाराम-------निवृत्ती रावजी पाटील
पुष्पदंत-------प्र.न.जोशी
प्रफुल्लदत्त-------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर
प्रभाकर (शाहीर)-------प्रभाकर जनार्दन दातार
फडकरी-------पुरूषोत्तम धाक्रस
फरिश्ता-------न. रा. फाटक
बाकीबा-------बाळकृष्ण भगवंत बोरकर
बाबा कदम-------वीरसेन आनंद कदम
बाबुराव अर्नाळकर-------चंद्रकांत सखाराम चव्हाण
बाबुलनाथ-------वि.शा.काळे
बालकवी-------त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळकराम (विनोदासाठी)-------राम गणेश गडकरी
बी-------नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ-------भगवान रघुनाथ कुलकर्णी
बंधुमाधव-------बंधु माधव मोडक (कांबळे)
भटक्या-------प्रमोद नवलकर
भाऊ पाध्ये-------प्रभाकर नारायण पाध्ये
भानुदास-------कृष्णाजी विनायक पोटे
भानुदास रोहेकर-------लीला भागवत
भालचंद्र नेमाडे-------भागवत वना नेमाडे
मकरंद-------बा.सी.मर्ढेकर
मंगलमूर्ती-------मो.ग.रांगणेकर
मनमोहन-------गोपाळ नरहर नातू
लोककवी श्री मनमोहन-------मीनाक्षी दादरकर
माधव ज्युलियन-------माधव त्र्यंबक पटवर्धन
माधवानुज-------डॉ. काशिनाथ हरि मोडक
मामा वरेरकर-------भार्गव विट्ठल वरेरकर
मधू दारूवाला-------म.पा.भावे
मिलिंद माधव-------कॅ. मा कृ. शिंदे
मुक्ताबाई (संत)-------मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी
मोरोपंत-------मोरेश्वर रामचंद्र पराडकर
मंडणमित्र-------द.पा.खंबिरे
यशवंत-------यशवंत दिनकर पेंढारकर
यशवंत दत्त-------यशवंत दत्ताजी महाडिक
रघुनाथ पंडित-------रघुनाथ चंदावरकर
रमाकांत नागावकर(गंधर्व)-------बळवंत जनार्दन करंदीकर
रसगंगाधर-------गंगाधर कुलकर्णी
राजा ठकार-------नारायण गजानन आठवले
राजा मंगळवेढेकर-------वसंत नारायण मंगळवेढेकर
राधारमण-------कृष्ण पांडुरंग लिमये
रा. म. शास्त्री-------वि.ग कानिटकर
रूप-------प्रल्हाद वडेर
रे. टिळक-------नारायण वामन टिळक
लता जिंतूरकर-------लक्ष्मीकांत तांबोळी
लक्ष्मीनंदन-------देवदत्त टिळक
लोकहितवादी-------गोपाळ हरि देशमुख
वनमाळी-------वा.गो.मायदेव
वसंत बापट-------विश्वनाथ वामन बापट
वसंत सबनीस-------रघुनाथ दामोदर सबनीस
वामन पंडित-------वामन नरहर शेखे
विजय मराठे-------ना.वि.काकतकर
विंदा करंदीकर-------गोविंद विनायक करंदीकर
विनायक-------विनायक जनार्दन करंदीकर
विनोबा-------विनायक नरहर भावे
विभावरी शिरुरकर-------मालतीबाई विश्राम बेडेकर
विष्णुदास-------नरहर सदाशिव जोशी
वशा-------वसंत हजरनीस
विष्णुबुवा ब्रम्हचारी-------विष्णु भिकाजी गोखले.

संकलन
संगीता भांडवले

Saturday, March 2, 2019

कविता ।।समजून घे ना मला।।

विषय: समजुन घे ना

समजुन घे ना मला....
मी रागावल्यावर
जगु या आनंदाने
दिल्या घेतल्या वचनावर

समजुन घे ना मला.....
ठेव माझ्यावर विश्वास
अजुनही तुच प्रिया
माझ्या जगण्याचा श्वास

समजुन घे ना मला.....
जशा जपल्या भावना
मैत्रीचा करुन त्याग
रोखलेस ह्रदय स्पंदना

समजुन घे ना मला......
माझ्या श्वासाची झाली कोंडी
येना तु  कधीही समोर अचानक
सर्व कामालाही मारेल दांडी

समजुन घे ना मला.....
माझ्या ओठांवरील शब्दांना
चेह-याच्या  रंगाला अन्
नजरेत लपवलेल्या थेंबाला

समजुन घे ना मला....
माझ्या निरागस हास्याला
तुझ्या इच्छेप्रमाणे तुला
मुक्त करतेय स्वच्छंदी जगण्याला

🖋संगीता भांडवले🖋
वाशी, उस्मानाबाद
©®

Monday, February 11, 2019

रेशीम प्रकल्पास क्षेत्रभेट

My school -My Activity-2018-19
🌷*रेशीम प्रकल्पास क्षेत्र भेट*🌷
(वनभोजन ट्रिप, निसर्ग 🌿🍃,शाळा🏫, दप्तराविना 🎒शाळा)
जि प प्रा शाळा कवडेवाडी व ता वाशी जि उस्मानाबाद
दि. ११/०२/२०१९

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आज रोजी श्री संघपाल सुकाळे व बाळासाहेब सुकाळे यांच्या शेतात 'रेशीम प्रकल्पास क्षेत्र भेट'दिली.श्री व सौ सुकाळे यांनी विद्यार्थ्यांचे शाब्दिक सुमनाने स्वागत केले. श्री सुकाळे सर यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी लक्ष पुर्वक माहिती ऐकली. काही प्रश्न विचारले. तुतीची झाडे व  लागवड, अळी च्याअवस्था, कोश कसा तयार होतो याची जिज्ञासू पणे माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपडत होता. अळी ला हात लावत होता. काहींनी तर कोश हातात घेऊन पाहिले. या  सर्व प्रात्यक्षिकानंतर मुलांना जाम भुक लागली होती. येताना सुकाळे सर यांनी जिलेबी व फरसाण अल्पोपहारासाठी आणले होते. मुलांनी यावर यथेच्छ ताव मारला. श्री व सौ आशा दशरथ काळे ही आमच्या मदतीला होतीच. थोडे झाडांच्या सावलीत विश्रांती घेऊन, गाणी गोष्टी करत आमचा मोर्चा श्री निशिकांत विधाते यांच्या शेतात वळला. जवळ च यांचे घर. दोन दिवसापुर्वी आम्ही तुमच्याकडे वन भोजनासाठी येणार आहोत, डबे आम्ही आणतोय तुम्ही फक्त पिण्याच्या पाण्याची सोय करा. एवढाच निरोप आम्ही दिला. पण यांनी ही आमच्या चिमुकल्या साठी पिण्याचे स्वच्छ पाणी, पोहे व गुलाब जामुन असा बेत केला. मुलांचे डबे, शा. पो. आहार व मुख्याध्यापक श्रीमती भांडवले संगीता यांनी ही जिलेबी आणलेली. मुलांच्या आनंदाला उधाण आले होते. झाडांच्या सावलीत कविता, गाणी ,खेळ असे विविध प्रकारचे उपक्रम घेऊन आज.. वनभोजन, निसर्ग शाळा, दप्तराविना शाळा असे विविध उपक्रम राबवल्याचे समाधान वाटले. या सर्व कामी श्रीमती सूर्यवंशी मॅडम(सहसिक्षिका),सौ शालनताई(स्वयंपाकी), सौ विधाते ताई व त्यांचा परिवार, सौ सुंदरबाई विधाते(आशा) यांचे मोलाचे योगदान लाभले.

शब्दांकन
श्रीमती संगीता भांडवले
मुख्याध्यापिका
जि प प्रा शाळा कवडेवाडी व
ता वाशी जि उस्मानाबाद

Sunday, October 7, 2018

चारोळी

आठवणीत द्यावी
अश्रुना मोकळी वाट
डोळ्यात जपावा
दिलेल्या शब्दांचा पाट

🖊संगीता भांडवले🖊
     वाशी,उस्मानाबाद
        ©

Tuesday, May 22, 2018

।।प्रभातपुष्प।।5

।।प्रभातपुष्प।।5
सूंदर दिवसाची सूंदर सुरुवात
दिनकरा तुझ्या आगमनाने
सप्तरंगी नवकिरणात न्हाती
प्रभाती सर्व  सृष्टी उत्साहाने

✍🏻संगीता भांडवले
©वाशी,उस्मानाबाद
दि.23-5-2018

Saturday, May 19, 2018

प्रभातपुष्प-2

।।प्रभातपुष्प।।-2
सकाळचा मंद वारा
धुंदित वाहतो
मोगऱ्याचा सुगंध
चहुदिशास पसरतो

©संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
20-5-2018

Friday, May 18, 2018

प्रभातपुष्प

रविराज्याच्या आगमनाने
सोनेरी पहाट जाली
स्वागताने धरती
लाजुन आज न्हाली

@
संगीता भांडवले
वाशी,उस्मानाबाद
19-5-2018